Ads

14 April 2022

भारतातील जनक विषयी माहिती आणि भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴

    🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

    🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

    🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

    🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

    🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

    🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

    🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

    🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

    🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी

___________________________  

🔴 भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी 🔴

🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना आणि काही माहिती

❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
   - बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
   - मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
   - लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
   - बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
   - लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
   - कलकत्ता विद्यालय

__________________________________



◾️व्यायाम मंडळ
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

◾️अनुशीलन समिती
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

◾️अभिनव भारत
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

◾️इंडिया हाऊस
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

◾️स्वदेश बांधव समिती
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

◾️अभिनव भारत( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

◾️इंडियन इंडिपेंडस लिग
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

◾️अनुशीलन समिती
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

◾️भारत माता सोसायटी
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

◾️गदर पार्टी
– लाला हरदयाळ ( १९१३ )

◾️इंडियन इंडिपेंडस लिग
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

◾️इंडियन इंडिपेंडस लिग
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

◾️हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

◾️नौजवान सभा
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

◾️ हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

◾️ इंडियन इंडिपेंडन्स लिग( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

◾️आझाद हिंद सेना
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात

🛑विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात🛑

🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

🔶 ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

🔶 ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

🔶 मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

🔶 प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

🔶पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

🔶 भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

🔶 जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

🔶 पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

🔶 आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

🔶 ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

🔶 अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

🔶 प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

🔶 जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

🔶 सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

🔶 रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

🔶 शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

🔶 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

🔶 भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला

🥉 २००० : करनाम मल्लेश्वरी : भारोत्तालन

🥉 २०१२ : सायना नेहवाल : बॅडमिंटन

🥉 २०१२ : मेरी कॉम : बॉक्सिंग

🥈 २०१६ : पी वी सिंधू : बॅडमिंटन

🥉 २०१६ : साक्षी मलिक : कुस्ती

🥈 २०२० : मीराबाई चानू : भारोत्तोलन

🥉 २०२० : पी वी सिंधू : बॅडमिंटन

🥉 २०२० : लवलीना बोरगोहेन : बॉक्सिंग

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”

🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

🔸 जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

🔸 देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

राज्य लोकसेवा आयोग

घटना कलम क्र. 315 नुसार प्रत्येक घटना राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग असेल. परंतु दोन राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग निर्माण करण्याचा अधिकार राज्यसरकारला आहे.

राज्यसेवा आयोगाचा उद्देश : अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.

रचना : राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवितील इतके सदस्य असतात.

नेमणूक : भारताचे राज्यपाल करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ : राज्यपाल देतात.

राजीनामा : राज्यपालाकडे 

कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर रहातात.

आयसीसी U -19 विश्वचषक स्पर्धा आणि राष्ट्रपती संबंधित कलमे

❇️ आयसीसी U -19 विश्वचषक स्पर्धा ❇️

★ वर्ष - यजमान - विजेता - उपविजेता ★

◆ 1988 - ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान

◆ 1998 - द. आफ्रिका - इंग्लंड - न्यूझीलंड

◆ 2000 - श्रीलंका - भारत - श्रीलंका

◆ 2002 - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया - द. आफ्रिका

◆ 2004 - बांगलादेश - पाकिस्तान - वेस्ट इंडिज

◆ 2006 - श्रीलंका - पाकिस्तान - भारत

◆ 2008 -  मलेशिया - भारत - द. आफ्रिका

◆ 2010 - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान

◆ 2012 - ऑस्ट्रेलिया - भारत - ऑस्ट्रेलिया

◆ 2014 - युएई - द. आफ्रिका - पाकिस्तान

◆ 2016 - बांगलादेश - वेस्ट इंडिज - भारत

◆ 2018 - न्यूझीलंड - भारत - ऑस्ट्रेलिया

◆ 2020 - द. आफ्रिका - बांगलादेश - भारत

◆ 2022 - वेस्ट इंडिज - भारत - इंग्लंड

________________________________

राष्ट्रपती संबंधित कलमे 🟡

🔶 52:-भारताचा राष्ट्रपती

🔶 53:-संघराज्य चे कार्यकारी अधिकार

🔶 54:-राष्ट्रपती निवडणूक

🔶 55:-निवडणूक पद्धत

🔶 56:-राष्ट्रपती कार्यकाळ

🔶 57:-पुनर्निवडी साठी पात्रता

🔶 58:-राष्ट्रपती बाबत पात्रता

🔶 59:-पदाच्या अटी

🔶 60:-राष्ट्रपती शपथ

🔶 61:-महाभियोग प्रक्रिया

🔶 62:-निवडणूक घेण्याचा कालावधी

🔶 71:-निवडणूक संबंधित बाबी

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे

१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०) आणि चक्रीवादळे व त्यांची नावे


