01 May 2022

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; रोमन लिपी: Maharashtra Police ;) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १३ पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

महाराष्ट्र पोलीस
देश
भारत ध्वज भारत
विभाग
पोलीस
आकार
११२,३७२,९७२ (२०११)
ब्रीदवाक्य
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
मुख्यालय
मुंबई
सेनापती
श्री.रजनीश सेठ (फेब्रु 2021)
संकेतस्थळ
महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात १३ आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.

महाराष्ट्र पोलीस प्रमुख अधिकारी
संपादन करा
भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवा (SPS) यादी
संपादन करा
रजनीश सेठ (भारतीय पोलीस सेवा) पोलीस महासंचालक - १९ फेब्रुवारी २०२२
Sanjay Pandey (भारतीय पोलीस सेवा) पोलीस महासंचालक - 10th April 2021
राजनीश सेठ (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त -११ मार्च २०१९
कुलवंत कुमार सरागंल (भारतीय पोलीस सेवा)पोलीस आयुक्त -२ नोव्हेंबर २०१८
एस.जगन्नाथन RR (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त -२६ मार्च २०१९
संजीव कुमार सिंघाल (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त -२० मे २०१९
प्रभात कुमार (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हा अधिकारी) ३१ मे २०१८
राजेश प्रधान (भारतीय पोलीस सेवा) (Estt.)[[ विशेष पोलीस महानिरीक्षक अधिकारी २५ मे २०१९
कृष्ण प्रकाश (भारतीय पोलीस सेवा) (Admn.)विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा १६ मे २०१९
मिलिंद भाराबें (भारतीय पोलीस सेवा) (Admn.) विशेष पोलीस महानिरीक्षक-२१ जून २०१९
ब्रिजेश बी. सिंग (भारतीय पोलीस सेवा) विशेष पोलीस महानिरीक्षक ११ जानेवारी २०१६
मोहम्मद कैसेर खालीद (भारतीय पोलीस सेवा) २८ जून २०१६
प्रताप दिघवेकर (भारतीय पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक ५ मे २०१९
एच.एम.बैजाल (भारतीय पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक २४ आॅगस्ट २०१९
शिला साइल (राज्य पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक 23 ऑगस्ट २०१९
मनोज नवल पाटील (राज्य पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक १६ सप्टेंबर २०१९
व्ही.बी.देशमुख (भारतीय पोलीस सेवा) सहायक पोलीस महानिरीक्षक ३१-७-२०१८
अभिषेक भगवान त्रिमुखे (भारतीय पोलीस सेवा) सहायक पोलीस महानिरीक्षक १६-७-२०१९
जयश्री कोंडिबा जाधव (राज्य पोलीस सेवा) आर्थिक गुन्हा अधिकारी ७-५-२०१९
बालसिंग खंडुसिंग राजपुत (राज्य पोलीस सेवा) ८-३-२०१६
सचिन सुरेश पांडेकर (१-११-२०१८)
विशेष ऑपरेशन
संपादन करा
राजेंद्र सिंह (RR) २५-३-२०१९
बजराज बनसोडे (राज्य पोलीस सेवा) २२-७-२०१९
दहशतवाद विरोधी पथक
संपादन करा
देवेन भारती (भारतीय पोलीस सेवा) अतिरिक्त पोलीस महासंचालक १६-५-२०१९
