Ads

26 April 2022

भारतातील औद्योगिक धोरण

भारतातील औद्योगिक धोरण
भारतातील औद्योगिक धोरण : ईस्ट इंडिया कंपनीकडून १८५० मध्ये राज्यकारभार राणीकडे जाईपर्यंत व तद्नंतरही ब्रिटिश राज्यसत्तेने भारतात खुल्या व्यापाराचे तत्त्व अंगिकारिले होते. अविकसित व ऱ्हास होत जाणाऱ्या भारतीय उद्योगधंद्यांस तर ते संपूर्णपणे घातक होतेच, परंतु नव्याने उदयास येऊ शकणार्‍या उद्योगांसही ते मारक होते. उदा., भारतीय कापडधंदा जेव्हा उदयास येऊ लागला, तेव्हा लँकाशरच्या व्यापाऱ्यांनी संरक्षक नसलेल्या व केवळ कर उत्पन्नासाठी लादलेल्या कापडावरील आयात कराबद्दल ओरड करण्यास सुरुवात केली व ही तफावत भरून काढण्यासाठी भारतात उत्पादन होणाऱ्या कापडावर १८९४ मध्ये कर लादला गेला. १८८० साली तसेच १९०१ साली नेमलेल्या ‘दुष्काळ पाहणी समिती’ने दुष्काळांना तोंड देण्यासाठी भारतात औद्योगिकीकरण करण्याची सूचना केली; पण ती अंमलात आणली गेली नाही. उत्तर प्रदेश व मद्रास प्रांतांत उद्योगधंद्यांना मदत करण्याचे प्रयत्‍न केले गेले. परंतु अशा प्रयत्‍नांना मध्यवर्ती सरकार व ब्रिटिश भांडवलदारह्यांनी कडवा विरोध केला. ह्या काळात नाव घेण्यासारखे झालेले सरकारी प्रयत्‍न म्हणजे, लॉर्ड कर्झनने उद्योगधंदे व व्यापार ह्यांचे खाते सुरू केले (१९०५) आणि व्यापारी व तांत्रिक शिक्षणाच्या काही सोयी उपलब्ध केल्या, हे होत

पहिल्या महायुद्धाच्या काळात सरकारने आपल्या अलिप्त व प्रतिकूल औद्योगिक नीतीत बदल केला व त्याचा परिपाक म्हणून १९१६ साली औद्योगिक आयोगाची नियुक्ती करण्यात आली. युद्धकाळात ब्रिटिशांना साम्राज्याकडून औद्योगिक गरजा भागविणे आवश्यक होते व त्यासाठी वसाहतीचे औद्योगिकीकरण होण्याची निकड होती. ह्याच काळात देशाच्या औद्योगिक विकासासाठी भारतात स्वदेशी चळवळीनेही जोर धरला. युद्धोत्तर काळात भारतीय बाजारात इतर देशांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठीभारतीय व ब्रिटिश कारखानदारीला संरक्षण देण्याचे धोरण सरकारला आखावे लागले. १९१९ साली उद्योगधंद्यांची वाढ हा विषय प्रांतिक सरकारच्या कक्षेत आला. प्रांतिक सरकारने लघु- व कुटीर- उद्योगधंद्यांच्या वाढीकरिता प्रयत्‍न केले व औद्योगिक शिक्षण देण्याकरिता काही शाळा सुरू केल्या. उदा., धनबाद येथील ‘माइनिंग स्कूल’, मुंबई येथील ‘टेक्स्टाइल टेक्‍नॉलॉजिकलइन्स्टिट्यूट’ आणि लुधियाना व भागलपूर येथील ‘होजिअरी अँड सिल्क इन्स्टिट्यूट’. त्याचप्रमाणे प्रांतिक सरकारांनी राज्यांतील उद्योगांना साहाय्यकारी कायदे केले.

लोकमताच्या दबावामुळे १९१७ साली जकातविषयक स्वायत्ततेचा संकेत सरकारने मान्य केला व १९२३ साली सरकारने राजकोषीय आयोगाची नेमणूक केली व या आयोगाने आखलेल्या त्रिसूत्री धोरणानुसार दुसरे महायुद्ध सुरू होईपर्यंत भारतीय उद्योगधंद्यांना संरक्षण दिले गेले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुरू झालेल्या योग्य अशा उद्योगधंद्यांना युद्धोत्तर काळात संरक्षण देण्याचे धोरण सरकारने १९४० साली जाहीर केले; १९४५ साली ‘अंतरिम प्रशुल्क मंडळा’ची नेमणूक केली. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जरूर असणार्‍या धंद्यांना संरक्षण देणे हे कार्य ह्या मंडळाकडून अपेक्षित होते. १९४९ साली सरकारने जकातविषयक धोरण ठरविण्याकरिता राजकोषीय आयोगाची नेमणूक केली. आयोगाच्या शिफारशींचा मुख्य उद्देश संकीर्ण औद्योगिक विकास हा होता

युद्धोत्तर काळात राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे, लोकांचे राहणीमान सुधारणे, रोजगारीत वाढ करणे ह्या ध्येयांच्या पूर्तीकरिता गतिमान औद्योगिक धोरणाची जरूरी होती. त्याकरिता नियोजनबद्ध औद्योगिक विकासाची गरज होती. ह्या धोरणाला दृश्य स्वरूप देण्यासाठी १९४४ साली सरकारने ‘योजना व विकास खाते’ निर्माण केले.

युद्धोत्तर काळात उत्पादन घटत होते व किंमती वाढत होत्या. औद्योगिक आघाडीवरील वातावरणात स्थिरता आणण्याकरिता व भांडवल गुंतवणुकीबद्दल विश्वास वाढविण्यासाठी सरकारने १९४८ साली आपले औद्योगिकधोरण जाहीर केले. हे औद्योगिकधोरण सरकारच्या एकूण आर्थिक नीतीशी सुसंगत असेच होते. राहणीमानात व राष्ट्रीय उत्पादनात वाढ व्हावी, आर्थिक आघाडीवर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने वाटचाल करावी व एकंदर रोजगारीत वाढ व्हावी, असे या आर्थिक नीतीचे स्वरूप होते. या आर्थिक नीतीसाठी गतिमान औद्योगिकधोरणाची आवश्यकता होती. १९४८ च्या औद्योगिकधोरणाचे स्वरूप स्थूलमानाने तीन भागांत सांगता येईल :

(१) जे उद्योगधंदे सरकारी क्षेत्रात आहेत, त्यांची मक्तेदारी सरकारकडेच रहावी;
(२) सरकारने इतर विशिष्ट औद्योगिक क्षेत्रांत नवीन उद्योग सुरू करावेत,पण खाजगी क्षेत्रातील चालू उद्योग धंदेताब्यात घेऊन येत;
(३) राहिलेल्या विभागात खाजगी क्षेत्राला संपूर्ण पणेवाव असावा आणि राष्ट्रहिता करिता आवश्यक असलेलेच नियंत्रण ह्या विभागातील उद्योग धंद्यांवर ठेवावे.

ह्या धोरणाला अनुसरून उद्योगक्षेत्राची विभागणीतीनभागांत करण्यात आली :

(१) सरकारी मक्तेदारीचे व्यवसाय, उदा., संरक्षण, रेल्वे, अणुशक्ती.
(२) दुसऱ्या विभागात खाजगी क्षेत्रातील उद्योग अपवादात्मक परिस्थिती सोडून पुढील दहा वर्षे तसेच खाजगी क्षेत्रात चालू ठेवण्याची सूचना करण्यात आली; परंतु या क्षेत्रातील उद्योगधंद्यांच्या पुढील विस्ताराची जबाबदारी सरकारने आपल्या शिरावर घ्यावी व ही जबाबदारी पार पाडताना परिस्थित्यनुसार खाजगी क्षेत्राचे सहकार्यही घ्यावे, अशी तरतूद होती. त्याप्रमाणे या क्षेत्रात पोलाद, खनिज द्रव्ये, कोळसा, जहाजबांधणी, विमानबांधणी, टेलिफोन व तारायंत्रे ह्यांची सामग्री वगैरे उद्योगधंद्यांची वाढ करण्याची प्रत्यक्ष जबाबदारी सरकारने अंगिकारली. सरकारने अंगिकारलेल्या मिश्र अर्थव्यवस्थेचे दृश्य स्वरूप ह्या विभागात दिसते.
(३) उरलेल्या औद्योगिकक्षेत्रातखाजगीउद्योगधंद्यांना संपूर्ण वाव देण्यात आला, परंतु ह्याही क्षेत्रात राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत व ज्यांचा संतुलित प्रादेशिक विकास होणे आवश्यक आहे, अशा कापड, औद्योगिकरसायने, साखर, लोकरीच्यागिरण्या, सिमेंट, कागद, यंत्रावजारेइ. उद्योगांवर सरकारी नियंत्रण ठेवण्याचे योजिले.

