Ads

16 November 2022

पुणे करार

◆ पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला.

◆ दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता.

◆ त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत.

◆ हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.

◆ दि. २४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये जयकर, तेज बहादुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांनी या दिवशी पुणे करारावर सह्या केल्या.

★ करारनाम्याच्या अटी:-

● पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत.

१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील.

राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती:

प्रांत                             जागा

मद्रास                            ३०
बॉम्बे आणि सिंध             १५
पंजाब                             ८
बिहार आणि ओरिसा        १८
मध्य प्रांत                        २०
आसाम                            ७
बंगाल                            ३०
संयुक्त प्रांत                      २०
एकूण                         १४८

२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल.

हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल

. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील..

३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल.

४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल.

५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल.

◆ दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. .

७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल.

८) दलित वर्गाच्या प्रतिनिधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल.

९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या...

१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत.

इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कायमधारा पध्दत

📚कायमधारा पध्दत📚

   प्रायोगिक स्वरूपात :- इ.स. 1790

   कायम स्वरूपात :- इ.स. 1793

   ठिकाण :- बंगालa, बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी

   प्रमाण :- भारतातील एकूण शेतजमीनीच्या 19%
   महसूल वाटणी :- शासन, जमीनदार व शेतकरी
   संकल्पना :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   गव्हर्नर :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   प्रभाव :- सर जॉन शोअर
   इतर नावे - जहागिरदारी पध्दत, मालगुजारी पध्दत, बिसवेदारी पध्दत.

🖍 वॉरन हेस्टिंग याने जमीन महसुल वसुल करण्याच्या अधिकारांचे लिलाव करण्याची पध्दत स्विकारली होती. मात्र ही व्यवस्था काही उपयोगात ठरली नाही.

यामुळे हेस्टिंग्जच्या या पध्दतीतील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने 1789 मध्ये सर जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सर जाॅन शोअर समितीच्या शिफारशी नुसार, कायमधारा पध्दत लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतात इ.स. 
1790 ला 10 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू केली होती, परंतू नंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था कायमस्वरूपासाठी लागू केली. म्हणूनच या व्यवस्थेला कायमधारा पध्दत असे म्हणतात.

🖍कायमधारा पध्दतीत जमीनीचा मालक जमीनदार असून प्रत्यक्ष शेतकरी हा भुदास असतो.

🖍या पध्दतीत शेतसारा हा रोख स्वरूपात गोळा केला जात असल्याने या पध्दतीत व्यापारवादाची तत्वेदिसतात.

🖍या व्यवस्थेत संपूर्ण जमिनीचे महसुल गोळा करण्याची जबाबदारी ही संपुर्णपणे जमिनादारांवरच सोपविण्यात आली.

🖍शेतकऱ्यांकडून मिळालेल्या महसुलांपैकी विशिष्ट रक्कम ही जमिनदाराने ब्रिटीशांना महसुल रूपात देणे आवश्यक होते.

🖍या व्यवस्थेनुसार जमिनदार व शेतकरी यांच्यात करारनाम्याची तरतूद होती जेणे करुन जमीनदाराला शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम महसूल रुपात मिळेल. परंतू तसे प्रत्यक्षात न झाल्यामुळे जमिनदार शेतकऱ्यांकडून कितीही महसुल वसुल करु शकत होता व ती जास्तीची रक्कम ही ब्रिटीशांना देण्याची 
गरजही नव्हती.

🖍1799 मध्ये तर महसूलाची रक्कम वेळेत न मिळाल्यास जमिनदारास शेतकऱ्याची जमीन, अवजारे किंवा जनावरे जप्त करण्याचा अधिकार मिळाला व यासाठी त्यास न्यायालयाच्या परवानगीची गरज देखील नव्हती.

🖍या व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन महसुलाची रक्कम ही कायमची ठरविण्यात आली. यानुसार 89 टक्के सरकारला व 11 टक्के जमीनदारांना असे जमीन महसूलाच्या रकमेचे दोन भाग करण्यात आले होती.

🖍शेतसारा हा 30 ते 40 वर्षेस्थिर असेल.यात वाढ करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
🖍या कायमधारा पध्दतीचे लाभार्थी हे केवळ जमिनदारच बनत असे.

🖍या व्यवस्थेवर सर जॉन शोअर याचा प्रभाव होता.
🖍जॉन शोअर समितीच्या शिफारसीनुसार या समितीत जेम्स ग्रँट आणि जोनार्थन डंकन हे इतर सदस्य होते.

🖍ही पध्दत सुरूवातीला केवळ बंगाल प्रांतामध्ये लागु करण्यात आली हाेती. 

🖍तिचा विस्तार पुढे बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी या भागांमध्ये करण्यात आला.

🖍भारतातील एकुण शेतजमिनीच्या 19 % क्षेत्रफळावर ही पध्दत अस्तित्वात होती.

🖍विल्यम बेंटिकने आपल्या 1829 च्या भाषणात कायमधारा पध्दतीचे फायदे स्पष्ट केले होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई.

ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).


ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).
१६१५ मध्ये राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारशीने सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळविण्यात यशस्वी ठरला.
पोर्तुगीजच्या राजाकडून १६६१ साली आंदण मिळालेले मुंबई बेट राजा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस वार्षकि भाडेपट्टीने दिले.
मोगल बादशहा फारखसिअरकडून इंग्रजांनी १७१७ मध्ये मुक्त व्यापाराचे फर्मान मिळविले.
कंपनीने हुगळी नदीकाठी तीन खेडय़ांची जागा मिळवून तेथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. याच खेडय़ाचे पुढे शहरीकरण होऊन कलकत्ता हे नाव पडले.
जमिनीमार्गे भारतात येणारा पहिला युरोपियन – मार्को पोलो.

िहदुस्थानात येणारा पहिला इंग्रज – थॉमस स्टिव्हन्सन.
बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
फ्रेंच व इंग्रज यांच्या दरम्यानची निर्णायक लढाई, वांदिवॉसची लढाई २२ जानेवारी, १७६० रोजी झाली. फ्रेंच सेनापती काउंट लाली तर इंग्रज सेनापती सर आयर कुट होता. या लढाईने भारतातील फ्रेंच सत्तेचा निर्णायक पराभव झाला.

बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर, १७६४) – या लढाईत मीर कासिम (बंगालचा नवाब), अयोध्येचा नवाब सुजाऊदौला व मोगल बादशहा शहाआलम यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला.

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी

महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे

जायकवाडी         नाथसागर

पानशेत              तानाजी सागर

भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

गोसिखुर्द           इंदिरा सागर

वरसगाव               वीर बाजी पासलकर

तोतलाडोह            मेघदूत जलाशय

भाटघर                  येसाजी कंक

मुळा                      ज्ञानेश्वर सागर

माजरा                   निजाम सागर

कोयना                  शिवाजी सागर

राधानगरी                लक्ष्मी सागर

तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

माणिक डोह            शहाजी सागर

चांदोली                   वसंत सागर

उजनी                     यशवंत सागर

दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी             शंकर सागर

वैतरणा                 मोडक सागर

__________________________

भारतातील राज्ये व लोकनृत्य

【आंध्रप्रदेश】----कुचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।

【असम】----बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।

【बिहार】---जाट– जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, बिदेसिया।

【गुजरात】--गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।

【हरियाणा】--झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।

【हिमाचल प्रदेश】---झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी। 

【जम्मू और कश्मीर】---रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली। 

【कर्नाटक】---यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी। 

,【केरल】---कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।   

,【महाराष्ट्र】---लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।   

【ओडीशा】---ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।

【पश्चिम बंगाल】---काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।

【पंजाब】 ---भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला।  

【राजस्थान】--घूमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।   

【तमिलनाडु】---भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।

【उत्तर प्रदेश】---नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता। 

【उत्तराखंड】---गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली। 

【गोवा】---तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल।  

【मध्यप्रदेश】---जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।  

【छत्तीसगढ़】---गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।

【झारखंड】---अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।  

【अरुणाचल प्रदेश】---बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।  

【मणिपुर】--डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह।  

【मेघालय】---का शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो।  

【मिजोरम】----छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्वान, जंगतालम, पर लाम, सरलामकई/ सोलाकिया, लंगलम।         

【नगालैंड】----रंगमा, बांस नृत्य, जीलैंग, सूईरोलियंस, गीथिंगलिम, तिमांगनेतिन, हेतलईयूली। 

【त्रिपुरा】---होजागिरी

【सिक्किम】---छू फाट नृत्य, सिकमारी, सिंघई चाम या स्नो लायन डांस, याक छाम, डेनजोंग नेनहा, ताशी यांगकू नृत्य, खूखूरी नाच, चुटके नाच, मारूनी नाच।  

【लक्ष्यद्वीप】  --लावा, कोलकाई, परीचाकली
︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗︗

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे


     里बंदरे        -  राज्य

1) कांडला - गुजरात

2) मुंबई - महाराष्ट्र

3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्र

4) मार्मागोवा - गोवा

5) कोचीन - केरळ

6) तुतीकोरीन - तमिळनाडू

7) चेन्नई - तामीळनाडू

8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

9) पॅरादीप - ओडिसा

10)न्यू मंगलोर - कर्नाटक

11) एन्नोर - आंध्रप्रदेश

12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल

13) हल्दिया - पश्चिम बंगाल

曆曆曆曆曆曆曆曆曆

महाराष्ट्र - जलाशय व धरणे.

कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

 भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

गंगापूर - (गोदावरी) नाशिक

 राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

 उजनी - (भीमा) सोलापूर

तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

यशवंत धरण - (बोर) वर्धा

 खडकवासला - (मुठा) पुणे

येलदरी - (पूर्णा) परभणी

曆曆曆曆曆曆曆曆曆

राष्ट्रीय जलमार्ग-1

 नदी-  गंगा,भगिरथी नदीवर

मार्ग-  अलाहाबाद ते हल्दीया

अंतर - 1620 कि. मी .