डॉ.सुहास वारके (भारतीय पोलीस सेवा) विशेष पोलीस महानिरीक्षक २०-२-२०१९
जयवंत नाईकवारे (भारतीय पोलीस सेवा)
विनाय कुमार राठोड (राज्य पोलीस सेवा)
विक्रम देशमुख ( भारतीय पोलीस सेवा)
रविंद्र सिंग परदेशी
Nagpur ANO
संपादन करा
आर.जी.कदम
एस.एच.रिझावी (PI)
Force One
संपादन करा
डॉ.सुखवीदर सिंग (भारतीय पोलीस सेवा)
किरण कुमार चोहान (राज्य पोलीस सेवा)
संदीप डोईफोडे (राज्य पोलीस सेवा)
अमरसिंह जाधव (राज्य पोलीस सेवा)
राज्य इंटेलिजन्स विभाग
संपादन करा
रेशमी शुक्ला (भारतीय पोलीस सेवा)
अमितेश कुमार
सत्यनारायण
यशस्वी या दव
सुधाकर पठारे भारतीय पोलीस सेवा
अजित अंबादास बोह्राडे राज्य पोलीस सेवा २८-७-२०१९
भरत तागंडे राज्य पोलीस सेवा
संजय जाधव भारतीय पोलीस सेवा
पुरस्वोतंम कराड राज्य पोलीस सेवा
नम्रता पाटील राज्य पोलीस सेवा
रुपाली खैरमोडे राज्य पोलीस सेवा
राजा रामसम्य भारतीय पोलीस सेवा
उज्वला वानकर
रमेश चोपाडे
अनिता पाटील
संदीप जाधव
कल्पना बरवाकर
संजय बारकुंड
रुपाली खौरमोडे
महाराष्ट्र इंटेलिलिजन्स अकादमी
संपादन करा
पी.व्ही.देशपांडे (भारतीय पोलीस सेवा)
बृह-मुंबई पोलीस आयुक्त
संपादन करा
संजय बर्वे भारतीय पोलीस सेवा
नवल बजाज भारतीय पोलीस सेवा
व्ही.के.चौबे
संतोष रस्तोगी
मधुकर पांडे
राजवर्धन
नितीश मिश्रा
लक्ष्मी गौतम
मनोज कुमार शर्मा
दिलीप सावंत
सगकाल विरेश प्रभु
सुनील कोल्हे
एस.जय कुमार
संदीप कार्नीक
ज्ञानेश्वर चैहान
प्रवीन पटवाळ
बृह मुंबई पोलीस आयुक्त - मुख्यालय
संपादन करा
एन.आंबिका IPS
सचिन पाटील IPS
दक्षिण क्षेत्र
संपादन करा
संग्रामसिंग पी. निशादंर IPS
राजीव जैन
रश्मी करंदीकर sps
मध्य क्षेत्र
संपादन करा
अविनाश कुमार IPS
सौरभ त्रिपाठी ips
नियती दावे Rr
पूर्व क्षेत्र
संपादन करा
शशी कुमार मिना IPS
अखिलेश कुमार सिंग IPS
पश्चिम क्षेत्र
संपादन करा
मंजुमनाथ सिंगे sps
परमजीत दहीया IPS
अनिकेत गोयेल
उत्तर क्षेत्र
संपादन करा
मोहन दहिकर sps
डी.एस.स्वामी sps
क्राईम शाखा
संपादन करा
अकबर पठाण sps
शहाजी उमाप ips
क्राईम शाखा-CID
संपादन करा
दत्ता किसन नलावडे sps
सायबर गुन्हा शाखा
संपादन करा
विठ्ठल ठाकूर sps
ॲंटी नारकोटिक्स सेल
संपादन करा
संदीप लाडे IPS
आर्थिक ऑफिस विंग
संपादन करा
पराग मानेरे
विशेष शाखा-१ CID
संपादन करा
गणेश शिंदे sps
प्रशांत कदम
सशस्त्र पोलीस
संपादन करा
सी.के.मीना IPS CRPF
नंदकुमार ठाकूर sps
सुनीता सालुंके ठाकरे sps
सोमनाथ गारगे sps
अश्विनी सानप
वसंत जाधव
कायदा आणि नियम
संपादन करा
प्रनय अशोक
वाहतूक व्यवस्था
संपादन करा
रंजन शर्मा IPS
COMMRS
संपादन करा
मुंबई
पुणे
नागपूर
ठाणे
नवी मुंबई
पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटक
संपादन करा
गुन्हे अन्वेषण विभाग (CID)
राज्य गुप्तवार्ता विभाग
दहशतवाद विरोधी पथक
महाराष्ट्र महामार्ग पोलीस
राज्य राखीव पोलीस बल
प्रशिक्षण आणि खास पथके
नागरी हक्क संरक्षण विभाग