औद्योगिक प्रगतीसाठी भांडवलाचा अंतर्गत तुटवडा लक्षात घेऊन परकीय भांडवलाचा भारतात ओघ वाढविण्याकरिता सरकारने परकीय भांडवलाविषयी जाहीर केलेल्या धोरणाचे स्थूल स्वरूप खालीलप्रमाणे होते:

(१) हिंदी भांडवलाला दिलेल्या सवलती परकीय भांडवलास उपलब्ध करणे,
(२) भांडवल व त्यावरील नफा स्वदेशी परत नेण्याची परकीय भांडवलदारांना पूर्ण मुभा देणे आणि
(३) परकीय भांडवलाचा उपयोग राष्ट्रहितासाठी व्हावा, यासाठी आवश्यकते नियंत्रण ठेवणे.

पहिल्या पंचवार्षिक योजनेतील (१९५१ – ५६) औद्योगिक विकासाचा कार्यक्रम १९४८ च्या औद्योगिक धोरणानुसार आखला गेला. मिश्र अर्थव्यवस्थेचे संपूर्ण फायदे घेण्यासाठी खाजगी क्षेत्रावर लागणाऱ्या नियंत्रणाची निकड लक्षात घेऊन १९४९ साली सरकारने उद्योगधंदे विकास व नियंत्रण विधेयक लोकसभेपुढे ठेवले व त्या विधेयकाची अंमलबजावणी १९५२ पासून सुरू झाली. ‘औद्योगिकविकास व नियमन अधिनियम १९५१’ या कायद्याने औद्योगिक वाढीची दिशा ठरवून देण्याचे व औद्योगिक क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले. या कायद्यामुळे सरकारला कोणत्याही उद्योगाचा कारभार तपासण्याचा व त्याचे व्यवस्थापन नीट होत नाही असे आढळून आल्यास, तो आपल्या ताब्यात घेण्याचा किंवा त्याच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला. या कायद्यामध्ये सूचित उद्योगांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे वा पदार्थांचे समानतेने व उचित किंमतींना वितरण होत आहे किंवा नाही, हे केंद्र शासनाने पाहण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या अधिकाराचा वापर करून देशातील साधनसंपत्तीचे सुयोग्य उपयोजन, मोठ्या व लहान उद्योगधंद्यांचा समतोल विकास आणि उद्योगांचे सम्यक् प्रादेशिक विभाजन करणे, हे केंद्र शासनाचे ध्येय आहे.

पहिल्या योजनेला आधारभूत असलेल्या १९४८ च्या औद्योगिक धोरणाचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या (१९५६ – ६१) सुरुवातीलाच पुनर्विचारकरावा लागला. पहिल्या औद्योगिक धोरणानंतर अनेक राजकीय व आर्थिक बदल झाले. भारताने १९५० साली नवे संविधान करून लोकसत्ताक राज्यपद्धीचा स्वीकार केला. पहिलीपंचवार्षिक योजना बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. समाजवादी समाजरचना हे भारतीय नियोजनाचे या पुढील उद्दिष्ट आहे, ही गोष्टही या कालखंडात स्पष्ट झाली. या सर्वांशी सुसंगत अशा नव्या औद्योगिक धोरणाची घोषणा करणे अत्यावश्यक होते. संविधानातील ‘सर्वांना काम’ आणि ‘सामाजिक न्याय’ या दोन ध्येयांना अनुलक्षून रोजगारी वाढविणे व आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करणे क्रमप्राप्तच होते. नव्या औद्योगिक विकासाचावेग वाढविण्याकरिता एकीकडे मूलभूतव अवजड उद्योगांवर पुढील काळात भर देण्याचे, तर दुसरीकडे समाजवादी समाजरचनेला अनुलक्षून सरकारी उद्योगधंद्यांच्या क्षेत्राची व्याप्तीही वाढविण्याचे ठरविण्यात आले. १९५६ च्या औद्योगिक धोरणाच्या मसुद्यात वरील धोरणाला सुसंगत असे सर्व उद्योगधंद्यांचे वर्गीकरण तीन विभागांत करण्यात आले:

(१) राज्यसत्तेचे संपूर्ण वर्चस्व असलेले उद्योग : कोळसा, लोखंड व पोलाद, खनिज तेले, काही अवजड यंत्रसामग्री, सर्वसाधारण विद्युत्-यंत्र-सामग्री;
(२) विकासाच्या दृष्टीने महत्त्व असलेले सरकारी क्षेत्रात वाढविण्याचे उद्योगधंदे. या क्षेत्रात नवीन उद्योगधंदे स्थापन करण्याची जबाबदारी सरकारने घेतली. उदा., यंत्रावजारे, अ‍ॅल्युमिनियम, प्रतिजैविक पदार्थ, खते, सागरवाहतूक आणि
(३) खाजगी क्षेत्र- एक व दोन यांमध्ये अंतर्भूत नसलेल्या उद्योगांचा या विभागात समावेश करण्यात आला.

लघुउद्योगांना व कुटीरोद्योगांना १९५६ च्या औद्योगिक धोरणात रोजगारी, विकेंद्रित अर्थव्यवस्था व उभारणीस लागणारे अल्प भांडवल ह्या तीन कारणांमुळे महत्त्वाचे स्थान दिले गेले. विशेषतः योजनेतील अवजड व मूलभूत उद्योगधंद्यांना वाढीकरिता बरेच भांडवल खर्च होणार असल्यामुळे उपभोग्य वस्तूंच्या पुरवठ्याकरिता लघुउद्योगांवरव कुटीरोद्योगांना भर दिला गेला. परकीय भांडवलाविषयी पूर्वीच्याच धोरणाचा पुनरुच्चार करण्यात आला. औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या भागांचा विकास साधून विभागीय समतोल राखण्याचे धोरण ह्या मसुद्यात अंतर्भूत केले होते; त्याचप्रमाणे औद्योगिक विकासाबरोबर लागणारा तांत्रिक व व्यवस्थापकीय वर्ग निर्माण करण्याकरिता तांत्रिक व व्यवस्थापकीय शिक्षणाची सोय वाढविण्याचे योजिण्यात आले. औद्योगिक विकासाच्या प्रयत्‍नात कामगारांचे हार्दिक साह्य मिळविण्याकरिता त्यांच्या कामाच्या व राहणीच्या स्थितीत सुधारणा करण्याचे ह्या धोरणात सरकारने घोषित केले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा (१९६१–६६) आराखडा तयार करताना पुढील काळातील औद्योगिक विकासाचा वेग व पुढील योजनांच्या औद्योगिक लक्ष्यांचे, विशेषतः रोजगारीचे व राष्ट्रीय उत्पन्नाचे, इष्टांक ठरविण्यात आले व औद्योगिक वाढीचा आराखडा आखण्यात आला. दुसर्‍या योजनेप्रमाणे तिसऱ्या  पंचवार्षिक योजनेत अवजड उद्योगधंद्यांना अग्रक्रम देण्यात आला; वाहतूक, खनिजे ह्यांवरही भर देण्यात आला. कारण या क्षेत्रात, विशेषतः तंत्रज्ञानात व यंत्रज्ञानात, झपाट्याने परिणामकारक प्रगती होणे पुढील काळातील अपेक्षिलेल्या, स्वयंचलित अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होते. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतीलऔद्योगिक विकासाची दिशा १९५६च्या औद्योगिक धोरणानुसार ठरली गेली.

