Tuesday 12 April 2022

आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप कुस्तीत भारताच्या सचिन राठीने पटकावले सुवर्ण आणि जगातून निवृत्त झालेल्या विमानावर भारतीय हवाई दल अवलंबून


◆◆ आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप कुस्तीत भारताच्या सचिन राठीने पटकावले ‘सुवर्ण’ ◆◆

● आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

● आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा मल्ल सचिन राठीने ७४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.

●  त्याने मंगोलियाचा मल्ल बॅट एर्डेनेला आस्मान दाखवले.

● यापूर्वी शनिवारी विशाल कालीरमण, सचिन गिरी आणि नवीन हे आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पराभूत झाले होते. त्यांना रौप्य पदावरच समाधान मानावे लागले होते.

● फ्री स्टाईल बाउटच्या सुरूवातीच्या दिवशी पाचपैकी चार मल्ल पदक जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.

●  करणने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक घेतले होते.

____________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

✳ जगातून निवृत्त झालेल्या विमानावर भारतीय हवाई दल अवलंबून

🔺 हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे.    

◾️भारतीय हवाई दल आधीच फायटर विमानांच्या स्क्वाड्रन  समस्येचा सामना करत आहे. त्याचवेळी हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. भारतीय हवाई दलात अजूनही जी फायटर विमाने कार्यरत आहेत त्याचा वापर अन्य देशांनी थांबवला आहे.

भारतीय हवाई दलाला ही विमाने कार्यरत ठेवण्यासाठी दुसऱ्या देशांची मदत घ्यावी लागत आहे. भारताला जॅग्वार विमानांसाठी लागणारे सुट्टे भाग ओमान, फ्रान्स आणि युकेकडून मिळणार आहेत. त्यामुळे या फायटर विमानांचे आयुष्य वाढवता येणार आहे. जॅग्वार ही मुळची ब्रिटीश बनावटीची विमाने आहेत. भारतीय हवाई दलाकडे सध्या ११८ जॅग्वार विमाने आहेत. पण ही विमाने जुनी झाल्यामुळे त्यांची युद्ध क्षमता मोठया प्रमाणावर कमी झाली आहे.

या विमानांचे सुट्टे भागही सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे या विमानांना लढण्यायोग्य स्थितीत ठेवणे एक आव्हान आहे. या विमानांचे एअरफ्रेम आणि सुट्टे भाग मिळवण्यासाठी शोध सुरु आहे असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारताकडे जॅग्वारच्या पाच स्क्वाड्रनमध्ये ८० विमाने आहेत. या विमानांमध्ये सुधारणा करण्याची १.५ अब्ज डॉलरच्या खर्चाची योजना आहे.

१९७९ साली भारताने यूकेकडून ४० जॅग्वार विमाने विकत घेतली होती. त्यानंतर एचएएलने १५० विमानांची निर्मिती केली. फ्रान्स आणि यूकेने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांचा वापर २००५ ते २००७ दरम्यान पूर्णपणे थांबवला. भारताने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांमध्ये एफ-१२५ आयएन इंजिन बसवल्यानंतर २०३५ नंतर सुद्धा ही विमाने कार्यरत राहतील असे सूत्रांनी सांगितले. भारताला फ्रान्सकडून जॅग्वारच्या ३१ एअरफ्रेम, ओमानकडून आठ इंजिन दोन एअरफ्रेम मिळणार आहेत. फ्रान्स आणि ओमान हे भाग भारताला पूर्णपणे मोफत देणार आहे भारताला फक्त वाहतुकीचा खर्च उचलावा लागतो.

__________________________

💥💥💥💥💥💥💥💥💥

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...