Friday 8 April 2022

नविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ ,तीन भारतीय कलाविष्कारांचा

❇ *​नविल नरोन्हा बनले श्रीमंत सीईओ*

- देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य उद्योगपती म्हणून 'डीमार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर 'डीमार्ट'ची प्रमुख कंपनी असणाऱ्या 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट'चे सीईओ नविल नरोन्हा देशातील सर्वांत श्रीमंत सीईओ बनले आहेत.

- देशातील दुसऱ्या क्रमांकाचे धनाढ्य उद्योगपती म्हणून 'डीमार्ट'चे संस्थापक राधाकिशन दमाणी यांचे नाव चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर 'डीमार्ट'ची प्रमुख कंपनी असणाऱ्या 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट'चे सीईओ नविल नरोन्हा देशातील सर्वांत श्रीमंत सीईओ बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ३१०० कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. 'अॅव्हेन्यू सुपरमार्ट'च्या माध्यमातून देशभरातील २०० 'डीमार्ट'चे संचलन केले जाते.

- नरोन्हा यांच्याबाबत बोलायचे झाल्यास ते कुणी दिग्गज आयटी तंत्रज्ञही नाहीत आणि बँकरही नाहीत. त्यांनी कोणत्याही आयआयटी आणि आयआयएममधून पदवीही घेतलेली नाही. मात्र, पारंपरिक किराणा मालाच्या संघटित व्यवसायाद्वारे ते देशातील सर्वांत श्रीमंत सीईओ बनले आहेत. त्यांचे बॉस राधाकिशन दमाणी १७.८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह देशातील दुसरे सर्वांत श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. देशातील तिसरे सर्वांत श्रीमंत नोकरदार बनण्याचा मानही 'अॅव्हेन्यू सुपरमार्केट'चे सीएफओ रमाकांत बाहेती यांनी मिळवला आहे.

▪️देशातील श्रीमंत सीईओ
नाव पद कंपनी शेअर्सची संख्या शेअर्सचे मूल्य (कोटी रुपये)

- नविल नरोन्हा सीईओ अॅव्हेन्यू सुपरमार्केट १,३३,८८,५६१ ३१२८

- आदित्य पुरी सीईओ एचडीएफसी बँक ७७,४५,०८८ ९४३

- रमाकांत बाहेती सीएफओ अॅव्हेन्यू सुपरमार्केट २८,५०,३३९ ६६६

- सी. पी. गुरनानी सीईओ टेक महिंद्र ७१,३९,०५९ ५९४

- आर. एक. कर्नाड एमडी एच़डीएफसी २३,२६,६७२ ५४७

- मिलिंद बर्वे सीईओ एचडीएफसी एएमसी १०,४०,००० ३३७

- दीपक पारेख चेअरमन एचडीएफसी ११,६०,००० २७३

- कैझाद भरूचा संचालक एचडीएफसी बँक २१,०२७,१०२ २५६

- शांती एकंबरम अध्यक्ष कोटक बँक १४,८५,८६५ २५१

- मुकुंद भट्ट सीएफओ कोटक बँक १३,१९,०७९ २२३

- दीपक गुप्ता संयुक्त एमडी कोटक बँक ११,३४,७६१ १९२

- केकी मिस्त्री उपाध्यक्ष एचडीएफसी ६,५६,५०० १

_________________________

​​📕 तीन भारतीय कलाविष्कारांचा
      गिनीज विश्वविक्रम

- त्यागया चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे.

- कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.

- 1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.

- त्यागराज पंचरत्नम संगीतावरचे नृत्यदिग्दर्शन पार्वती, कुचीपुडी तज्ञ एम.व्ही.एन. मूर्ती आणि कृष्णकुमार ह्यांनी केले होते. त्यांनी 1200 लोकांच्या बँडला प्रशिक्षण दिले.

🚦 भारतीय नृत्यशैली

- भारतात दोनशेहून अधिक लोकनृत्ये प्रचलित आहेत. दहा शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातल्या कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत. तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.

🚦 राज्यात रुजलेले नृत्यप्रकार

-अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
-आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
-आसाम - बिहू, जुमर नाच
-उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
-उत्तराखंड - गढवाली
-उत्तरांचल - पांडव नृत्य
-ओरिसा - ओडिसी, छाऊ
-कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
-केरळ - कथकली
-गुजरात - गरबा, रास
-गोवा - मंडो
-छत्तीसगढ - पंथी
-जम्मू व काश्मीर - रौफ
-झारखंड - कर्मा, छाऊ
-मणिपूर - मणिपुरी
-मध्यप्रदेश - कर्मा, चरकुला
-महाराष्ट्र - लावणी
-मिझोरम - खान्तुम
-मेघालय - लाहो
-तामिळनाडू - भरतनाट्यम
-पंजाब - भांगडा, गिद्धा (गिद्दा)
-पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
-बिहार - छाऊ
- राजस्थान - घूमर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...