१९६६—६८ हा काळ वार्षिक योजनांचा होता. त्यापैकी पहिल्या दोन वर्षांत औद्योगिक विकासाची गती कुंठित झाली होती. परंतु १९६८ मध्ये औद्योगिक उत्पादन पुन्हा वाढू लागले. या काळात सरकारच्या औद्योगिक धोरणात विशेष बदल झाला नाही. आवश्यक तेथे उत्पादनवाढीचे प्रयत्‍न करण्यात आले. उदा., वर्तमानपत्रांसाठी लागणाऱ्या कागदाचे उत्पादन नेपा कारखान्याने वाढविले. वाढता उत्पादनखर्च व औद्योगिक प्रकल्पांच्या पूर्तीसाठी होत असलेला विलंब, या समस्यांकडे विशेष लक्ष पुरविण्याची आवश्यकता ध्यानी आली.

चौथ्या पंचवार्षिक योजनेत (१९६९–७४) १९५६च्या ठरावातील औद्योगिक धोरणच जारी ठेवण्यात आले. मूलभूत व मोक्याचे उद्योगधंदे सरकारी क्षेत्रात राखून ठेवून त्यांचे क्षेत्र विस्तारण्यात आले. खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांनासुद्धा विकासास वाव देण्यात आला. तिसऱ्या योजनेने विकासासाठी अंगिकारलेला उद्योगधंद्यांचा अग्रक्रम अबाधित चालू राहिला व औद्योगिक संरचनेमधील असमतोल कमी व्हावा या दृष्टीने प्रयत्‍न करण्यात आले. शिवाय खालील उपायांनी औद्योगिक विकासास गती देण्यात येऊन साधनसामग्रीचा पर्याप्त उपयोग करण्याचे धोरण पाळण्यात आले :

(१) उद्योगधंद्यांच्या हल्लीच्या क्षमतेचा अधिक पूर्णत्वाने उपयोग करणे,
(२) तृतीय योजनेतील अपुरे प्रकल्प त्वरित तडीस नेणे व
(३) सरकारच्या सामाजिक धोरणास बाध न येता नवीन कारखाने काढण्याऐवजी हल्लीच्या कारखान्यांचेच उत्पादन वाढविण्याचा शक्य तेथे प्रयत्‍न करणे.

नियोजित औद्योगिक धोरणाचा संमिश्र अर्थव्यवस्था हा पाया होता. वैयक्तिक प्रेरणा व सामाजिक नियंत्रण ह्यांचा सहयोग, हे मिश्र अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. भारतीय लोकजीवनात अंगिकारलेल्या लोकशाहीत औद्योगिक स्वातंत्र्य अभिप्रेतहोतेच, पण त्याबरोबरच औद्योगिक स्वातंत्र्याच्या गैर उपयोगाला प्रतिबंध करण्याकरिता त्या स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवणे व त्यास योग्य वळण लावणेही आवश्यक होते. मिश्र अर्थव्यवस्थेत स्वातंत्र्य व नियंत्रण ह्यांचा योग्य समन्वय होतो,असा सरकारचा विश्वास असल्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेचा सरकारने औद्योगिक क्षेत्रात स्वीकार केला. परंतु औद्योगिक प्रगतीला गती देण्याकरिता ज्या ज्या ठिकाणी सरकारने औद्योगिक क्षेत्रात प्रभावीपणे भाग घेणे अनिवार्य झाले, त्या त्या ठिकाणी सरकारने ती आपली जबाबदारी मानून सरकारी क्षेत्राचा विस्तार केला आहे अर्थव्यवस्था, मिश्र; सरकारीउद्योगधंदे.

औद्योगिक विकास व नियमन अधिनियम १९५१च्या अन्वये सूचित उद्योगांचा विकास व नियमन ह्यांबाबत केंद्र सरकारला सल्ला देण्यासाठी एक ‘केंद्रीय उद्योगविषयक सल्लागारी परिषद’ स्थापन करण्यात आलेली आहे; त्याचप्रमाणे, विविध उद्योगांकरिता विकास परिषदा स्थापण्यात आलेल्या असून सध्या अशा तेरा परिषदा पुढील उद्योगांकरिता कार्य करीत आहेत:

(१) कागद, लगदा व संबंधित उद्योग,
(२) औषधउद्योग,
(३) मोटरगाडी, सुटे भाग, वाहतुकीची इतर वाहने, ट्रॅक्टर वगैरेंचे निर्मितिउद्योग,
(४) अवजड विद्युत्‌यंत्रे,
(५) कातडी व कातड्याच्या वस्तू,
(६) वस्त्रनिर्मिती यंत्रे,
(७) मनुष्यनिर्मित वस्त्रोद्योग,
(८) खाद्यपदार्थ प्रक्रियाउद्योग,
(९) तेल, प्रक्षालक व रंग,
(१०) कार्बनिक रसायने,
(११) अकर्ब रसायने,
(१२) साखर व
(१३) यंत्रहत्यारे.

लोकर व लोकरीचे सूत ह्या उद्योगासाठी नेमलेल्या विकास परिषदेची पुनर्रचना केली जात आहे. अलोह धातू व मिश्रधातू ह्यांच्यासाठी नेमलेली विकास परिषद रद्द करण्यात आली असून तिच्याऐवजी एक सल्लागारी परिषद स्थापण्यात आली आहे. ह्या विकास परिषदांवर संबंधित उद्योगाचा व्यवस्थापक वर्ग, कामगार, ग्राहक  व तज्ञ ह्यांचे प्रतिनिधी असतात. ह्या परिषदांचे कार्य, कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे तसेच त्या त्या उद्योगांशी संबंधित उद्योगधंद्यांच्या सेवाक्षमतेत सुधारणा करणे, हे असते. विविध उद्योगांचा अभ्यास करण्यासाठी वारंवार तज्ञांच्या समित्या व मंडळे नेमली जातात. ‘उद्योग विकास कार्यपद्धति- समिती’ च्या शिफारशींनुसार निरनिराळे उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी लागणारी केंद्रशासनाची संमती मिळविण्याबाबतच्या कार्यपद्धतीत बराच सोपेपणा आणला गेला आहे.

शासकीय सुधारणा आयोग व नियोजन आयोग ह्यांच्या शिफारशींच्या आधारे आणि जुलै १९६७ मध्ये नेमलेल्या औद्योगिक परवाना धोरण चौकशी समितीने जुलै १९६९ मध्ये सादर केलेला आपला अहवाल लक्षात घेऊन, परवाना धोरणात बदल करण्यात आला आहे. ह्या बदललेल्या धोरणानुसार ज्या उद्योगांची स्थिर मत्तास्वरूपात एक कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक नसेल (ह्याला विशिष्ट संरक्षित उद्योग, लघुक्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आलेले उद्योग, तसेच मूल, महत्त्वाचे व संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले उद्योगधंदे अपवाद आहेत), अशा उद्योगधंद्यांना परवाना कायद्याच्या तरतुदींतून माफ करण्यात आले आहे. अर्थात ह्या उद्योगांनी पुढील कलमे पाळणे आवश्यक आहे:

(१) उद्योगधंदा मोठ्या उद्योगसमूहाच्या मालकीचा असता कामा नये,
(२) तो परदेशी कंपनीने किंवा तिच्या शाखेने वा तिच्या गौण कंपनीने काढलेला नसावा,
(३) ह्या उद्योगाला अवजड यंत्रसामग्रीची परदेशातून आयात करण्यासाठी १० लक्ष रुपयांपर्यंत किंवा स्थिर मालमत्तेच्या वाढीव मूल्याच्या १०% रक्कम, या दोहोंपैकी कोणतीही कमी असेल तेवढीच रक्कम परदेशी चलनाकरिता उपलब्ध होऊ शकेल;

