Ads

12 April 2022

आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप कुस्तीत भारताच्या सचिन राठीने पटकावले सुवर्ण आणि जगातून निवृत्त झालेल्या विमानावर भारतीय हवाई दल अवलंबून


◆◆ आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप कुस्तीत भारताच्या सचिन राठीने पटकावले ‘सुवर्ण’ ◆◆

● आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

● आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

●  त्याने मंगोलियाचा मल्ल बॅट एर्डेनेला आस्मान दाखवले.

● यापूर्वी शनिवारी विशाल कालीरमण, सचिन गिरी आणि नवीन हे आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभूत झाले होते. त्यांना रौप्य पदावरच समाधान मानावे लागले होते.

● फ्री स्टाईल बाउटच्या सुरूवातीच्या दिवशी पाचपैकी चार मल्ल पदक जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.

●  करणने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक घेतले होते.

____________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

✳ जगातून निवृत्त झालेल्या विमानावर भारतीय हवाई दल अवलंबून

🔺 हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे.    

◾️भारतीय हवाई दल आधीच फायटर विमानांच्या स्क्वाड्रन  समस्येचा सामना करत आहे. त्याचवेळी हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. भारतीय हवाई दलात अजूनही जी फायटर विमाने कार्यरत आहेत त्याचा वापर अन्य देशांनी थांबवला आहे.

भारतीय हवाई दलाला ही विमाने कार्यरत ठेवण्यासाठी दुसऱ्या देशांची मदत घ्यावी लागत आहे. भारताला जॅग्वार विमानांसाठी लागणारे सुट्टे भाग ओमान, फ्रान्स आणि युकेकडून मिळणार आहेत. त्यामुळे या फायटर विमानांचे आयुष्य वाढवता येणार आहे. जॅग्वार ही मुळची ब्रिटीश बनावटीची विमाने आहेत. भारतीय हवाई दलाकडे सध्या ११८ जॅग्वार विमाने आहेत. पण ही विमाने जुनी झाल्यामुळे त्यांची युद्ध क्षमता मोठया प्रमाणावर कमी झाली आहे.

या विमानांचे सुट्टे भागही सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे या विमानांना लढण्यायोग्य स्थितीत ठेवणे एक आव्हान आहे. या विमानांचे एअरफ्रेम आणि सुट्टे भाग मिळवण्यासाठी शोध सुरु आहे असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारताकडे जॅग्वारच्या पाच स्क्वाड्रनमध्ये ८० विमाने आहेत. या विमानांमध्ये सुधारणा करण्याची १.५ अब्ज डॉलरच्या खर्चाची योजना आहे.

१९७९ साली भारताने यूकेकडून ४० जॅग्वार विमाने विकत घेतली होती. त्यानंतर एचएएलने १५० विमानांची निर्मिती केली. फ्रान्स आणि यूकेने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांचा वापर २००५ ते २००७ दरम्यान पूर्णपणे थांबवला. भारताने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांमध्ये एफ-१२५ आयएन इंजिन बसवल्यानंतर २०३५ नंतर सुद्धा ही विमाने कार्यरत राहतील असे सूत्रांनी सांगितले. भारताला फ्रान्सकडून जॅग्वारच्या ३१ एअरफ्रेम, ओमानकडून आठ इंजिन दोन एअरफ्रेम मिळणार आहेत. फ्रान्स आणि ओमान हे भाग भारताला पूर्णपणे मोफत देणार आहे भारताला फक्त वाहतुकीचा खर्च उचलावा लागतो.

__________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा आणि भारतातील विभाग व त्यांची मुख्यालय आणि पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🌸 महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा 🌸 #Maharashtra

•१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

•२) कर्नाटक – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

•३) तेलंगना-गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

•४) गुजरात – पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे.

•५) दादर,नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

•६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

•७) गोवा- सिंधुदुर्ग.