🌀 भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)

🌀 बुरेवी : तमिळनाडू
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश
✔️ नाव दिले : इराण

🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : बांग्लादेश

🌀 वायु : भारत , पाकिस्तान
✔️ नाव दिले : भारत

🌀 हिक्का : गुजरात
✔️ नाव दिले : मालदीव

🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत
✔️ नाव दिले : ओमान

🌀 बुलबुल : बांग्लादेश , भारत
✔️ नाव दिले : पाकिस्तान

🌀 क्यार : सोमालिया , भारत , येमन
✔️ नाव दिले : म्यानमार

🌀 पवन : सोमालिया , भारत
✔️ नाव दिले : श्रीलंका

🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल
✔️ नाव दिले : थायलंड

🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात
✔️ नाव दिले : बांग्लादेश .

________________________

🌀  चक्रीवादळे व त्यांची नावे

🌀 तौकते : म्यानमार

🌀 यास : ओमान

🟢रुपया अवमूल्यन🟢

❇️पहिले अवमूल्यन

🔳दिनांक:-26 सप्टेंबर 1949

🔳टक्के:-30.5% ने केले गेले

🔳अमेरिकन डॉलर बाबत केले

🔳रुपयांची किंमत 21 सेंटस पर्यंत कमी झाली

▪️पंतप्रधान:-जवाहरलाल नेहरू

▪️अर्थमंत्री:-जॉन मथाई

❇️दुसरे अवमूल्यन

🔳दिनांक:-6 जून 1966

🔳टक्के:-36.5% ने केले

🔳चलन:-अमेरिकन डॉलर व इतर हार्ड चलन

🔳रुपयांचा विनिमय दर कमी झाला

❇️उद्दिष्टे:-

🔳व्यापरतोल कमी करणे

🔳निर्यात वाढवणे

▪️पंतप्रधान:-इंदिरा गांधी

▪️अर्थमंत्री:-सचिन चौधरी

❇️तिसरे अवमूल्यन

📌दिनांक:-1 जुलै 1991

🔳टक्के:-9.5%

📌दिनांक:-3 जुलै 1991

🔳टक्के:-10-10.78%

📌दिनांक:-15 जुलै 1991

🔳टक्के:-2 %

🔳चलन:-सर्व महत्त्वाचे जागतिक चलन

▪️पंतप्रधान:-पी व्ही नरसिंह राव

▪️अर्थमंत्री:-मनमोहन सिंग

_________________________________

स्टँड-अप इंडिया योजनेला ६ वर्षे पूर्ण झाली

🔹स्टँड-अप इंडिया योजनेला 5 एप्रिल 2022 रोजी सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

🔸स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत, योजना सुरू झाल्यापासून 1 लाख 33 हजार 995 हून अधिक खात्यांना 30,160 कोटींहून अधिक रुपये मंजूर करण्यात आले आहेत . 

🔹ही योजना पंतप्रधान मोदींनी 5 एप्रिल 2016 रोजी सुरू केली होती.

🔸स्टँड अप इंडिया योजना 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

🟪 पर्यावरण मंत्र्यांनी 'प्रकृती' हरित उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली

🔹केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री  भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत चांगल्या पर्यावरणासाठी आपल्या जीवनशैलीत करता येऊ शकणार्‍या छोट्या-छोट्या बदलांबद्दल जनजागृती करण्यासाठी  'प्रकृती' लाँच करण्यात आले.

🔸देशात प्रभावी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (PWM) सुनिश्चित करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) यांनी घेतलेले विविध हरित उपक्रम आहेत.

🟪 दिल्ली सरकारने सरकारी शाळांमध्ये 'हॉबी हब' स्थापन करण्याची योजना सुरू केली

🔹दिल्ली सरकारने अतिरिक्त क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीतील सरकारी शाळांसाठी शालेय वेळेनंतर हॉबी हबची स्थापना केली आहे . 

🔸हा प्रकल्प एकाच शिफ्टच्या सरकारी शाळेत राबविला जाणार आहे. 

🔹या नवीन शैक्षणिक सत्रात शालेय नृत्य, संगीत, कला आणि हस्तकला उपक्रमांसह दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये 'हॉबी हब' स्थापन करण्याचा प्रकल्प कामात आहे.