तसेच ह्या उद्योगाने कच्चा माल, सुटे भाग वगैरेंकरिता परदेशी चलन खर्च करता कामा नये. त्याचप्रमाणे परवाना मिळालेल्या ज्या उद्योगधंद्यांची गुंतवणूक पाच कोटी रूपयांच्या मर्यादेत आहे, अशांना एक कोटी रूपयांपर्यंत आपल्या धंद्यांच्या विस्ताराकरिता जादा परवाना लागत नाही. औद्योगिक परवाना धोरणातील वरील सुधारणांमुळे, पूर्वीचे जे उद्योगधंदे परवानामुक्त ठरले होते. ते पुनश्च परवाना-आवश्यकतेच्या चौकटीत आणले गेले; तथापि पूर्वीची परवानामुक्त गुंतवणूक मर्यादा २५ लक्ष रुपये होती. ती आता एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

फेब्रुवारी १९७० मध्ये औद्योगिक परवाना धोरणात जे फेरबदल करण्यात आले त्यांतील महत्त्वाचे फेरबदल असे होते:

(१) उद्योगांचे एक ‘गाभा क्षेत्र’ मानण्यात आले व त्यामध्ये मूलभूत आणि मोक्याच्या अशा नऊ उद्योग गटांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या विकासाच्या सविस्तर योजना आखल्या जाऊन त्यांच्यासाठी आवश्यक निविष्टी व परकीय चलन राखून ठेवण्याची व्यवस्था करण्याचे ठरले. १९५६च्या औद्योगिक धोरण प्रस्तावाने सरकारी क्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या उद्योगांखेरीज इतर गाभा क्षेत्रातील उद्योग विशेष मोठ्या उद्योगसंस्थांना व परकीय दुय्यम कंपन्यांना गुंतवणुकीसाठी मोकळे करण्यात आले.
(२) पाच कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात मानावयाचे व सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योगसंस्थांना व परकीय दुय्यम कंपन्यांना द्यावयाचे ठरले.
(३) मध्यम क्षेत्रात मात्र (जेथे गुंतवणूक एक कोटी रूपयांहून अधिक आहे ते उद्योग वगळून) इतरांनाच सढळ हाताने परवाने द्यावयाचे. फक्त त्यांना परकीय चलन हवे असेल, तरच त्यांची परवाने देण्यापूर्वी कसून चौकशी करावयाची.
(४) लघुउद्योगांसाठी आरक्षणाचे धोरण पूर्वीसारखे चालूच ठेवावयाचे.
(५) कृषिउद्योग व शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांच्या बाबतीत सहकारी क्षेत्रातील संस्थांना अग्रक्रम द्यावयाचा.
(६) एक कोटी रु.च्या आत गुंतवणूक असल्यास उद्योगसंस्थांना परवाने काढण्याची गरजच राहिली नाही; मात्र त्यांची एकूण स्थिर मत्ता पाच कोटी रु.हून अधिक असता कामा नये व त्यांनी काही विशिष्ट अटींची पूर्तता केली पाहिजे.
(७) निर्याताभिमुख संस्थांना विशेष अग्रक्रम द्यावयाचा. उत्पादनाच्या विशिष्ट प्रमाणात निर्यात करण्यास तयार होणाऱ्या मोठ्या उद्योगसंस्थांना व परकीय कंपन्यांच्या शाखांनासुद्धा उत्पादन वाढविण्यास परवानगी द्यावयाची. अशा रीतीने या धोरणात उत्पादन वाढीची गती मंद होणार नाही अशी तरतूद करण्यात आली.

फेब्रुवारी १९७३ मध्ये शासनाने औद्योगिक परवाना धोरणात काही फेरफार केले, परंतु नव्या धोरणाने काही वेगळे परिणाम घडून येण्याची शक्यता फारशी दिसत नाही. उद्योगसंस्था नियंत्रणाच्या कक्षेत येण्यासाठी मत्तेची मर्यादा ३५ कोटी रु. वरून २० कोटी रु. पर्यंत उतरवून बाह्यतः नियंत्रणाचे कार्यक्षेत्र विस्तारल्यासारखे दिसते. परंतु संस्था एकमेकांशी निगडित असल्या पाहिजेत, तर त्यांना ही नियंत्रणे लागू होतात. एकाधिकार (मक्तेदारी) कायद्याखाली प्रत्येकी २० कोटी रुपयांहून अधिक मत्ता असलेल्या विशेष मोठ्या उद्योगसमूहांच्या सु. १,५०० कंपन्यांपैकी ४५० कंपन्यांहूनही कमीच एकमेकींशी निगडित म्हणून मक्तेदारी व निर्बंधक व्यापार प्रथा आयोगाकडे नोंदण्यात आल्या आहेत.

फेब्रुवारी १९७३ च्या धोरणात गाभा क्षेत्रातील उद्योगांची संख्या फेब्रुवारी १९७० मध्ये नऊ होती, ती एकोणीसपर्यंत वाढविली असून त्यांच्यात काही अनावश्यक उद्योगांचाही समावेश झाला आहे. याचाच अर्थ मोठ्या उद्योगसमूहांना विकासास अधिक संधी फेब्रुवारी १९७३ पासून मिळाली आहे. म्हणूनच परवाना पद्धतीचा औद्योगिक विकासावर नियंत्रण ठेवण्यास फारसा उपयोग होत नसून तीमुळे आपले आश्रित निवडण्याचे एक साधन शासनास  उपलब्ध होते, अशी त्यापद्धतीवर टीका करण्यात येते.

औद्योगिक विकासाच्या धोरणामुळे रोजगारात वाढ होऊन शेतकीतील अतिरिक्त श्रमिकांना उद्योगधंदे कितपत सामावून घेऊ शकतील; केवळ औद्योगिक नव्हे, तर इतर अनेक क्षेत्रांत विकासाच्या प्रयत्‍नांचीभारतास कशी गरज आहे व भारतीयांच्या समाजसंस्था, चालीरीती व त्यांच्या वृत्ती यांमुळे औद्योगिक विकासाच्या धोरणास कशा मर्यादा पडतात, याचे दिग्दर्शन गन्नार मीर्डालसारख्या तज्ञांनी केले आहे. ते ध्यानी घेऊनच भारताने आपले पुढील औद्योगिक धोरण घडविणे श्रेयस्कर होईल.

भारतातील उद्योग धंदे

भारतातील उद्योग धंदे


भारतातील काही प्रमुख उद्योग व विकास
महत्वाचे मुद्दे
भारतातील काही प्रमुख उद्योग व विकास
सूती वस्त्र उद्योग
लोकरी वस्त्रोद्योग
साखर उद्योग
ताग उद्योग
रेशीम उद्योग
लोह पोलाद उद्योग
उद्योग


सूती वस्त्र उद्योग
           उद्योग – सूती वस्त्र उद्योग हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. भारतातील पहिली कापड गिरणी कावसजी नाना भाय दावर यांनी २२ फेब्रुवारी १८५४ रोजी मुंबई येथे सुरू केली. देशातील पहिली कापड गिरणी फोर्ट ग्लास्टर येथे सुरू झाली. पण ती कापड गिरणी तात्काळ बंद पडली. सूती वस्त्र उद्योग याचा वाटा राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात १४ टक्के आहे. मुंबई, मालेगाव, इचलकरंजी ही शहरे सुती वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत.