____________________________

✅✅ भारतातील विभाग व त्यांची मुख्यालय ✅✅

● *मध्य विभाग* (मुंबई)

● *पूर्व विभाग* (कोलकाता)

● *उत्तर विभाग* (नवी दिल्ली)

● *उत्तर पूर्व विभाग* (गोरखपूर)

● *उत्तर पूर्व सीमा विभाग* (गुवाहाटी

● *दक्षिण विभाग* (चैनई)

● *दक्षिण मुख्य विभाग* (सिकंदराबाद)

● *दक्षिण पूर्व विभाग* (कोलकाता)

● *पश्चिम विभाग* (चर्चगेट-मुंबई)

● *पूर्व मध्य विभाग* (हाजीपूर-बिहार)

● *पूर्व किनारी विभाग* (भुवनेश्वर)

● *उत्तर मध्य विभाग* (अलाहाबाद)

● *उत्तर पश्चिम विभाग* (जयपूर)

● *दक्षिण पूर्व मध्य विभाग* (विलासपुर)

● *दक्षिण पश्चिम विभाग* (हुगळी)

● *पश्चिम मध्य विभाग* (जबलपूर)

● *मेट्रो रेल्वे झोन* (कोलकाता)

_______________________________

✅✅ पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती ✅✅ #Geography #PhysicalGeography

🏆 पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🏆 उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🏆 उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🏆 विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🏆 अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🏆 रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

🏆 स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

नदी व उगमस्थान व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
✅✅ नदी व उगमस्थान ✅✅

💦 पूर्णा:-मेळघाट-अमरावती

💦 काटेपूर्णा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

💦 मोरणा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

💦 ज्ञानगंगा:-नागझिरा:-बुलढाणा

💦 वाघूर:-अजिंठा:-औरंगाबाद

💦 गिरणा:-सुरगाणा:-नाशिक

💦 पांझरा:-पिंपळनेर:-धुळे

💦 सिना:-हरिश्चंद्र डोंगर

💦 घोड:-आहुपे(आंबेगाव)

💦 नीरा:-शोरगाव(भोर)

💦 कुकडी:-नानेखडी(जुन्नर)

💦 इंद्रायणी:-लोणावळा

💦 भामा:-भामनेर

_______________________________

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

☑️ एकूण वातावरणाच्या सुमारे ९७% वातावरण समुद्र सपाटीपासून सुमारे २९ कि.मी. उंची पर्यंतच सामावलेले आहे.

☑️ भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. उंची पर्यंतच्या भागात वातावरणातील वायूंचे प्रमाण सर्वत्र सारखे असून या आवरणातील रासायनिक घटना सर्वत्र समान असते म्हणून या थराला समावरणाचा थर म्हणतात.

☑️ समावरणाच्या थरात वातावरणातील एकूण वायूंपैकी नायट्रोजन व ऑक्सिजन यांचे प्राबल्य सर्वात जास्त म्हणजे ९९.०३% इतके असते. तर भूपृष्ठापासून सुमारे ८० कि.मी. च्या वर वातावरणाच्या भागाला विषमावरण म्हणतात.

☑️ पृथ्वीच्या संपुर्ण वातावरणाच्या वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पहिल्या 30 किलोमीटर च्या आत केंद्रित आहे.

☑️ तापमान व इतर घटकांचा विचार करून वातावरणाचे खालील स्तरांमध्ये विभाजन केले जाते.
1) तपांबर (Troposphere)
2) स्थितांबर (Stratosphere)
3) दलांबर/आयनांबर) (Ionosphere)
4) बाह्यम्बर (Exosphere)

_____________________________________

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

✅✅ महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे✅✅

🔵 भीमाशंकर ➖ पुणे

🟤 त्र्यंबकेश्वर ➖ नाशिक

🟣 घृष्णेश्वर ➖ वेरुळ,औरंगाबाद

🔴 परळी वैजनाथ ➖ बीड

🟠 औंढा नागनाथ ➖ हिंगोली.

