Thursday 14 April 2022

ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला

🥉 २००० : करनाम मल्लेश्वरी : भारोत्तालन

🥉 २०१२ : सायना नेहवाल : बॅडमिंटन

🥉 २०१२ : मेरी कॉम : बॉक्सिंग

🥈 २०१६ : पी वी सिंधू : बॅडमिंटन

🥉 २०१६ : साक्षी मलिक : कुस्ती

🥈 २०२० : मीराबाई चानू : भारोत्तोलन

🥉 २०२० : पी वी सिंधू : बॅडमिंटन

🥉 २०२० : लवलीना बोरगोहेन : बॉक्सिंग

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”

🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

🔸 जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

🔸 देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

राज्य लोकसेवा आयोग

घटना कलम क्र. 315 नुसार प्रत्येक घटना राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग असेल. परंतु दोन राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग निर्माण करण्याचा अधिकार राज्यसरकारला आहे.

राज्यसेवा आयोगाचा उद्देश : अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.

रचना : राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवितील इतके सदस्य असतात.

नेमणूक : भारताचे राज्यपाल करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ : राज्यपाल देतात.

राजीनामा : राज्यपालाकडे 

कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर रहातात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...