प्रवास-  उत्तरप्रदेश ,बिहार ,झारखंड, पश्चिम बंगाल राज्यातून.

曆曆曆曆曆曆曆曆曆

राष्ट्रीय जलमार्ग- 2.

नदी -ब्रह्मपुत्रा

मार्ग - सादिया ते ढुबरी

अंतर - 899 कि. मी.

प्रवास - आसाम राज्यातून

曆曆曆曆曆曆曆曆曆曆

राष्ट्रीय जलमार्ग -lll

कालवा...

1)  वेस्टकोस्ट कॅनॉल

2)  उदयोगमंडल कॅनॉल

3)  चंपाकार कॅनॉल

मार्ग.

1)कोल्लम ते कोट्टापुरम

2)कोची ते पाठालाम

3)कोची ते अंबालामुगल

अंतर - 205 कि.मी

प्रवास - केरळ

曆曆曆曆曆曆曆曆曆

महाराष्ट्रातील नवीन निर्माण झालेले जिल्हे.

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते

10 जिल्हे नविन निर्माण झाले

ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?

里Tricks:- सिंजाला ग मुबा वान ही गोपाल चा

सिं- सिंधुदुर्ग (१मे१९८१)
जा- जालना (१मे१९८१)
ला- लातूर (१६ऑगस्ट१९८२ )
ग- गडचिरोली (२६ऑगस्ट१९८२)
मुबा- मुंबई  (१९९०)
वा- वाशिम (१जुलै१९९८)
न- नंदूरबार (१जुलै१९९८)
हि- हिंगोली (१मे१९९९)
गो- गोंदिया (१मे१९९९)
पाल- पालघर (१ऑगस्ट२०१४)

भारतातील कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्ये

里Tricks:- अरुणा माझी सक्की मा नाही

अरुणा- अरुणाचल प्रदेश(१७)
माझी- मिझोराम(५२)
सक्की- सिक्किम(८६)
मा- मणिपुर(११५)
ना- नागालँड(११९)
ही- हिमाचल प्रदेश(१२३)

曆曆曆曆曆曆曆曆曆

केंद्रीय पीक संशोधन केंद्र.

१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      =सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)


सुर्यमालेविषयी महत्वाचे प्रश्न

सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
बध

सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
शक्र

सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
गरू

कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
शक्र

जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
पथ्वी

सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
पथ्वी

पथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
शक्र

सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
बध

पथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
परिवलन

पथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
परिभ्रमण

सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
गरू

सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
बध

सर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
शक्र

मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
फोबोज आणि डीमोज

कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते?
मगळ

गरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
1397 पटीने

कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
गरू

सर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
टायटन

सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
शनि

यरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
परजापती व वासव

गरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
बहस्पति

नपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
वरून व हर्षल

नपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
41 वर्ष

सर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
पथ्वी      - 01
मगळ     - 02
गरु        - 79
शनि.     - 82
यरेनस   - 27
नपच्यून - 14

सर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
बध व शुक्र

  सर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
आठ

सर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
14 कोटी 96 लाख Km

चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
3 लाख 84 हजार Km

सर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
8 min 20 Sec

चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
1.3 सेकंद

सर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
6000⁰ C

चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
शक्र

चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
50 मिनिटे

गरहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?
सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

सर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?
बध

पथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
59 %

पथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

पथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

पथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
धरुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

पथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
एरॅटोस्थेनिस

यरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
विल्यम हर्षल

नपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
जॉन गेल

सर्य माले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
पार्सेक

भूगोल प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

19) वरंधा घाट - पुणे - महाड

20) रूपत्या घाट - पुणे - महाड

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

भारतातील सर्वात मोठे

भारतातील सर्वात मोठे👇👇👇👇

Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?
-- राजस्थान

Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?
-- मुंबई ( महाराष्ट्र )

Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?
-- आग्रा

Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?
-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )

Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?
-- थर ( राजस्थान )

Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?
-- भारतरत्न

Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?
-- परमवीर चक्र

Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?
--रामेश्वर मंदिर

Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?
-- सेंट कथेड्रल, गोवा

Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?
-- सुवर्णमंदिर ,अमृतसर

Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?
-- जामा म्हशजीद

Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?
-- चिलका सरोवर ( ओरिसा ).

विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती

विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती

घटकराज्यांमध्ये व्दिगृही विधिमंडळ असावे की नसावे याबाबद निर्णय घेण्याचा अधिकार तेथील विधानसभेला आहे. सध्या देशामध्ये सहा घटकराज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यामध्ये महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना :

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्तीनुसार असे निर्धारित करण्यात आले आहे की, विधानपरिषदेची सदस्य संख्या तेथील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी आणि 40 पेक्षा कमी नसावी. सध्या महाराष्ट्रात 78 इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले सदस्य नसतात त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.
1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
1/6 राज्यपालाकडून सदस्य निवडले जातात यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध क्षेत्रातील तज्ञ सदस्य असतात.
सदस्यांची पात्रता :

तो भारताचा नागरिक असावा.
त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल सहा वर्ष इतका असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल :

विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.

गणसंख्या : 1/10

अधिवेशन : दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :

विधानपरिषदेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.