मोटार परिवहन विभाग
पोलीस बिनतारी संदेश विभाग
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग
प्रमुख
संपादन करा
सं.न नाव कार्यालय
१ नारायणराव मारुतीराव कामटे ८ऑगस्ट १९४७ते१०जुलै१९५५
२ मानसिंघजी मेरूजी चुडासमा ११जुलै१९५५ते२४डिसेंबर१९५९
३ कुमार श्री प्रवीणसिंगजी २५डिसेंबर१९५९ते२४जानेवारी१९६०
४ कैकश्रू जहांगिर नानावाती २५जानेवारी१९६०ते२४फेब्रुवारी१९६५
५ सय्यद मजीदुल्लाह २५ फेब्रुवारी१९६५ते१९जानेवारी१९६८
६ अनंत गणेश राजाध्यक्ष २०-जानेवारी-१९६८ ते २८- फेब्रुवारी-१९७५
७ महारुद्र गणपतराव वाघ ०१-मार्च-१९७५ते३१-मे-१९७६
८ इमानुअल सुमित्रा मोडक ०१-जून-१९७६ते३१-मार्च-१९७८
९ श्री.मधुकर गणपत मुग्वे ०१-एप्रिल-१९७८ते३१-मे-१९७८
१० श्रीधर व्यंकटेश तांखीवाला ०१-जून-१९७८ते३१-जुलै-१९७८
११ विनायक वासुदेव चौबाल ०१-ऑगस्ट-१९७८ते३१-ऑक्टोबर-१९७९
१२ वसंत विनायक नगरकर ०१-नोव्हेंबर-१९७९ते१८-मार्च-१९८०
१३ रामदास लक्ष्मण भींगे १९-मार्च-१९८०ते२३- फेब्रुवारी-१९८१
१४ सुशिलकुमार चतुर्वेदी २४- फेब्रुवारी-१९८१ते२४- फेब्रुवारी-१९८२
१५ कृष्णकांत पांडुरंग मेढेक २५- फेब्रुवारी-१९८२ते३०-एप्रिल-१९८५
१६ सुर्यकांत शंकर जोग ०१-मे-१९८५ते३१-जुलै-१९८७
१७ दत्तात्रय शंकर सोमण ०१-ऑगस्ट-१९८७ते३१-मे-१९८८
१८ सत्येंद्र प्रसन्न सिंघ ०१-जून-१९८८ते३१-जानेवारी-१९८९
१९ रामकांत शेशगीरीराव कुलकर्णी ०१- फेब्रुवारी-१९८९ते३१-डिसेंबर-१९८९
२० श्री. वसंत केशव सराफ ०१-जानेवारी-१९९०ते३१-ऑगस्ट-१९९२
२१ एस. राममूर्ती ०१-सप्टेंबर-१९९२ते३०-जून-१९९३
२२ शिवाजीराव विठ्ठलराव बारावकर ०१-जुलै-१९९३ते३१-ऑक्टोबर-१९९४
२३ ए. व्ही. कृष्णन ०१-नोव्हेंबर-१९९४ते३१-ऑक्टोबर-१९९५
२४ सुरेंद्र मोहन पठानिया ०१-नोव्हेंबर-१९९५ते३१-मे-१९९६
२५ अमरजित सिंघ समारा ०१-जून-१९९६ते३०-सप्टेंबर-१९९७
२६ अरविंद सिद्धेश्वर इनामदार ०१-ऑक्टोबर-१९९७ते०५-जानेवारी-२०००
२७ सुभाष चंद्र मल्होत्रा ०६-जानेवारी-२०००ते३०-जून-२००३
२८ ओम प्रकाश बाली ०१-जुलै-२००३ते३१-ऑक्टोबर-२००३
२९ सुरेंद्र मोहन शंगारी ०१-नोव्हेंबर-२००३ते३१-ऑगस्ट-२००४
३० कमल कृष्ण कश्यप ०१-सप्टेंबर-२००४ते३०-एप्रिल-२००५
३१ डॉ. पी.एस. पासरिचा ०१-मे-२००५ते२९- फेब्रुवारी-२००८
३२ अनामी नारायण रॉय ०१-मार्च-२००८ते०७- फेब्रुवारी-२००९
३३ एस. एस. विरक १४-मार्च-२००९ते३१-ऑक्टोबर-२००९
३४ अनामी नारायण रॉय २२-जानेवारी-२०१०ते३१-मे-२०१०
३५ डी. सिवानंधान ३१-मे-२०१०ते२८- फेब्रुवारी-२०११
३६ अजित पारसनीस २८- फेब्रुवारी-२०११ते३०-सप्टेंबर-२०११
३७ के. सुब्रमण्यम ३०-सप्टेंबर-२०११ते३१-जुलै-२०१२
३८ संजीव दयाल ३१-जुलै-२०१२ते३०-सप्टेंबर-२०१५
३९ प्रवीण दिक्षीत ३०-सप्टेंबर-२०१५ते३१-जुलै-२०१६
४० सतीश माथुर ०१-ऑगस्ट-२०१६ते३०-जून-२०१८
४१ डॉ. डी. डी. पडसलगीकर ०१-जुलै-२०१८ते२८- फेब्रुवारी-२०१९
४२ सुबोध कुमार जयसवाल ०१-मार्च-२०१९ ते २२-फेब्रुवारी-२०२१
४३ हेमंत नगराळे २२-फेब्रुवारी-२०२१-आतापर्यंत

