ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).


ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).
१६१५ मध्ये राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारशीने सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळविण्यात यशस्वी ठरला.
पोर्तुगीजच्या राजाकडून १६६१ साली आंदण मिळालेले मुंबई बेट राजा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस वार्षकि भाडेपट्टीने दिले.
मोगल बादशहा फारखसिअरकडून इंग्रजांनी १७१७ मध्ये मुक्त व्यापाराचे फर्मान मिळविले.
कंपनीने हुगळी नदीकाठी तीन खेडय़ांची जागा मिळवून तेथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. याच खेडय़ाचे पुढे शहरीकरण होऊन कलकत्ता हे नाव पडले.
जमिनीमार्गे भारतात येणारा पहिला युरोपियन – मार्को पोलो.

िहदुस्थानात येणारा पहिला इंग्रज – थॉमस स्टिव्हन्सन.
बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
फ्रेंच व इंग्रज यांच्या दरम्यानची निर्णायक लढाई, वांदिवॉसची लढाई २२ जानेवारी, १७६० रोजी झाली. फ्रेंच सेनापती काउंट लाली तर इंग्रज सेनापती सर आयर कुट होता. या लढाईने भारतातील फ्रेंच सत्तेचा निर्णायक पराभव झाला.

बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर, १७६४) – या लढाईत मीर कासिम (बंगालचा नवाब), अयोध्येचा नवाब सुजाऊदौला व मोगल बादशहा शहाआलम यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...