आपली राज्यघटना व नागरिकांचे मुलभूत अधिकार

आपली राज्यघटना व नागरिकांचे मुलभूत अधिकार
जगातील सर्वात मोठी व लिखित राज्यघटना
परिवर्तनियता व ताठरता यांचा समतोल
मुलभूत अधिकार
संसदीय शासन पद्धती
अल्पसंख्याकांना संरक्षण
स्वतंत्र न्यायव्यवस्था व कायदे मंडळ
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. विविध भाषा, प्रांत, धर्म असलेल्या देशातील नागरिकांना एकसंघ ठेवण्याचे आणि सर्वांना समान न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केले आहे. इतर देशाच्या तुलनेत जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. राज्यघटनेतील नागरिकांचे मुलभूत अधिकार आणि राज्यघटनेची वैशिष्ट्ये यांची माहिती देणारा लेख…
आपला देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला. यासाठी भारत स्वातंत्र्य कायदा 1947 झाला. या कायद्यातील तरतुदीनुसार भारत व पाक दोन स्वतंत्र राज्य, स्वतंत्र सरकारचे अस्तित्व. तथापि ब्रिटीश संसदेचे कायदे दोन्ही राज्यात लागू. घटना परिषदच संसद म्हणून काम पाहणार. नवीन घटना होईपर्यंत 1935 च्या कायद्यातील तरतुदी आवश्यक त्या बदलासह लागू करण्यात येतील. त्यामुळे आपल्याकडे नवीन संविधान आस्तित्वात येईपर्यंत यातील त्रिमंत्री योजना अंतर्गत सरकारचे कामकाज सुरु झाले. या घटना परिषदेने राज्यघटना निर्मितीचे काम सुरू केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या घटनेची निर्मिती केली आणि 1949 रोजी घटना सुपूर्द केली. 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली.
जगातील सर्वात मोठी व लिखित राज्यघटनाजगातील इतर देशांच्या तुलनेत आपली भारतीय राज्यघटना ही मोठी राज्यघटना आहे. केंद्र आणि घटक राज्य सरकार यांच्या अधिकाराची स्पष्ट विभागणी यात आहे. तसेच नागरिकांचे मुलभत अधिकार मार्गदर्शक तत्वे, संसदीय शासनपद्धती न्यायदान व्यवस्था अशा सर्व घटकांचा उल्लेख यात आहे. 405 कलम, 10 परिशिष्ट व 22 प्रकरणे असलेली ही जगातील सर्वात मोठी लिखित स्वरुपाची राज्यघटना आहे.
परिवर्तनियता व ताठरता यांचा समतोल
अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशाच्या तुलनेत परिवर्तनीय व ताठर राज्यघटना म्हणून आपली घटना आहे. यात 368 च्या कलमांनुसार दुरुस्तीची तरतूद आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने दुरुस्तीसाठी मंजुरी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे परिवर्तन व ताठरता याचा समतोल साधला गेला आहे. जनतेचे सार्वभौमत्व-आम्ही भारतीय जनता ही घटना आमच्यासाठी निर्माण करून भारतीय जनतेकडे ती सुपूर्द केलेली आहे. अशी उद्देशपत्रिका यात आहे. यात भारतीय जनतेचे सार्वभौमत्व मान्य केलेले आहे.
18 वर्ष पूर्ण करणाऱ्याला मताधिकार देऊन सत्ता निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडे दिलेली ही राज्यघटना आहे. जनतेचे सार्वभौमत्व हे एक वैशिष्ट्य. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य-भारतावर कोणलाही अंतर्गत वा बाह्य शक्तीचे नियंत्रण नसल्याने भारत सार्वभौम राज्य असेल. सर्वांगीण विकास साध्य करणारे समाजवादी, कोणत्याही धर्माचे वर्चस्व नसलेले धर्मनिरपेक्ष, निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडे अंतिम सत्ता असलेले प्रजासत्ताक गणराज्य असे ही वैशिष्ट्येपूर्णता राज्यघटनेत आहे.
मुलभूत अधिकारआपल्या राज्यघटनेत कलम 14 ते 32 या कलमांमध्ये मुलभूत अधिकारांची नोंद स्पष्टपणे केलेली आहे. यात स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार, मालमत्ता अधिकार व घटनात्मक उपाय योजना अधिकार असे सात अधिकार आहेत. तथापी 1976 साली झालेल्या 44 व्या घटना दुरुस्तीत मालमत्ता अधिकार यातून वगळला आहे. घटनेत या अधिकारांच्या नोंदी असल्याने संरक्षणाची जबाबदारी शासन व्यवस्थेवर आहे.
संसदीय शासन पद्धती