 

महाराष्ट्र व भारताचा भूगोल आणि जगातील विस्ताराने मोठे देश आणि महाराष्ट्र जलाशय व धरणे

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🔰भारतात राष्ट्रीय उद्याने नसलेले राज्य व केंद्रशासित प्रदेश 🍀🍀

◾️ चंदीगड,
◾️ दादरा नगर हवेली,
◾️दमन व दीव ,
◾️लक्षद्वीप,
◾️पद्दुचेरी,
◾️ दिल्ली
याठिकाणी एकही राष्ट्रीय उद्यान नाही✍

🔰भारतामध्ये एकूण 104 राष्ट्रीय उद्याने आहेत

🔰 राष्ट्रीय उद्याने भारतातील 40500 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापली आहे

🔰देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या  1.23 टक्के  

🔰 भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने ⛰⛰🏝

◾️ मध्य प्रदेश( 10 )
◾️अंदमान निकोबार (9) ,
◾️केरळ महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल प्रत्येकी 6,
◾️आसाम कर्नाटक हिमाचल प्रदेश तामिळनाडू तेलंगणा प्रत्येकी 5

🔰 भारत सरकारने 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू केला सध्या भारतात 50 व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️ त्यापैकी महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प आहेत

◾️प्रत्येक चार वर्षांनी वाघांची 🐅🐅
जनगणना होते 2018 च्या व्याघ्र जनगणनेनुसार भारतात 2967 वाघ आहेत  त्यापैकी महाराष्ट्रात 312 वाघ आहेत

_____________________________

जगातील विस्ताराने मोठे देश 

* रशिया [ आशिया ] - १,७०,०७५,०००

* कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९

* चीन [ आशिया ] - ९,५६१,०००

* अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४

* ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५

* ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००

* भारत [ आशिया ] - ३,२८७,७८२

* अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] - २,७७६,६५४

* कझाकस्तान [ आशिया ] - २,७१७,३००

* सुदान [ आफ्रिका ] - २,५०५,८१३

______________________________

💦 महाराष्ट्र - जलाशय व धरणे 💦
----------------------------------

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी

_____________________________

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

शासकीय योजना

👍 शासकीय योजना 📍:
🔰 *फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी* 🔰

♦️श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत.
♦️ अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

♦️मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर आहे.

♦️अंबानी हे जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

♦️ गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे आणि ते
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत.

♦️HCL Technologies Limited चे संस्थापक शिव नाडर हे फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप 10 श्रीमंत भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

♦️ या यादीत सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहे. त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाची लस कोव्हशील्ड बनवली आहे.

❇️स्टीपलचेसमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने ‘एएफआय’ फेडरेशन चषक वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत 13:39.43 सेकंद अशी वेळ नोंदवत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
तर 1992 मध्ये बहादूर प्रसाद यांनी नोंदवलेला विक्रम अविनाशनने मोडीत काढला.

♦️ महिलांच्या 200 मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

♦️सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासपासून ती एक शतांश सेकंदाने पिछाडीवर राहिली.

♦️आसामच्या अमलान बोरगोहेनने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 20.52 सेकंद वेळेसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.


__________________________



🥁🎹🎼 भारत वाद्य आणि 🎺🎸त्यांचे प्रसिद्ध

वादक.*

🎺 *शहनाई* :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां

🪕 *वीणा*:- सादिक आली काह खान, असद अली खान

🎻 *संतूर* :- पंडित शिवकुमार शर्मा

🎷 *सारंगी* :- रामनारायण

🎹 *सरोद* :- अमजद अली खान

🪘 *तबला* :- झाकीर हुसेन

🎸 *सतार* :- पंडित रविशंकर

🎺 *बासरी* :- पन्नालाल घोष, हरिप्रसाद चौरासिया

🎤 *शास्त्रीय संगीत* :- मल्लिकार्जुन🎼

🎻 *व्हायोलिन* :- वी.वी.जोग, गजानन जोशी, अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन....

शासकीय योजना

👍 शासकीय योजना 📍:
95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे.

दिनांक- 22, 23, 24 एप्रिल 2022

🔰 उदगीर येथे होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

🔰 माणसाला केंद्रबिंदू मानून, मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत.

🔰 त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसंच इतरही प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.

🔰 त्यांच्या 'डफ' या दीर्घ कथेवर प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे 'काळोखाच्या पारंब्या'या नावाचा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत.

🔰 बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे ९-१०- नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित ३५ वं मराठवाडा साहित्य संमेलन, नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचं जळगाव इथं १४ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेलं साहित्य संमेलन तसंच सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्राचं अध्यक्षपदही सासणे यांनी भूषवलं आहे.

