Ads

06 May 2022

नेहरू रिपोर्ट विषयी माहिती

Mpsc History

नेहरू रिपोर्ट विषयी माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते.

असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल.

लॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली.

भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली.

या समितीत सर तेजबहादूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या.

समितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला.

साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले.
.
नेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या.

मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

केंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला.

खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला.

महात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला.

त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती
भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.

भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्रप्रांत यांच्यात व्हावी.

भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे.

परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.

सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.

जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल.

प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.

आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील.

काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.

गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी.

गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे.

मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.

गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.

प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

१८५३ मध्ये ‘हाउस ऑफ कॉमन्स’ ची एक समिती भारतातील शैक्षणिक विकासाचा आढावा घेण्यासाठी नेमली गेली.

या समितीच्या वृत्तांतावर आधारित असा अहवाल वा खलिता संचालक मंडळाने (बोर्ड ऑफ डायरेक्टर्स) दिनांक १९ जुलै १८५४ रोजी पाठविला.

ब्रिटिश अधिकारी चार्ल्‌स वुड याच्या आग्रहावरून हा अहवाल लिहिला गेल्याने, त्यास ‘वुडचा अहवाल’ असे म्हणतात.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अहवालातील तरतुदी:

» भारतातील त्यावेळच्या प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू करण्यात यावे

» कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठे स्थापन करण्यात यावीत

» भारतात सर्वत्र शाळांचे जाळे उभारावे व आम जनतेस शिक्षण मिळण्याची व्यवस्था करावी

» ज्या खाजगी संस्था धर्मनिरपेक्ष शिक्षण देतात, ज्यांचे व्यवस्थापन चांगले आहे, ज्या शासकीय नियमांचे काटेकोर पालन करतात व शाळांची तपासणी करू देतात आणि ज्या विद्यार्थ्यांकडून थोडे का होईना, शैक्षणिक शुल्क जमा करतात अशा शाळांना अनुदान द्यावे .

» नव्या शाळांना प्रशिक्षित शिक्षक मिळावेत, म्हणून शिक्षकांच्या प्रशिक्षिणाचे कार्य हाती घ्यावे.

» अहवालात स्त्रियांचे शिक्षण आणि शिक्षितांना रोजगार कसा द्यावा, या विषयांची चर्चाही केली आहे.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अहवालाचा परिणाम:-

» तेव्हाच्या पाच प्रांतांत शिक्षणखात्यांची स्थापना झाली.

»  कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर विद्यापीठे स्थापन झाली.

» प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले.

______________________

भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला सहाभूत घटक

📚भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला सहाभूत घटक 📚

1)ब्रिटिश सत्तेचा उदय .

2)भारताचे राजकीय ऐक्य.

3)भारतात शांततेची व प्रशासकीय ऐक्याची निर्मिती .

4)दळणवळण व संचार साधनाचा जलद विकास .

5)आधुनिक शिक्षणाचा प्रसार.

6)आधुनिक वृत्तपत्र उदय .

7) सामाजिक व धार्मिक चळवळींचे स्वरूप .

8) वंशवाद.

9) आर्थिक शोषण.

______________________

राष्ट्रीय सभेस उपस्थित पुढारी (पहिले अधिवेशन, 1885)

राष्ट्रीय सभेस उपस्थित पुढारी (पहिले अधिवेशन, 1885)

दादाभाई नौरोजी

फिरोजशहा मेहता

कृष्णाजी नूलकर

शिवराम हरी साठे

दिनशा वॉच्छा बहरामजी मलबारी

नारायण गणेश चंदावरकर

रहिमतुल्ला सहानी

सीताराम हरी चिपळूणकर

गोपाळ गणेश आगरकर

न्या.महादेव गोविंद रानडे,

रा.गो. भांडारकर

गंगाराम मस्के

वामन शिवराम आपटे

रामचंद्र मोरेश्वर साने

काशीनाथ त्र्यंबक तेलंग.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दांडी यात्रा

🌸दांडी यात्रा🌸

मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली.

गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता.

 यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले.

यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली.

त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला,

तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले.

दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले.

पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली.

दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता.

प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते.

गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले.

गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,००० हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना

📚आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना📚

📚 सर्वप्रथम काॅग्रेसच्या नावात 'राष्ट्रीय' शब्द केवा शामिल करण्यात आला?
- 1891 चे नागपुर अधिवेशन

📚 सर्वप्रथम 'वंदे मातरम' हे गीत काॅग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गाण्यात आले?
- 1896 चे कलकत्ता अधिवेशन

📚 सर्वप्रथम अप्रत्यक्षपणे 'साम्राज्यंतर्गत स्वराज्याची' मागणी कोणी व कधी केली?
- गोपालकृष्णा गोखलेंनी 1905 च्या बनारस अधिवेशनात

📚 सर्वप्रथम प्रत्यक्षपणे 'साम्राज्यंतर्गत स्वराज्याची' मागणी कोणी व कधी केली?
- दादाभाई  नौरोजींनी 1906 च्या कलकत्ता अधिवेशनात

📚 ब्रिटिशांपासून संपुर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे पहिले व्यक्ती?
- बिपीनचंद्र पाल

📚  काॅग्रेसने सरकारला विरोध करण्याचा कार्यक्रम सर्वप्रथम केव्हा राबविला?
- 1920 चे कलकत्ता अधिवेशन

📚 पहिली परदेशी कपड्यांची होळी कोणी साजरी केली?
- विनायक दामोदर सावरकर.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

🟣   इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये  🟣

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास

Mpsc History

भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली.

ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत.

भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले.

ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली.

तसेच एकदोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.

मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतीय भाषांतील प्रारंभीची वृत्तपत्रे :

भारतीय वा देशी भाषांतील वृत्तपत्र व्यवसायाचा प्रारंभही बंगालमध्ये झाला.
१८१६ साली गंगाधर भट्टाचार्य या गृहस्थाने बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.

भवानीचरण बॅनर्जी यांनी संवाद कौमुदी हे बंगाली वृत्तपत्र ४ डिसेंबर १८२१ रोजी सुरु केले. प्रसिद्ध बंगाली नेते व समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी घनिष्ठ संबंध होता.

त्यांचे पत्र म्हणूनच ते ओळखले जाई.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मिरात-उल्-अखबार

> राजा राममोहन रॉय यांनी १८२२ मध्ये मिरात-उल्-अखबार हे साप्ताहिक फार्सी भाषेत खास सुशिक्षितांसाठी सुरु केले.

> लवकरच १८२२ च्या ‘प्रेस अॅक्ट’च्या निषेधार्थ त्यांनी अखबार बंद केले.

> संवाद कौमुदीच्या आधीपासून कलकत्ता येथे जाम-ए-जहाँनुमा (१८२२) व शम्‌सुल अखबार ही वृत्तपत्रे फार्सी भाषेत चालू होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दिग्दर्शन: श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी  आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.

समाचार दर्पण:  २३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.

सोमप्रकाश: पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले.

द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.

तत्त्वबोधिनी पत्रिका: देवेंद्रनाथ टागोर  यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.

सुलभ समाचार : केशवचंद्र सेन (१८७८).

अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष यांनी १८६८ मध्ये सुरु केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

Mpsc History

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

1. यूरोपियन – कोलंबस

राष्ट्र – स्पेन
वर्ष – 1493
वखारी – त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.