राज्यघटनेतील कलम 74 व 75 नुसार पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचे अधिकार स्पष्ट आहेत. राष्ट्रपतीचे आणीबाणीचे अधिकार, मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्याचे मंत्रीमंडळ यांचे अधिकारही स्पष्ट आहेत. त्यांची निश्चिती आहे. यातूनच संसदीय शासनपद्धतीची दिशा दिसते. राज्याच्या धोरणांसंबधी मार्गदर्शक तत्वे-स्वातंत्र्यानंतर भारताच्या सर्वांगीण विकासास शासन व्यवस्थेला काही निर्णय घेता यावेत यासाठी आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचा यात स्पष्ट उल्लेख आहे.
ही मार्गदर्शक तत्वे बंधनकारक नाहीत. त्या विरोधात म्हणजे सरकार विरोधी दाद मागता येत नाही. ही उणीव दूर करण्यासाठी 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीत मार्गदर्शक तत्वांचा मुलभूत अधिकारापेक्षा जास्त महत्त्व दिले आहे.
प्रौढ मताधिकार - राज्यघटनेत कोणताही भेदभाव न करता 21 व्या वर्षी मताधिकार दिला होता. मात्र 1989 साली झालेल्या 61 व्या घटना दुरुस्तीनंतर तो 18 वर्षापर्यंत केला. यामुळे जनतेचे सार्वभौमत्व सिद्ध होते. एकेरी नागरिकत्व-भारतातील विविधतेचा विचार करता त्या विविधतेतून एकात्मता निर्माण व्हावी यासाठी एकेरी नागरिकत्वाचा पुरस्कार घटनेत केलेला आहे. हेही एक वैशिष्ट्य होय.
अल्पसंख्याकांना संरक्षण
भारतामध्ये सामाजिक, आरथिक दृष्टीने न्याय व समता निर्माण होणाऱ्या उद्देशाने मागासलेल्या जाती, जमाती, अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी राज्यघटनेत तरतूद केली आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांचे संरक्षण होते. धर्मनिरपेक्ष राज्य-1976 साली झालेल्या 42 व्या घटना दुरुस्तीत, राज्यघटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख करण्यात आला.
भारत हे कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे राष्ट्र नसेल तर ते सर्वधर्माच्या नागरिकांचे राष्ट्र असेल. घटनेचे कलम 25 ते 28 नुसार धर्माचे आचरण करण्याचा अधिकार नागरिकांना दिला. कल्याणकारी राज्य-समता, बंधुता आणि स्वातंत्र्य यांच्या आधारे भारत हे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची असते. यात कोणताही भेदभाव अपेक्षित नाही. मार्गदर्शक तत्वांच्या आधारे व्यक्तींचा सर्वांगीण विकास साध्य करून आपले राज्य कल्याणकारी करण्याचा मूळ हेतू राज्यघटनेत आहे.
स्वतंत्र न्यायव्यवस्था व कायदे मंडळभारतीय राज्यघटनेत स्वतंत्र न्याय व्यवस्था असून घटनेने न्यायालयाचे स्वातंत्र्य मान्य केले आहे. न्यायाधीश स्वतंत्रपणे व नि:पक्षपातीपणे न्याय देऊ शकतील अशा तरतूदी यात आहेत. इंग्लंडच्या संसदीय शासनपद्धतीप्रमाणे द्विगृहात्मक कायदेमंडळाच्या पद्धतीचा भारताने स्वीकार केलेला आहे. राज्यघटनेतील कलम 79 मध्ये भारतीय संघ राज्यासाठी संसद असेल, अशी तरतूद केलेली आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असेल असे यात नमूद आहे. राज्यसभा हे कायम स्वरुपी असे सभागृह आहे तर लोकसभेचा कार्यकाळ पाच वर्षे इतका आहे. राज्यसभेसाठी 250 सदस्य संख्या असून लोकसभेसाठी 545 सदस्य संख्या आहे. कायदा निर्मिती अधिकार लोकसभेला, त्याला नियंत्रण राज्यसभा ठेवू शकते अशी रचना यात आहे. एकूणच भारतीय संघराज्य शासनपद्धतीचा विचार करुनच द्विगृह कायदे मंडळ पद्धतीचा स्वीकार झालेला आहे.
आपली राज्यघटना म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातून आणि तत्कालिन विचारांतून जे विचारधन निपजले त्याचा परिपाक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठी अशी ही राज्यघटना लिहिली. ही राज्यघटना परिवर्तनता व ताठरता याचा समतोल साधणारी आहे. जनतेचे सार्वभौमत्व, धर्म निरपेक्ष-लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य, मुलभूत अधिकार नोंद, संसदीय शासन पद्धती, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृहात्मक कायदेमंडळ, अल्पसंख्याक संरक्षण, प्रौढमताधिकार अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये यात आहेत.