🟠राष्ट्रीय महिला आयोगाने 'मानव तस्करी विरोधी सेल' सुरू केला

🔹राष्ट्रीय महिला आयोगाने मानवी तस्करीच्या प्रकरणांचा सामना करण्यासाठी, प्रभावीता सुधारण्यासाठी, महिला आणि मुलींमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, तस्करी विरोधी युनिट्सची क्षमता वाढवणे आणि प्रशिक्षण देणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींचा प्रतिसाद वाढवण्यासाठी 'मानवी तस्करीविरोधी कक्ष' सुरू केला . 

🔸कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यांची क्षमता वाढवणे सुलभ करण्याच्या उद्देशाने सेलची स्थापना करण्यात आली आहे.

🔸राष्ट्रीय महिला दिवस : 13 फेब्रुवारी

🔹राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना :  1992

🔸राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय :  नवी दिल्ली

🔹राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष : रेखा शर्मा

--

❇️ पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजुर; सरकार कोसळले!

◆ पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार कोसळले आहे.त्यांच्यावरील अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

◆ इम्रान खान यांच्या विरोधात 174 मते पडली.तर त्यांच्या पक्षातील खासदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.विषेश म्हणजे मध्यरात्री 12 वाजता या अविश्वास ठरावासाठी मतदान घेण्यात आले.

◆ यानंतर पंतप्रधानपदासाठी विरोधकांनी शहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━

🟠 राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस 2022 🟠

🔹 भारतात दरवर्षी 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून  साजरा केला जातो .

🔸2003 मध्ये, व्हाईट रिबन अलायन्स इंडिया (WRAI), 1800 संघटनांच्या युतीच्या विनंतीवरून, भारत सरकारने 11 एप्रिल हा राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस म्हणून घोषित केला.

🔹11 एप्रिल :-हा दिवस कस्तुरबा गांधी यांची जयंती आहे.

-------------------------------------------------

🟠प्रख्यात विद्वान-शिक्षणतज्ज्ञ मनोज सोनी UPSC चे नवे अध्यक्ष

🔹सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) सदस्य डॉ. मनोज सोनी यांची देशातील प्रमुख सरकारी भर्ती एजन्सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . 

🔸ते लहानपणापासून आनंद जिल्ह्यातील मोगरी येथील स्वामीनारायण पंथाच्या अनूपम मिशनशी संबंधित आहे.

🔹 10 जानेवारी 2020 रोजी निष्कर्म कर्मयोगी (निःस्वार्थ कार्यकर्ता) म्हणून दीक्षा प्राप्त केली.

🔸UPSC चेअरमन प्रदीप कुमार जोशी यांच्या जागी डॉ.सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

🔹या नियुक्तीपूर्वी, सोनी यांनी दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणूनही काम केले आहे आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि मान्यता मिळवल्या आहेत.

-------------------------------------------------

मराठी व्याकरण विरामचिन्हे

मराठी व्याकरण विरामचिन्हे | Punctuation Marks in Marathi

1. पूर्णविराम

2. स्वल्प विराम

3. अर्धविराम

4. अपूर्णविराम

5. प्रश्नचिन्ह

6. उद्गारवाचक चिन्ह

7. अवतरण चिन्ह

8. संयोगचिन्ह

9. अपसरण चिन्ह

Marathi Grammar Viramchinha
विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.

बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.


विराम म्हणजे थांबणे. बोलताना आपण आवश्यकतेनुसार कमी अधिक वेळ थांबू शकतो, परंतु लिहिताना तसे करता येत नाही, म्हणून ही थांबण्याची क्रिया विरामचिन्हाव्दारे दर्शवली जाते.


Punctuation Marks in Marathi are used to structure sentences and clauses. They are used to indicate the completion of a sentence, act as pauses in speech, or to express excessive emotion.

1. पूर्णविराम
चिन्ह: (.)

नियम/ उपयोग: याचा वापर वाक्य पूर्ण झाले की करतात.