लोकरी वस्त्रोद्योग
            लोकरी वस्तू उद्योग साठी कानपूर येथील “लाल ईमली” हि देशातील पहिली लोकर गिरण सुरू झाली. यानंतर १८८१ मध्ये धारीवाल पंजाब, १८८२ मुंबई आणि १८८६ मध्ये बंगलोर कर्नाटक येथेही लोकर गिरण्या सुरू झाल्या. पंजाब मधील धारीवाल अमृतसर लुधियाना खरार येते २५७ लोकर गिरण्या आहेत आणि त्याचा उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. महाराष्ट्र मध्ये मुंबई येथे ३१ आहेत आणि त्याचा उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशामध्ये कानपूर, शहाजहानपूर, मिर्झापूर, आग्रा, वाराणसी येते लोकरीचे ३७ गिरण्या आहेत आणि त्याचा तिसरा क्रमांक लागतो. त्यानंतर गुजरातमध्ये जामनगर, अहमदाबाद, बडोदा, कलोल येथे १० गिरण्या आहेत आणि त्याचा चौथा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया, इटली व UK मधून आयात केलेल्या लोकरीपासून महाराष्ट्रात वस्त्रे तयार केली जातात.

साखर उद्योग
            सागर हा उसाच्या कच्च्या मालापासून तयार होतो. साखर उद्योग हा कृषी-आधारित देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. उत्तर प्रदेश हे उसासाठी सर्वाधिक क्षेत्र आहे. भारत हा जगातील ऊस व साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र मध्ये साखर उत्पादनात प्रथम क्रमांक आहे. आणि उत्तर प्रदेशाचा दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्र मधील अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुणे या जिल्ह्यात ३५ टक्के साखर उत्पादन तयार होते. आणि उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर, देवडीया, मेरट, सहारनपुर २४ टक्के साखर उत्पादन तयार होते. तामिळनाडूमध्ये कोईमतुर, तिरुचिरापल्ली, करुर, तिरुप्पुर येथे साखर उत्पादन ९.५३ टक्के होते. आंध्र प्रदेशामध्ये पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा, चित्तूर येथे ५.८ टक्के साखर उत्पादन होते. गुजरात मध्ये सुरत, भावनगर,अमरेली, बनासकांठा, जुनागढ येथे ५.५६ टक्के साखर उत्पादन होते. भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश असे ओळखले जाते. १०० टन उसापासून १० ते १२ टन साखर मिळते.

ताग उद्योग
          ताग उद्योग हा सुती वस्त्रोद्योग यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्रोद्योग आहे. १८५५ साली कोलकत्ता जवळ रिश्रा याठिकाणी भारतातील पहिली ताग गिरणी सुरू झाली. तागाचे उपयोग दोर आणि यासारख्या अनेक उत्पादनासाठी केला जातो. पश्चिम बंगाल मधील कोलकात्ता, हावडा, टिटाघर, बालीगंज, नैहाती, भद्रेश्वर येथे ६४ ताग गिरण्या आहेत आणि त्याचा उपयोग ८४% होतो. त्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये गुंटूर विशाखापट्टणम एलूरू ओंगोल चिलीवेसला येथे सात ताग गिरण्या आहेत त्याचा दुसरा क्रमांक लागतो व तेथे तागाचा उत्पादन १० टक्के केला जातो. देशांमधील एकूण ८३ ताग गिरण्या आहेत. ताक उत्पादक विकास महामंडळाकडून ताग उद्योगाचे व्यवस्थापन केले जाते. ताग उत्पादनात पश्चिम बंगाल हे राज्य देशात आघाडीवर आहे.

रेशीम उद्योग
            रेशीम उद्योग हे शेतीस पूरक व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन यासारखाच त्यातला एक रेशीम उद्योग आहे. रेशीम उद्योगामध्ये कमी वेळेत जास्त उत्पादन मिळते. भारतात रेशीम उद्योगांमध्ये टसर एरी मुग तुती या चार प्रकारचे रेशीम उत्पादन केले जाते. रेशीम उत्पादनात जगामध्ये चीनचा प्रथम क्रमांक लागतो तर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. रेशीम उत्पादनात कर्नाटक हे अग्रेसर राज्य आहे.

रेशीम उद्योग हे कर्नाटक मध्ये कूर्ग, म्हैसूर, मंड्या, तुमकुर येते तुतीचे उत्पादन केले जाते. या शहरांमध्ये ५०% रेशीम उत्पादन केले जाते. पश्चिम बंगाल मध्ये बीरभूम, मालदा, मुर्शिदाबाद, बांकुरा येथे तुती प्रकारचे उत्पादन घेतात आणि तेथे रेशीम उद्योगाचा उत्पादन १३ टक्के होतो. स्वतंत्र रेशीम संचालनालयाची स्थापना महाराष्ट्र मधील नागपूर येथे करण्यात आली. रेशीम उद्योगामध्ये बंगळुरू हे भारतातील रेशमाची राजधानी म्हणून ओळखले जाते. आसाम मधील रेशीम उद्योगासाठी सोलकूची हे प्रमुख केंद्र आहे.

लोह पोलाद उद्योग
               लोह पोलाद उद्योग हे महत्त्वाचे मिश्रधातू आहे. लोह पोलाद उद्योग अवजड स्वरूपामुळे त्याचे स्थानिकीकरण कोळसा क्षेत्राजवळ करतात. लोह पोलाद हे झारखंड मधील जमशेदपूर बोकारो रांची येथे त्यांचा प्रकल्प आहे.. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापुर असंनसोल कुल्टी बर्नपुर येथे लोगो पोलादाचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

देशातील लोह पोलाद उद्योग यांचे व्यवस्थापन स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत पाहिले जाते. पश्चिम बंगालमधील फुलती येते भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना १८६४ साली सुरू झाला. भारताचा पोलाद उत्पादनात चौथा क्रमांक लागतो. जमशेदपूर येथे खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा लोह पोलाद उद्योग सुरू करण्यात आला. लोखंड व कार्बन यांच्या मिश्र धातूंना लोह पोलाद असे म्हणतात. पोलाद हा बीडा पासून तयार करतात.

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ?

विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय ?
“विरुदार्थी शब्द म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याच्या परस्पर विरोधी अर्थ काढणारा शब्द” किंवा “एखाद्या शब्दाच्या उलट अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे विरुदार्थी शब्द होय. दोन विरुदार्थी शब्दामध्ये (x) असं लिहतात उदाहरणार्थ : लहान x मोठे ,जड x हलके.

