Tuesday 12 April 2022

आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास


आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास

आर्थिक वृद्धी (Economic Growth) :

आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना असून देशातील वस्तु व सेवांच्या एकूण आकारमानात वाढ होणे म्हणजेच आर्थिक वृद्धी होणे होय. म्हणजेच, राष्ट्रीय उत्पन्न वाढत जणाच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी म्हटले जाते.

अर्थात राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले म्हणून त्यास आर्थिक वृद्धी म्हणणे अयोग्य ठरते.

आर्थिक वृद्धीचे मोजमाप साधारणत: जी.डी.पी.च्या संदर्भात केले जाते.

अशा रीतीने, देशाचा जी.डी.पी. वाढत जाण्याच्या प्रक्रियेला आर्थिक वृद्धी असे म्हणतात, तर एका वर्षाचा जी.डी.पी. मागील वर्षाच्या जी.डी.पी. च्या तुलनेत जेवढ्या टक्क्यांनी वाढलेल्या असतो त्यास आर्थिक वृद्धी दर असे म्हणतात.

वृद्धी दर धनात्मक किंवा ऋणात्मक असे शकतो.

वस्तू व सेवांचे भौतिक उत्पादन वाढणे, हे खरे आर्थिक वृद्धीचे धोतक आहे.

वास्तु व सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने वाढलेले जी.डी.पी. आर्थिक वृद्धी दर्शवित नाही. त्यामुळे खरी आर्थिक वृद्धी नॉमिनल जी.डी.पी.तील वाढीच्या तुलनेत वास्तव जी.डी.पी. (real GDP) वाढीने चांगल्या प्रकारे निर्देशित केली जाते.)

आर्थिक विकास (Economic Development) :

‘आर्थिक विकास’ ही ‘आर्थिक वृद्धी’ पेक्षा एक व्यापक संकल्पना आहे. ती एक गुणात्मक संकल्पना आहे.
‘विकास’ या संकल्पनेत केवळ आर्थिक वृद्धीच नव्हे, तर जीवनाच्या इतर सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदलांचाही समावेश होतो. (पुढे केवळ आर्थिक विकासाच्या संकल्पनेची चर्चा केलेली आहे.)
‘आर्थिक विकासा’ मध्ये आर्थिक वृद्धीबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील इच्छित बदल आणि इतर तांत्रिक व संस्थात्मक बदल, यांचा समावेश होतो.
दुसर्‍या भाषेत, आर्थिक वृद्धी होत असतांना दर डोई वास्तव उत्पन्न, दारिद्रय, बेरोजगारी, देशातील उपन्नाचे वितरण इत्यादींमध्ये काय बदल होत आहे, यातून आर्थिक विकास सुचीत होत असेल.
म्हणजेच, आर्थिक वृढीमुळे निर्माण होणारे फायदे मुठभर भांडवलदारांपूरती मर्यादित न राहता, त्यामुळे सर्वासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतील, त्यांच्या हातात पर्याप्त क्रमशक्ती निर्माण होत असेल, दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊन सर्वसामान्य लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावत असेल व देशातील आर्थिक व सांपक्तिक विषमता कमी होत असेल, तरच आर्थिक विकास होत आहे, असे म्हटले जाईल.
अशा रीतीने, आर्थिक वृद्धीचे फायदे तळागाळातील शेवटच्या व्यक्ती व गटांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास होय.
थोडक्यात, आर्थिक विकास म्हणजे ‘आर्थिक वृद्धी+बदल’ असे म्हणता येईल.
येथे ‘बदल’ ही संकल्पना अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शविते. त्यामध्ये दारिद्रय कमी होणे, रोजगार निर्मिती, विषमता कमी होणे, राहाणीमानाचा दर्जा उंचावणे, कार्यक्षमता वाढणे, तंत्रज्ञान विकास, औधोगिक व सेवा क्षेत्रांचा वेगाने विकास, व्यक्तींच्या दृष्टीकोनांमध्ये सकारात्मक बदल, यांसारख्या सकारात्मक बदलांचा समावेश होतो.

अर्थ: जीवनाच्या मूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.
 

दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहतो.

दारिद्रयाची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्यामध्ये चांगल्या जीवन स्तराच्या ऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर दारिद्राची कल्पना करण्यात येते.

भारतातही दारिद्रयाच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो.

सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty) :

देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :

दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.
राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

_____________________________

दारिद्रय रेषा :

गरिबीची प्रमाण मोजण्यासाठी दारिद्रय रेषा (Pov-erty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो.
1973-74 पासून नियोजन आयोग दारिद्रय रेषा ठरविण्यासाठी पुढील दोन निकषांचा वापर करीत आहे.
1दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग (Per Capita per day calorie intake) –

या निकषानुसार ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक उपभोग 2400 कॅलरी, तर शहरी भागात तो किमान 2100 कॅलरी एवढा ठरविण्यात आला आहे.
अर्थात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी मूल्याचे रूपांतर पैशात (equivalent मनी value) केले जाते.
दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च (Per Capita Per Month Consumption Expenditure) –

या निकषानुसार दारिद्रय रेषा 2004-2005 मध्ये (आधारभूत वर्ष: 1973-74) ग्रामीण भागात दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च रु. 356.30 तर शहरी भागात तो रु. 538.60 एवढी ठरविण्यात आली आहे.
यावरून जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा कमी खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेखालील कुटुंबे’ (Below Poverty Line: BPL) तर जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा जास्त खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेवरील कुटुंबे’ (Above Poverty Line:APL) असे संबोधले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...