गणेश हरी खरे मराठी इतिहास संशोधक

गणेश हरी खरे
मराठी इतिहास संशोधक

गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म : १० जानेवारी १९०१; - ५ जून १९८५)[१] हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ते क्यूरेटर , चिटणीस व नंतर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ग.ह. खरे
जन्म नाव
गणेश हरी खरे
टोपणनाव
तात्या
जन्म
१० जानेवारी, इ.स. १९०१
पनवेल, रायगड
मृत्यू
५ जून, इ.स. १९८५
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ
भाषा
मराठी, इंग्रजी, फार्सी, कानडी, संस्कृत, उर्दू
साहित्य प्रकार
इतिहास
विषय
शिवकाल, पेशवेकाल प्राचीन भारत, मूर्तिशास्त्र
प्रसिद्ध साहित्यकृती
स्वराज्यातील तीन दुर्ग
शनिवारवाडा
ऐतिहासिक फार्सी साहित्य
मूर्तिविज्ञान
आयुष्यक्रम व कार्य
संपादन करा
ग. ह. खरे ह्यांचा जन्म पनवेल इथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

असहकार चळवळीतील सहभाग
संपादन करा
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांचे सहकारी वि. ना. आपटे ह्यांच्यासह खरे ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि असहकारितेच्या तत्त्वाप्रमाणे जामीन द्यायचे नाकारल्याने त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदिवासाची शिक्षा देण्यात आली.[१]

बंदिवासातून ११ ऑगस्ट १९२३ रोजी सुटका झाल्यावर खरे ह्यांनी सातारा जिल्ह्या कॉंग्रेसचे एक चिटणीस म्हणून वर्षभर काम केले. १९२४ च्या उत्तरार्धापासून १९२९ च्या प्रारंभापर्यंत साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.[१]

ह्या काळात खरे ह्यांनी इतिहाससंशोधनासाठी आवश्यक पूर्वतयारी केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. तसेच त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केल्या. त्या लिप्यांतील साहित्य त्यांना वाचता येऊ लागले.

भारत-इतिहास-संशोधक मंडळातील काम
संपादन करा
साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेतील नोकरी सोडल्यावर खरे पुणे येथे आले. भारत-इतिहास-संशोधक मंडळाच्या शिवचरित्र-कार्यालयात मोडी कागदपत्रांच्या लिप्यंतराचे काम त्यांनी काही काळ केेले. ६ महिन्यांनतर त्यांची नेमणूक शिवचरित्र-कार्यालयात करण्यात आली. १९३० साली त्यांची नेमणूक भारत-इतिहास-संशोधक मंडळात करण्यात आली.

भारत-इतिहास-संशोधक मंडळात काम करत असताना खरे ह्यांनी स्वतःच पुस्तकांच्या व फार्सी जाणकारांच्या साहाय्याने फार्सी भाषा व लिपी आत्मसात केली. तसेच कानडी भाषा व लिपी ह्यांचाही अभ्यास केला. जुनी कानडी भाषाही (हळे कन्नड) त्यांना कळू लागली.

खरे ह्यांनी शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७), खंड ११ (१९५८), खंड १२ (१९६४), खंड १३ (१९६५) ह्यांचे संपादन केले. तसेच त्यांनी ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. तसेच त्यांचे इतिहाससंशोधनपर लेखन विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले. खरे ह्यांनी विविध ठिकाणी भ्रमंती करून कागदपत्रे व इतर ऐतिहासिक वस्तू ह्यांचा संग्रह करून तो भारत-इतिहास-संशोधक मंडळाला मिळवून दिला. ह्यात सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख ह्यांचा समावेश आहे.[१] त्यांनी ५०हून अधिक पुस्तके आणि इंग्लश व मराठी ह्या भाषांत मिळून सुमारे ३५० लेख लिहिले आहेत.[१]