उदा./ Example:

आज दसरा आहे.
येथून निघून जा.
रमा ला कन्या प्राप्ती झाली.
2. स्वल्प विराम
चिन्ह: (,)

नियम/ उपयोग:

वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी.
मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी
समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता.
एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.
वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वापर केला जातो.
उदा./ Example:

आम्ही संग्रहालयातील प्राणी, पक्षी, चित्रे, नाणी, ताम्रपट, लिपिप्रकार पहिले.
पावसाच्या आगमनाने सारी सृष्टी आनंदित झाली,कोकिळा गाऊ लागली, गायी हंबरू लागल्या, वासरे बागडू लागली.
विद्यार्थी मित्रांनो , प्रिया म्हणाली, मी आज येणार नाही.
कृष्णाने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या.
3. अर्धविराम
चिन्ह: (;)

नियम/ उपयोग:

ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात.
संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी.
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता.
उदा./ Example:

ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडत नव्हता.
त्या देशात राजा होता; तरी सत्ता लोकांच्या हाती होती.
‘वडिलांच्या जिवंतपणी त्या उधळ्या मुलाचे काहीच चालले नाही; परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्याने आपली सर्वं संपत्ती उधळून टाकली.’
4. अपूर्णविराम
चिन्ह: (:)

नियम/ उपयोग: वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.

उदा./ Example: संगम महाराजांच्या मते पुढील दिवस शुभ आहेत : ९, १२, १८, २२.

5. प्रश्नचिन्ह
चिन्ह: (?)

नियम/ उपयोग:

याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो.
वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते.
उदा./ Example:

रमाची परीक्षा कधी आहे?
सुरेशचे लग्न कधी होणार?
6. उद्गारवाचक चिन्ह
चिन्ह: (!)

नियम/ उपयोग: उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.

उदा./ Example:

शाब्बास, असाच अभ्यास कर!
छान, हीच खरी देशसेवा आहे!
7. अवतरण चिन्ह
चिन्ह: (“ ’’)
(‘ ’)

नियम/ उपयोग:

एखाद्या वाक्यावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे विचार अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास ‘ ’ एकेरी अवतरण चिन्ह वापरतात.
एखाद्याच्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जसेच्या तसे घेतले असता “ ’’ दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होतो.
उदा./ Example:

अहमदनगर हे ‘ ऐतिहासिक ’ शहर आहे.
“ आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख ’’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.
8. संयोगचिन्ह
चिन्ह: (-)

नियम/ उपयोग:

'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने संयोग चिन्ह वापरतात
कालावधी दाखवण्यासाठी सुद्धा संयोग चिन्ह वापरतात
उदा./ Example:

काम - क्रोध त्यागावा !
शैक्षणिक कालावधी २०२०-२१
५-६ तास प्रवास करून आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो.
9. अपसरण चिन्ह
चिन्ह: (-)

नियम/ उपयोग:

पूर्वी सांगितलेला मजकूर अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या ओळीत मजकुराच्या मागे पुढे हे चिन्ह वापरतात.
विशेष स्पष्टीकरणार्थ यादी देताना.
उदा./ Example:

भक्तीने वाहिलेली फुले - मग ती कोणतीही असोत – देवाला प्रियच वाटतात.
दशरथाचे पुत्र चार – राम, लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न
लेखन करताना विरामचिन्हांचा वापर महत्त्वपूर्ण असा आहे. जर विरामचिन्हे लेखनात आली नाहीत तर लिहिलेला मजकूर समजण्यास अडचण तर येतेच पण अर्थाचा अनर्थ सुद्धा होऊ शकतो. म्हणून लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा वापर करावा.

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मराठी भाषेत किती विरामचिन्हे आहेत?
Ans : मराठी भाषेत 10 प्रचलित विरामचिन्हे आहेत.

विरामचिन्हे का आवश्यक आहेत?
Ans : भाषण आणि मजकूर समजण्यासाठी विरामचिन्ह आवश्यक आहे. विरामचिन्हे तुम्हाला कधी विराम द्यावा किंवा कोणत्या शब्दांवर ताण द्यावा हे सांगतात.

मराठी विराम चिन्हांची नावे काय आहेत?
Ans: पूर्णविराम, स्वल्प विराम, अर्धविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोगचिन्ह, अपसरण चिन्ह इत्यादि