250 Opposite Words List in Marathi :

नेता x अनुयायी
स्वच्छ x गगढूळ
स्वहित x परमार्थ
प्राचीन x अर्वाचीन
सरस x निरस
उन्नती x अवनती
कर्कश x संजूल
प्रतिकार x सहकार
गमन x आगमन
गद्य x पद्य
सुभाषित x कुभाषित
अमर x मृत्य  
अडाणी x शहाणी
अथ x इति
अजर x जराग्रस्त
अधिक x उणे
अटक x सुटका
अलीकडे x पलीकडे
अवघड x सोपे
अंत x प्रारंभ
अचल x चल
अचूक x चुकीचे
अति x अल्प
अर्थ x अनर्थ
अनुकूल x प्रतिकूल
अडचण x सोय
अपेक्षित xअनपेक्षित
उपकार x अपकार
उग्र x सौम्य
उचित x अनुचित
अथ x इति
अजर x जराग्रस्त
अमर x मृत्य
अधिक x उणे
अलीकडे x पलीकडे
अवघड x सोपे
अंतर x प्रारंभ
अंथरूण x पांघरूण
अचलर x चल
अचूक x चुकीचे
अडाणी x शहाणा
अटक x सुटका
अतिवृष्टी x अनावृष्टी
अती x अल्प
अर्थ x अनर्थ
अनुकूल x प्रतिकूल
अभिमान x दुरभिमान
अशक्य x शक्य
अंधकार x प्रकाश
अशक्त x सशक्त
अपेक्षाभंग x अपेक्षापूती
घाऊक x किरकोळ
चढ x उतार
चल x अचल, स्थिर
चढाई x माधार
चढणे x उतरणे
चवदार x बेचव
चपळ x सुस्त
चंचल x स्थिर
चांगले x वाईट
चूक x बरोबर
चोर x पोलीस
चिमुकला x थोरला
चिरंजीव x अल्पजीवी
छोटी x मोठी
छोटेसे x मोठेसे
जड x हलके
जय x पराजय
जवळची x लांबची
जगणे x मरणे
जमा x खर्च
जबाबदार x बेजबाबदार
जर x तर
जलद x हळू
जागणे x झोपणे
जास्त x कमी
जागरूक x निष्काळजी
जागृत x निद्रिस्त
जाणे x येणे
भय x अभय
भयंकर x सौम्य
भयभीत x निर्भय
भव्य x चिमुकले
भसाडा x मंजुळ
भरती x आहोटी
भान x बेभाम
भारतीय x अभारतीय
भाग्यवंत x दुर्भागी
भांडण x सलोखा
भिकारी x सावकार
भूकर x तहान
भूषण x दूषण
महान x क्षुद्र
मधुर x कडवट
महाल x झोपडी
मऊ x टणक
मंदर x प्रखर
मंजुळ x कर्कश
माता x पिता
माथाx पायथा
माय x बाप
मालक x नोकर
मान x अपमान
माया x द्वेष
माघारा x सामोरा
मान्य x अमान्य
म्हातारा x तरुण
मिटलेले x उघडलेले
मित्र x शत्रू
थोरला x धाकटा
थोडे x जास्त
दया x राग
दयाळू x जुलमी
दाट x विरळ
दीन x रात
दिवस रात्र
दीर्घ x-हस्व
आस्था x अनास्था
आदर x अनादर
आडवे x उभे
आयात x निर्यात
आंधळा x डोळस
ओला x सुका
ओली x सुकी
ओळख x अनोळख
इकडे x तिकडे
इथली x तिथली
इष्ट x अनिष्ट
इमानी x बेइमानी
इच्छा x अनिच्छा
इलाज x नाइलाज
इहलोक x परलोक
उघडे x बंद
उच x नीच
उजेड x काळोख
उदासवाणा x उल्हासित
उच्च x नीच
उतरणे x चढणे
उत्तम x क्षुद्र
उद्घाटन x समारोप
उदासः x प्रसन्न
उदार x अनुदार कृपा
उधार x रोख
दुःख x सुख
दुष्काळx सुकाळ
दुष्ट x सुष्ट
देशभक्त x देशद्रोही
देव x दानव, दैत्य
दृष्ट x सुष्ट
दोषी x निर्दोषी, निर्दोष
द्वेष x प्रेम
धनवंत x निर्धन, कंगाल।
धडधाकट x कमजोर
धर्म x अधर्म
धाडसर x भित्रेपणा
धूसर x स्पष्ट
धिटाई x भित्रेपणा, भ्याडपणा
धीट x भित्रा
धूत x भोळा
नफा x तोटा
नवे x जुन
नम्रता x उद्धटपणा
निर्मळ x मळकट
लक्ष x दुर्लक्ष
लाडके x नावडते
लांब x जवळ
लांबी x रुंदी
लोभी x निर्लोभी
वाकडे x सरळ
वापर x गैरवापर
वृद्ध x तरुण
विचार x अविचार
विद्यार्थी x शिक्षक
विक्षास x अविश्वास
विलंब x त्वरीत
विशेष x सामान्य
विद्वान x अडाणी
विष x अमृत
विरोध x पाठिंबा
विसरणे x आठवणे
वेडा x शहाणा
वेगातार x हळूहळू
व्यवस्थित x अव्यवस्थित
शत्रू x मित्र
शहर xखेडे
शकून x अपशकुन
शंका x खात्री
शेवट x सुरवात
शिखर x पायथा
शिकारी x सावज
शिस्त x बेशिस्त
शिक्षा x शाबाशकी
अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती
अंथरूण पांघरूण
अग्रज x अनज
अनाथ x सनाथ
अतिवष्ट x अनावी
अधोगती x प्रगती, उन्नती
अबोल x वाचाळ
अबू x बेअब्रू
अल्लड x पोक्त
अवखळ x गंभीर
अवजड x हलके
आरंभ x शेवट
आठवण x विस्मरण
आशा x निराशा
आता x नंतर
आत x बाहेर
मान्य x अमान्य
म्हातारा x तरुण
मिटलेले x उघडलेले
मित्र x शत्रू
मैत्री x दुश्मनी
मोठा x लहान
मोकळे x बंदिस्त
मौन x बडबड
जागरूक x निष्काळजी
जागृत x निद्रिस्त
जाणे x येणे
जिवंत x मृत
जिंकणे x हरणे
जीत x हार
जेवढा x तेवढा
जोश x कंटाळा
झोप x जाग
झोपडी x महाल
टंचाई x विपुलता
टिकाऊ x ठिसूळ
ठळक x पुसट
डौलदार x बेदप
तरुण x म्हातारा
तहान x भूक
मृत्यू x जीवन
मुका x बोलका
मूर्ख x शहाणा
यशस्वीर x अयशस्वी
यश x अपयश
येईल x जाईल
योग्य x अयोग्य
आवडते x नावाडते
आवश्यक x अनावश्यक
तीक्ष्ण x बोथट
तिरके x सरळ
थंड x गरम
रेखीव x खडबडीत
रिकामे x भरलेले
लहानपण x मोठेपण
लवकर x उशिरा
लबाड x भोला
थोर x लहान

समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ

समानार्थी शब्द व त्यांचे अर्थ

शब्द समानार्थी शब्द

अंगकाठी -=
अंगबांध , अंगयष्टी , शरीरयष्टी
अंगविक्षेप -= हावभाव , हातवारे
अंगार -=
विस्तव , निखारा , इंगळ
अंजली -= ओंजळ
अंत -=
शेवट, समाप्ती , मुर्त्यू , अखेर
अंतःकरण -= हृदय ,मन
अंतर -=
स्थलावकाश , कालावकाश ,खंड , फरक , विपिरितपणा , भेदभाव , तफावत , मन
अंतधार्न -= अदृश्य , लुप्त
अंतभेदी – = घरभेद्या , फितूर
अंदाज – =
कयास , तर्क , अदमास , अटकळ , अनुमान
अंधार – =
काळोख , तिमिर , अंधकार ,तम
अंधेरनगरी -= आकाश , आतील बाजू
अकंटक -=
निष्कंटक , संकटरहित , अजातशत्रू , निर्विघन
अकट -=
आग्रही , हट्टी , चिकट , चेंगट , हेकेखोर , हेकट
अकटोविकट -=
प्रचंड , अवाढव्य , बेढब , अगडबंब , भयप्रद , भयानक , अत्यल्प
अक्क्कड -=
एट , डॉल , नखरा , दिमाख , गर्व , ठसका , रुबाब , तोरा , घमेंड , पीळ , अवडंबर
अंकांचन – =
निष्कांचन , निधर्न , गरीब , दिन , अकिचन , नीरक्षीत , दीनवाणा , लाचार , कफल्लक , रँक , भणंग , विपन्न , कंगाल , अगतिक
अकृत्रिम -=
नेसर्गिक , सहज , खरे , स्वाभाविक , अंगीभूत , स्वयंभू
अखंड – =
अभंग , सलग , एकसंध , अविच्छिन्न , संपूर्ण , अख्खा , अक्षत
अगडबंब – =
लठ्ठ , धिप्पाड , अवजड , जडशीळ , भारी , स्थूल , बोजड , जड
अगत्य – =
आस्था , आपुलकी , कळवळ , काळजी , आवजून
अग्र – =
टोक , कळस , शेंडा , दशी , अंचळी , आगरडा , आरोसा , शेष्ठ , कळस , शिरोभाग , उंच , प्रथमस्थान
अगाध -=
अथांग , गहन , खोल , अमर्याद , अपार , गंभीर , प्रगाढ , अगम्य
अग्रणी -=
मुख्य , नायक , मार्गदर्शक , पुढारी , नेता , आग्या , अर्गसर , अध्वयू , अर्गवती , अग्रीम
अग्नी -=
विस्तव , पावक , वन्ही , वैश्वानर , आग , आगेल , हुताशने , ज्वाला , अंगार , वडवानल , वणवा , जाळ , अग्रीशीखा
अघ -=
पाप , दोष , गुन्हा , अपराध , अधम
अघटित -=
असंभाव्य , दिलक्षण , लोकोत्तर , अपूर्व , नवलपूर्ण , चमत्कारी , अद्भुत , अजब , अभूतपूर्व
अघोर – =
अचाट , भयांकर , अमंगल , भीतीदायक , राक्षसी , वाईट , दारुण , आसुरी ,
अचपळ -=
खोडकर , चंचल , तरतरीत , चैतन्यपूर्ण , गतिमान
अचरट – =
वाह्यात , अयोग्य , अविचारी, वार्त्य , बावळट , खोडकर
अचाट – =
फार , अतिशय , विलक्षण , फाजील , भलतेच , अजब , अमानवी अतिमानवी , बेफाट , बेसुमार , पराकोटी
अचानक – =
अनपेक्षित , अकस्मात , एकाएकी , अवचित , आक्सिमिक अकल्पित , कर्मधर्मसंयोग , अभावीत
अचेत -=
अचेतन , जड , चैत्यन्यरहित , निर्जीव , प्राणरहित , चैतन्यहीन , निष्प्राण , निपचित , निचेष्ट
अछोडा- =
कासरा , दोर, चाबूक , दावण , दावे , लगाम , रस्सी , नाडा , वादि , रज्जू ,
अजंगम – =
स्थावर , न हलणारे , अचल
अजर – =
वृधत्वहीन , शाशवंत , अविनाशी , चिरतरुण
अजस्त्र -=
मोठा , प्रचंड , विस्तृत , अवाढव्य , महाकाय , अगडबंब , स्थूल
अजिंक्य – =
दुभेद , दुलघ्य , अजेय , अपराजित , अदम्य , दुर्दमणीय , अजित , अमोघ
अटकर – =
बांधेसूद , नीटनेटका , प्रमाणबंध , नीटस ,
अटकळ – =
अजमास , अंदाज , तर्क , नियम , रूढ , रीत , भाकीत , ठोकताळा , आडाखा , स्थूलमान , होरा
अटकाव – =
अडथळा , प्रतिरोध , आडकाठी , प्रतिबंध , मज्जाव , अडसर , व्यत्यय , अटकाव , अवरोध , खळ मनाई , हरकत
अट्टाहास – =
आग्रह , अत्याग्रह , हेका , मोठ्याने हसणे , आक्रोश
अटंग – =
अवाढव्य , अफाट , विस्तीर्ण
आठवण – =
ध्यान , समरण , स्मृती , धारणा
अठवर – = अविवाहित
अडक – =
आडनाव , कुलनाम , उपनाम
अदगा – =
अडाणी , अशिक्षित , अज्ञ
अडबंद – =
कटिसूत्र , करदोटा करदोडा , करधनी
अतिथी – =
पाहुणा , पांथस्थ , अनाहूत मनुष्य , अभ्यागत , सोयरा
अतिरेक – =
बेसुमार , कळस , पराकाष्ठ , अमर्याद
अत्यंत – =
अतिशय , असंख्य , अमित , अगणित , अपरिमित , अपार , असीम , पुष्कळ , अमर्याद , अपरंपार
अथवा – = अगर ,
अथीमाय – = बायल्या , नामर्द
आथिलेपण – =
थोरपण , भाग्य , सामथ्र्य
अद – = अर्धा , निम्मा
अद्भुत – =
अपूर्व , आचर्यकारक , चत्मकारिक , विलक्षण
अधःपतन – =
खाली पडणे , नरकवास जाणे
अधम – =
नीच , हलका , शूद्र , शुलक , दुष्ट , अधर्मी
अधांतरी – =
हवेत , अंतराळात , निराधार , निरालंब, स्त्रिशूल स्तिथी
अधाशी – =
हावरा , लोभी , खंदाड , हपापलेला , बुभुक्षित , हलकट , अधोड
अधिकारी -=
सत्तास्थान , जबाबदारीची जागा , प्रभुत्व , हक्क , अमल , ताबा , हुकूमत , अधिपत्य , प्रभूता
अधिपती – =
स्वामी , धनी , मालक , अधिश , राजा ,
अधिष्ठान – = वास , निवास , वास्तव्य
अधिक्षेप – = निंदा , दूषण , हेटाळणी
अधीर – =
उतावीळ , चंचल , अस्थिर , स्वछंदी
अधू – =
व्यग असलेला , कुरूप , पंगू , अपंग
अधोगती – =
पतन , दुर्गती , अवंती , अधःपात , अपकर्ष , उतरती कळा
आध्यत्म – =
आत्म्याबद्दलचे ज्ञान , ब्रह्मज्ञान , परमात्माविषयी ज्ञान
अध्याय – =
खंड , पर्व , विभाग , प्रकरण
अनंग – =
अंगरहित , निराकार , मदन , कामदेव
अनर्थ – =
अरिष्ठ , संकट , अर्थहीनता , निर्थर्क , अर्थशून्य
अनशन – =
उपवास , निराहार , अन्नत्याग
अनसूया – = मत्सरशिवाय , अत्रीपत्नी
अनाठायी – = अयोग्य , तर्कविरहित
अनाड – = अडाणी , उनाड , द्वाड
अनाथ – =
पोरका , आईवडिलांशिवाय , दिन , नीरक्षीत , निराधार ,
अनिल – =
वायू , वारा , अष्टवसुपैकी एक
अनावर – =
मोकाट , अनियंत्रित , निरंकुश , बेछूट , बेफाम , बेभान
अनुकंपा – = दया , करूना , कृपा
अनुक्रम – = परंपरा , ओळ , पद्धत
अनुक्रमणिका – = क्रमवार यादी , सूची
अनुकूल – =
फायदेशीर , उपकारी , इष्ट , पथ्थकारक
अनुध्वनी – =
अनुभूती , प्रत्यय , प्रचिती , प्रत्यंतर , प्रतीती साक्षात्कार , आस्वाद ,
अनुमोदन – =
पसंती , मान्यता , कबुली , संमती , सहमती , दुजोरा , होकार , समर्थन , पाठींबा , पुष्टीकरण
अनुरक्त – =
इच्छायुक्त , अनुरागी , प्रेमबन्ध , आसक्त
अनुरूप – =
सुसंगत , जुळणारे , शोभणारे , यथायोग्य , यथोचित
अनुशासन – =
आज्ञा , कायदा , नियम , व्यवहार
अनुशीलन – =
परिशीलन , हव्यास , आसक्ती
अनुषंग – =
संगती , भागीदारी , सोबत
अन्वय – = संबंध , आधार , संयोग
अन्वेषण – =
शोध , संशोधन , चोकशी
अपकार – = इजा , नुकसान , दुःख
अपजय – = पराजय , पराभव
अपमान – =
अनादर , मानभंग , अप्रतिष्ठा , अवमान , मानहानी , अवहेलना , तेजोभंग , बेइज्जत , मानखंडना
अपंग – =
व्यंग , लुळा , विकल, पंगू , विकलांग , दिव्यांग , पांगळा
अपत्य – = मूल , संतान , संतती
अपभ्रश – =
विकार , नाश , हानी , मूळ , भाषेतील शब्दाची विकृती
अपरोक्ष – = साक्षात , समक्ष , प्रत्यक्ष
अपहार – =
उचलेगिरी , लाचलुचपत , आर्थिक , अफरातफर , फसवणूक , गंडवणे
अपशय – = ऱ्हास , उतार , क्षय
अप्रतिम – =
अजोड , अदितीय , अतुल्य , अनुपम , अतुलनीय , उत्कुष्ट , असामान्य
अफवा – =
कंडी , वाती , भुमका , वदंता ,वावडी , खोटी बातमी
अभद्र – = वाईट गोष्टी , अरिष्ट
अभिजात – =
कुलीन , सभ्य , थोर , प्रतिष्ठित, जातिवंत , विशुद्ध
अभिधान – =
नाव , उल्लेख , अर्थबोध
अभिनय – =
हावभाव , अंगविक्षेप , साँग , नक्कल , अनुकरण
अभिनव – =
नवीन , नूतन , अपूर्व , नवे , आधुनिक
अभिभव – = पराभव , पराजय
अभिमत – = प्रिय , संमत , पसंत
अभिमान – = गर्व , ताठा , तोरा , मान
अभियोग – =
खटला , फिर्याद , आरोप , आळ , दोष
अभिरुची – =
चव , गोडी , आवड , विशेष रुची
अभिलाषा -= इच्छा , हेतू , लोभ , हाव
अभिवादन – =
नमस्कार , प्रणिपात , नमन , वंदन
अभिवृद्धी – =
वाढ , उत्कर्ष , भरभराट , प्रगती , उन्नती , उत्तस्थान , वर येणे
अभिशाप – =
आरोप , आळ , ठपका , शाप , निंदा
अभ्यास – =
व्यासंग , सराव , परिपाठ
अभ्यूदय – =
उत्कर्ष , भरभराट , उत्थान
अमंगल – = अशुभ , अनिष्ट , खराब
अमानुष – =
मानवी कृत्वाबाहेरचे , दैवी , स्वर्गीय , हिसंक , अद्भुत , अमानवीय
अभाळ – = शुद्ध , शुभ्र
अमीर उमराव – =
सरदार मंडळी , बडे लोक , वैभव
अमोघ – =
अचूक , योग्य , गुणदायी , रामबाण , प्रभावी
अमृत – = सुधा , पियुष , संजीवनी
अयनक – =
चष्मा , उपनेत्र , आरसा, दर्पण , काच आयना
अयस – = लोखंड , पोलाद
अबूद -=
राकट , आडदांड , खेडवळ , दशकोटी
अर्धचंद्र – =
उचलबांगडी , गचांडी , हकालपट्टी
अरण्य -=
जंगल , रान वन , विपीन , कांतार , अटवी , अडव, कानन
अरी – =
शत्रू , वैरी , दुश्मन , टोचणी
अरिष्ट – =
संकट , अशुभ गोष्ट , दुदैर्व
अरुवार – =
कोमल , नाजूक , मृदू , सुंदर अळुमाळू
अर्चना- =
पूजा , अर्चा , उपासना , सेवा
अर्जुन – =
पाच पांडवांपैकी तिसरा , पार्थ , धनंजय , फाल्गुन , जिशनु , भारत , विजय , किरीट
अर्थात – = कारणामुळे , ओघानेच
अवार्च्य – =
नीच , हलकटपणाचे भाषण
अलंगनॉबत – = डंका , निशाण , पहारा
अलिंद – = ओटा , देवडी , गोपुर
अलिप्त – =
वेगळे , निराळे , निर्मल , असंलन्ग
अल्क – = क्षार , खार
अल्लड – =
अननुभवी , कच्चा , अज्ञानी
अवकळा – =
अवदशा , तेजोहीन , दुदर्शा
अवकाश – =
अवधी , वेळ, समय , सवड , रिकामी जागा काल, सवड , भेद
अवकृपा – = गैरमर्जी , राग , नाखुषी
अवगुंठन – = वेष्टन , बुरखा , लपेटा
अवडंबर – =
भंपका , डॉल, देखावा , डामडोल , स्तोम , प्रस्थ , थाटमाट ,आदंबर
अवधात – =
उनाड , खोडकर , हट्टी , अवचित्या , खोडसाळ , अवखळ
अवनती – = अपकर्ष , दुर्दशा
अवबोध – = ज्ञान , जागृती , जाणीव
अवलोकन – = निरीक्षन , पाहणी

वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करणे

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


वाक्प्रचार मराठी व्याकरण |vakyaprachar
वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करणे.

(१)  हात दाखवून अवलक्षण करणे.

  अर्थ - आपणहून संकट ओढवून घेणे.

वाक्य- जंगलतोड करून माणूस स्वतःहून हात दाखवून अवलक्षण करतो.

२) अंगाचा तीळपापड होणे -

  अर्थ - खूप राग येणे.

  वाक्य • प्रगती पुस्तकातील श्यामलला मिळालेले फार कमी गुण पाहून आईच्या अंगाचा तीळपापड झाला.

३) मूठभर मांस चढणे -

अर्थ - स्तुतीने हुरळून जाणे.

वाक्य - वर्गात सरांनी समीरच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले, तेव्हा समीरच्या अंगावर मूठभर मांस चढले.

४) कवेत घेणे

अर्थ : मिठीत घेणे.

वाक्य :  बऱ्याच वर्षांनी आपली मुलगी माहेरी आली, तेव्हा तिला प्रेमाने कवेत घेतले.

५) मरगळ झटकणे -

अर्थ - आळस सोडणे.

वाक्य - या वर्षी सगळी मरगळ झटकून मोहन सपाटून अभ्यास करू लागला.

६) हातभार लावणे

अर्थ : मदत करणे.

वाक्य - स्वच्छता अभियानामध्ये सर्व गावकऱ्यांनी योजनेला हातभार लावला.

७) चेहरा पडणे -

अर्थ : लाज वाटणे.

वाक्य : महेशच्या काकांनी महेशची लबाडी उघडकीस आणताच महेशचा चेहरा पडला.

८)आ वासून पाहणे

अर्थ : आश्चर्याने स्तिमित होणे.

वाक्य - आयुष्यात प्रथमच सुंदर देखाव्याकडे स्मिता मोठा 'आ' वासून पाहत राहिली.

९)राबता असणे.

अर्थ सतत हालचाल असणे.

वाक्य - सरपंचांच्या कार्यालयात दररोज माणसांचा राबता असतो.

१०) झुंबड उडपणे

अर्थ : खूप गर्दी होणे.

वाक्य : गावात पहिल्यांदाच भरलेल्या जत्रेमध्ये सकाळपासून गावकऱ्यांची झुंबड उडाली.

११)भुरळ पडणे

अर्थ -मोह होणे,

वाक्य : नीताने काढलेल्या सुंदर चित्राकडे पाहून मितालीला भुरळ पडली.

१२) रममाण होणे -

अर्थ - गुंगून जाणे, मग्न होणे.

वाक्य – शाब्दिक कोडे सोडवण्यात प्रकाश नेहमी रममाण होतो.

१३) आनंद गगनात न मावणे.

अर्थ:  खूप आनंद होणे.

वाक्य - बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात पहिला आल्यामुळे सोहमचा आनंद गगनात मावत नव्हता.

१४)हेवा वाटणे

अर्थ - मत्सर वाटणे.

वाक्य - साहिलच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा त्याच्या मित्रांना नेहमी

हेवा वाटतो.

१५) खूणगाठ बांधणे

अर्थ :  दृढ निश्चय करणे.

वाक्य : या वर्षी दिवसरात्र झटून अभ्यास करायचा अशी प्रतीको मनाशी पक्की खूणगाठ बांधली.

१६) सुरंग लावणे -

अर्थ - एखादा बेत उधळून लावणे.

वाक्य - आईने दुपारपासून अभ्यासाबाबत चौकशी करून मुलांच्या  सिनेमाला जाण्याच्या आनंदाला सुरुंग लावला.

१७) हातात हात घालणे

अर्थ : सहकार्य करणे.

वाक्य : गावातील पडीक विहिरीची बांधणी करण्यासाठी गावकन्यांनी हातात हात पावले.

१८)पारंगत असणे -

अर्थ:  तरबेज असणे.

वाक्य :  वयाच्या तिसऱ्या वर्षी छोटा राहुल संगणक वापरण्यात पारंगत झाला.

१९) अंगावर काटा येणे -

अर्थ - भीतीने अंगावरचे केस उभे राहणे.

वाक्य - जंगलातून जाताना समोर अचानक वाघ दिसताच प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

२०) संकोच वाटणे

अर्थ :  शरम वाटणे.

वाक्य - रमेशकडे पैसे मागण्यास उदेशला संकोच वाटला.

२१) सामना करणे -

अर्थ - मुकाबला करणे.

वाक्य - सीमेवर भारतीय जवानांनी शत्रू सैन्याचा शर्थीने सामना केला.