मानसन्मान[१]
संपादन करा
इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत-इतिहास-संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग
इंडियन हिस्टरी कॉंग्रेसच्या १९५१ च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद
पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाद्वारे डॉक्टरेट पदवीसाठीचे मार्गदर्शक व परीक्षक
न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या १९७४ च्या अधिवेशनाचे अध्यक्षपद
पुणे विद्यापीठाद्वारे १९८४ साली सन्माननीय डी लिट् पदवी
जानेवारी १९८५ च्या धारवाड येथील पुराभिलेख परिषदेत सत्कार
ग्रंथसंपदा
संपादन करा
लाठी शिक्षक भाग १ ; सातारा; वि. शं. वैद्य; आनंद; सातारा; शके १८४९ (१९२८)
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड १ (अंशतः) (१९३०)
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड २ (अंशतः) (१९३०)
जोशी, शंकर नारायण; खरे, गणेश हरी (१९३०). शिवचरित्र साहित्य खंड ३. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड १ ; पुणे; द. वा. पोतदार; गं. ना. मुजुमदार; आर्यभूषण; पुणे; १९३०; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ३४
श्रीक्षेत्र आळंदी ; पुणे; श्रीपाद रघुनाथ राजगुरू; राजगुरू; पुणे; शके १८५३ (१९३१); भारत-इतिहास-संशोधक मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला : २७
मंडळांतील नाणी ; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३३; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ३७
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड २ ; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३४; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४१
भोर संस्थान ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय प्रदर्शिका ; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३५
शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७)
श्रीविठ्ठल आणि पंढरपूर ; पुणे; गणेश हरि खरे; प्रतिभा; पुणे; शके १८६० (१९३८)
मूर्तिविज्ञान ; पुणे; गणेश हरि खरे; जनार्दन सदाशिव; पुणे; १९३९
शिवचरित्रवृत्तसंग्रह खंड २ (फार्सी विभाग); पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५२
शिवचरित्रवृत्तसंग्रह खंड ३ (फार्सी विभाग); पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४१; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५३
ऐतिहासिक आख्यायिका ; पुणे; वि. गं. केतकर; लोकसंग्रह; पुणे; १९४४; स्वाध्यायमाला (प्रथमविभाग)
हिंगणे दप्तर खंड १ ; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; जनार्दन सदाशिव; पुणे; १९४५; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ७०; श्रीमंत बाबासाहेब इचलकरंजीकर स्मारक ग्रंथमाला : क्र. १; पर्ण १
भोर संस्थान ऐतिहासिक-स्थल-दर्शन ; स्टेट प्रेस, भोर; १९४५
पंढरपूरचा विठोबा ; पुणे; वि. गं. केतकर; लोकसंग्रह; पुणे; १९४७; स्वाध्यायमाला (प्रथमविभाग) पुष्प १२०वे
हिंगणे दप्तर खंड २ (१९४७)
तुलादानविधि ; पुणे; रा. ज. देशमुख; आर्यभूषण; पुणे; १९४८
सिंहगड (इतिहास, वर्णन, उपसंहार); पुणे; वि.सी. चितळे; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४८
दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड ३ ; पुणे; भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४९
शनिवारवाडा ; पुणे; वि.सी. चितळे; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४९
Exploration at Karad , 1949
खरे, गणेश हरी (१९५०). पेशवे दप्तर पत्रे कालनिर्णय सुधारणा. पुणे.
Shanivarvara Palace , 1950
इतिहासकर्ते मराठे , १९५१
विजयनगरसम्राट कृष्णदेवराय , १९५१
संशोधकाचा मित्र , १९५१
इतिहासभ्यासवर्ग व्याख्याने , १९५२
सिंहगड (हिंदी) , १९५३
सर ऑरेल स्टीन , १९५३
शिवचरित्र संशोधनवृत्त रा.श. २७९ , १९५३
शिवचरित्र संशोधनवृत्त रा.श. २८२ , १९५६
शनिवारवाडा (हिंदी) , १९५७
शिवचरित्र साहित्य खंड ११ , १९५८
महाराष्ट्राची चार दैवते , १९५८
आज्ञापत्र , १९६०
खरे, गणेश हरी (१९६०). भारत इतिहास संशोधक मण्डलस्थ हस्तलिखितग्रन्थानुक्रमणिका. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
शिवचरित्र साहित्य खंड १२ , १९६३
शिवचरित्र साहित्य खंड १३ , १९६५
Select Articles , 1966
स्वराज्यातील तीन दुर्ग , १९६७
महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग , १९७१
निवडक लेख , १९७२
शिवचरित्र संशोधनवृत्त रा.श. ३०० , १९७३
निवडक लेख भाग २ , १९७२
मुसलमानकालीन महाराष्ट्र , १९७६
मराठी इतिहासाची विस्तृत शकावली खंड पहिला , १९७७
शहाजी शिवाजी संबंध ; टाऊन हॉल कमिटी , पुणे , १९७९
दुर्ग , सह्याद्री विहार मंडळ, १९८०
खरे, गणेश हरी; कुलकर्णी, गोविंद त्र्यंबक (२००१). मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.१२९६-१६३६). मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.
खरे, गणेश हरी (१९३४). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड १. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
खरे, गणेश हरी (१९३७). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड २. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
खरे, गणेश हरी (१९३९). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ३. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
खरे, गणेश हरी (१९४९). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ४. पुणे: चिटणीस, भारत इतिहास संशोधक मंडळ.
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ५ भाग १ , १९६१
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ५ भाग २ , १९६९
खरे, गणेश हरी; कुलकर्णी, गोविंद त्र्यंबक (१९७३). ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ६. पुणे: चिटणीस,