2. यूरोपियन – वास्को-डी-गामा

राष्ट्र – पोर्तुगल
वर्ष – 1498
वखारी – कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन)
3. यूरोपियन – कॅप्टन हॉकीन्स

राष्ट्र – ब्रिटिश
वर्ष – 1607
कंपनी – ईस्ट इंडिया कंपनी
वखारी – पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

🛑 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

🔶 ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

🔶 ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

🔶मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

🔶 प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

🔶पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

🔶धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

🔶 भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

🔶जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

🔶पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

🔶आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

🔶 ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

🔶अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

🔶प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

🔶जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

🔶सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

🔶 रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

🔶शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

🔶 मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

🔶 भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ.

________________________________

ONE WORD SUBSTITUTION

ONE WORD SUBSTITUTION
 
1.Rites- An established ceremony prescribed by a religion  -  संस्कार, प्रेतकर्म, प्रेतकार्य

2. Inevitable- That which cannot be averted - अपरिहार्य , जे टाळता येणार नाही असे

3.Orchestra- A large body of people playing various musical instrument -  ऑर्केस्ट्रा, वाद्यवृंद,
वृंदवदकाची नाटयगृहातील जागा

4.Compositors- One who sets type for books, newspaper - 
टाइप जुळवणारा, टंक-जुळारी

5. Peninsula- A piece of land almost surrounded by water or projecting out into a body of water - द्वीपकल्प

6. Barracks-  A  place where soldiers live  -  सैनिकांची राहण्याची जागा

7. Numismatist-  A man who collects old and new coins  मुद्राशास्त्रज्ञ, नाणी व पदके यांचा अभ्यासक

8.Clientele- Regular users of places restaurant - ग्राहक, ग्राहकवर्ग, आश्रयदातावर्ग

9. Observatory- A place where astronomical observations are made - वेधशाळा

10.Sororicide-  The killing of one's sister - भगिनीहत्या, आपल्या बहीणीची हत्या करणारा व्यक्ती

11. Pilferage - Act of stealing something in small quantities -
चोरी, भुरटी चोरी

12. Occidental- Pertaining to the west - पश्चिमात्य किंवा पश्चिमेकडील व्यक्ती

13.Inscribe -  Write arcane words on stone or paper - शिलालेख, मनावर कायमचा छाप वठवणे, यादीत नाव सामाविष्ट करणे, नाव, अक्षरे, इ.कोरणे, खोदणे

14.Insolvent-  Unable to pay one’s debt - दिवाळखोर, नादार
कफल्लक, दिवाळखोर मनुष्य

15.Harass-  Trouble and annoy continually - त्रास देणे, छळणे, हात धुवून मागे लागणे, वारंवार हल्ले करून जेरीस आणणे

16.Novice-  A person who is new to a profession - नवशिक्या, अननुभवी

17. Erudition - That which makes one highly knowledgeable - पांडित्य, पांडित्व, विद्वता

18. Alienation- A state of emotional or intellectual separation  -परकेपणा, दुरावलेपण

19.Obituary-  A notice of a person’s death  - मृत्यूपत्र, त्याविषयी असलेला मृत्युलेख

20. Gregarious- A person or animal that lives in groups -
एकत्रित कळप करून राहणारा,
समजशील, संगतीप्रिय

21.Sedulous- Hard working and diligent - उद्योगी, मेहनती,चिकाटीचा

22.Journey - An act of travelling from one place to another - प्रवास, सफर

23.  Obsolete- The thing no longer in use - अप्रचलित, प्रचारातुन गेलेला

24.Embezzlement - Misappropriation - घोटाळा, अपहार

25.  Colleague- A person who is working in the same institution
- सहकारी

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराविषयी

🔷 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2021 :-

◆ 2021 चा हा पुरस्कार 13 ऑगस्ट 2021 रोजी सायरस पुनावाला यांना प्रदान.

◆  पुनावाला सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतात.


__________________________



◆ लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराविषयी :-

◆ या पुरस्कारांची सुरुवात 1983 साली झाली व तेव्हापासून हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो.

◆ 2021 चा पुरस्कार :- सायरस पुनावाला
◆ 2020 चा पुरस्कार :- सोनम वांगचुक