शंकर नारायण जोशी मराठी इतिहाससंशोधक

शंकर नारायण जोशी
मराठी इतिहाससंशोधक

शंकर पुरुषोत्तम जोशी याच्याशी गल्लत करू नका.
शंकर नारायण जोशी उर्फ शंकर नारायण वत्स ऊर्फ शंकर नारायण वत्स जोशी (जन्म : वाई, १९ फेब्रुवारी १८८९) हे एक मराठी इतिहाससंशोधक होते. ते पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते.

शं.ना.जोशी

शं.ना.जोशी
जन्म नाव
शंकर नारायण जोशी
जन्म
१९ फेब्रुवारी , इ.स. १८८९
वाई, सातारा
शिक्षण
इंग्रजी तिसरी इयत्ता
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
इतिहास संशोधन
भाषा
मराठी संस्कृत
साहित्य प्रकार
इतिहास
चळवळ
मुळशी सत्याग्रह
प्रसिद्ध साहित्यकृती
अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास काळातील राज्यकारभाराचा अभ्यास
शिवचरित्र साहित्य खंड ३, ८
वडील
नारायण जोशी
पत्नी
अन्नपूर्णाबाई जोशी
शिक्षण
संपादन करा
शं.ना.जोशीचे पाचवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पाचवडला झाले. पुढे इंग्रजी शिक्षण कुरूंदवाड व जमखंडी संस्थानच्या हायस्कूल मधे सुरू होते , पण इंग्रजी तिसऱ्या इयत्तेत शिकत असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले . त्यामुळे शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते पाचवडला येऊन शेती करु लागले. शेती व पुढे सुरू केलेला मागाचा कारखाना यात मन रमेना म्हणून १९१० सेली भाऊशास्त्री लेले यांच्याकडे लेखनाचे काम सुरू केले. सोबत प्राज्ञपाठ शाळेत संस्कृतचे अध्ययन सुरू केले. १९१३ साली शं.ना.जोशी पुण्यात आले. ज्ञानप्रकाश व आर्यभूषण छापखान्यात मुद्रिते तपासन्याचे काम त्यांनी सुरू केले. पुढे त्यांचा लोकमान्य टिळकांशी संबंध आला व टिळकांच्या दौऱ्यात स्वयंसेवक म्हणून जोशींनी काम केले. पुढे मुळशी सत्याग्रहात जोशींनी हिरिरीने भाग घेतला.
शं.ना.जोशी ह्यांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे. जोशींच्या घराण्यात सराफीचा व्यवसाय होता , त्यावरून हुंडीवाले जोशी ह्या नावाने ते त्यांचे घराणे प्रसिद्ध होते. जोशी उपनामांची अनेक घराणी होती , त्यामुळे ते स्वतःला वाईकर वत्स गोत्री जोशी म्हणवून घेत असत. वत्स , वत्स जोशी , जोशी वत्स , वाईकर अशी अनेक उपनामे त्यांच्या लेखांमधे व ग्रंथात आढळतात.

इतिहास संशोधन
संपादन करा
आर्यभूषण छापखान्यात मुद्रित संशोधक म्हणून काम करत असताना इतिहास विषयक साहित्य वाचल्याने ते इतिहास अभ्यासाकडे वळले. १९१६ मध्ये न.चिं.केळकराच्या सांगण्यावरून ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करु लागले. तेथील संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली ते इतिहास अभ्यास करु लागले.
इतिहास विषयक सूची व शकवल्या तयार करण्याचे किचकट काम उत्तम प्रकारे करत असत. त्यांनी शिवाजी व संभाजी महाराज , माधवराव पेशवे , आंग्रे, नाना फडणीस, रायगड ह्यांच्या शकावल्या प्रसिद्ध केल्या. मध्ययुगीन ग्रामव्यवस्था , वतनदार व राज्यव्यवस्था ह्याविषयी त्यांनी संशोधन करून अनेक शोधनिबंध लिहिले व ते भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध केले. शिवाजी महाराजांच्या राज्य कारभारावर अभ्यास करून पुणे विद्यापीठासाठी त्यांनी सहा व्याख्याने दिली व ती व्याख्याने पुढे पुस्तकरुपाने प्रसिद्धही करण्यात आली. सातारा जिल्ह्याच्या मराठी आवृत्ती साठो त्यांनी जिल्ह्याचे ऐतिहासिक संशोधन केले. ठिकठिकाणी दौऱ्यावर असताना इतिहास विषयक रसाळ भाषेत ते उत्तम व्याख्याने देत असत. तसेच ऐतिहासिक व्यक्तीच्या चरित्र विषयक अनेक भाषणे जोशींनी पुण्याच्या नभोवाणी केंद्रावरून केली.

सामाजिक व राजकीय सहभाग
संपादन करा
पाचवडला असताना त्यांनी खेडेगावांमधे अनेक शाळा काढल्या. जोशींनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला होता , तेव्हा मुळशी पेट्याच्या इतिहासावर एक निबंध लिहून तो प्रकाशित केला. मुळशी सत्याग्रहासाठी जोशींना तीन महिन्यांची शिक्षाही झाली होती. कांग्रेसच्या अधिवेशनात ते सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून जात असत व तेथे स्वयंसेवकाचे कामही करत असत. तसेच सन्मित्र समाज मेळाव्यातही ते जात असत.

शंकर नारायण जोशी यांचे ग्रंथ
संपादन करा
मुळशी पेट्या संबंधी ऐतिहासिक माहिती , (प्रकाशक - गजानन कानिटकर - मुळशी सत्याग्रह सहाय्यक मंडळ) १९२२
राजवाडे लेखसंग्रह - ऐतिहासिक प्रस्तावना (संपादक - शं.ना.जोशी)
जोशी, शंकर नारायण; खरे, गणेश हरी (१९३०). शिवचरित्र साहित्य खंड ३. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
राजवाडे लेखसंग्रह - संकीर्ण निबंध भाग १ (संग्राहक - शं.ना.जोशी)
राजवाडे लेखसंग्रह - संकीर्ण निबंध भाग २ (संग्राहक - शं.ना.जोशी)
मङ्गलाष्टके विवाह व मौंजीबन्धन जुनी व नवी दोन पुस्तके एकत्र ( प्रकाशक- केशव भिकाजी ढवळे , मुंबई ) १९३४
परांजपे कुलासंबंधी ऐतिहासिक उल्लेख , १९३५
शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड ३ (शके १३४८ - शके १६०२) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७
शिवचरित्र साहित्य खंड ५
संभाजीकालीन पत्रसारसंग्रह (शके १६०२ - शके १६१०) - प्रकाशक - पुणे भारत इतिहास संशोधक मंडळ, १९३७ (नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)
रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था (प्रकाशक - भारत इतिहास संशोधन मंडळ), १९४०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २५ - बापू गोखले पत्रव्यवहार (सहसंपादक - कृ.वा.पुरंदरे) ,१९४१
जोशी, शंकर नारायण (१९४२). शिवचरित्र साहित्य खंड ८. पुणे: भारत इतिहास संशोधक मंडळ.
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, स्थळ वढू बुद्रुक - साधार विवेचन , १९४६
सेनापती दाभाडे दफ्तर , भाग १ला (भारत इतिहास संशोधक मंडळ त्रैमासिक वर्ष ३१ अंक २-३ , १९५१)
ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ३
ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ६
ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ९ - मराठी राजवटींतील कांहीं घाटमार्ग चौक्या व संकीर्ण (भा.इ.सं.मं.त्रैमासिक वर्ष ३५ अंक १-२ , १९५४)
कृष्णदयार्णवकृत हरिवरदा : श्रीमद्‌भागवत दशम स्कंधावरील टीका (पाठभेद, शब्दार्थ, कविचरित्र व विस्तृत प्रस्तावना यांसह) खंड १ला, प्रकाशक - दयार्णव रघुनाथ कोपर्डेकर : पुणे.- १९५५)
जोशी, शंकर नारायण (१९५९). भाऊसाहेबांची बखर (७ वी ed.). पुणे: शं.दा.चितळे.
अर्वाचीन महाराष्ट्रेतिहास कालांतील राज्यकारभाराचा अभ्यास (१६०० - १६८०) , पुणे विद्यापीठ, १९५९
डाकिन्यां भिमाशंकरम् मीमाशंकर क्षेत्र (प्रकाशक - वोरा ऍण्ड कंपनी पब्लिशर्स.लि. मुंबई ) , १९५९
मंत्र्युत्तम नाना फडणवीस उत्सवपन्नाशी व शकावली
कृष्णाजी अनंत सभासद विरचित छत्रपती श्रीशिवाजीराजे यांची बखर , १९६०
हुकुमतपन्हा रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र आणि राजनीति - (सहसंपादक - ल.म.भिंगारे)  कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुणे , १९६०
नाना फडणीस यांचे शब्दात पानिपतचा रणसंग्राम ( विवेचक मिमांसा - शं.ना.जोशी , संकलन - प.म.लिमये , श्री.बा.सोहोनी )
मराठेकालीन समाजदर्शन (संपादक - इतिहास संशोधक शंकरराव जोशी सत्कार समिति | शं.ना.जोशी यांच्या निवडक लेखांचा संग्रह), १९६०

प्रल्हाद नरहर देशपांडे

प्रल्हाद नरहर देशपांडे

प्र.न. देशपांडे (१७ सप्टेंबर, १९३६:पंढरपूर, महाराष्ट्र - २७ मे, २००७) हे १९६९ ते १९९६ ह्या काळात विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे येथे इतिहासाचे अध्यापक, संशोधक व विभागप्रमुख होते. धुळे येथील इतिहासाचार्य वि.का.राजवाडे मंडळ या संस्थेचे ते चिटणीस होते. तसेच मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या संशोधक ह्या त्रैमासिकाचे संपादक होते.१९७१ साली त्यांनी 'मराठा फोर्ट्‌स' ह्या विषयावर पुणे विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. ते अनेक विद्यापीठांचे व संस्थांचे सदस्य होते. त्यांनी इतिहासविषयक १४ पुस्तके व २ कथासंग्रह लिहिले. अनेक इतिहास परिषदांमधून व नियतकालिकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असे.

प्र.न. देशपांडे

प्र.न. देशपांडे
जन्म नाव
प्रल्हाद नरहर देशपांडे
जन्म
१७ सप्टेंबर इ.स. १९३६
पंढरपूर
मृत्यू
२७ मे इ.स. २००७
शिक्षण
एम.ए., पीएच.डी.
राष्ट्रीयत्व
भारतीय
साहित्य प्रकार
इतिहास, कथालेखन
वडील
नरहर देशपांडे
देशपांडे यांनी वि.का.राजवाडे यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्या २१ खंडी ग्रंथसंचाचे पुनःसंपादन करून ही पुस्तके ११ खंडांत परत प्रकाशित केली.

पुस्तके
संपादन करा
आज्ञापत्र
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०१ शिवकाल (मूळ खंड आठवा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०२ शिवकाल (मूळ खंड पंधरावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०३ शिवकाल (मूळ खंड १६, १७, १८), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००२
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०४ शिवकाल (मूळ खंड विसावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०५ शिवकाल (मूळ खंड एकविसावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००४
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०६ (मूळ खंड पहिला), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०७ (मूळ खंड ०२, ०५), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०८ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड तिसरा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ०९ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड चौथा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १० शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड चौथा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ११ शिवकाल (सहसंपादक - सर्जेराव भामरे) (मूळ खंड सहावा), राजवाडे संशोधन मंडळ धुळे, २००९
मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष
महाराष्ट्र संस्कृती
स्वराज्याचे शिलेदार
रायगड दर्शन, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग मुंबई , १९८१ , १९९५
राजगड दर्शन, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग मुंबई , १९८१
छत्रपती शिवाजी महाराज, (प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, २००२)
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे, राजवाडे संशोधन मंडळ धुळे, १९८३, २०१०