Ads

22 April 2024

SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे

 🚨 SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे याबाबत खूप जणांचे मेसेज व कॉल येत आहे त्याबाबत काही अनुभव कथन येथे करतो.


1.SR (दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क): या पदाबाबत अधिक सांगायची आवश्यकता नाहीये.


2. PSI : 

१००% पोलीस प्रशासनाची आवड आहे यात अजिबात Confusion नाही अशा मुलांनी PSI घ्यायला पाहिजे. 

    थोडी जरी चलबिचलपणा असेल तर दुसरा पद निवडायला काही हरकत नाही.


3. ASO (मंत्रालय)

मुलांनी : पद घ्यायला हवं त्यासाठी


 सकारात्मक बाबी

 १. प्रमोशन खूप लवकर होतील २.चांगला जनसंपर्क वाढेल ३.आपल्या जर ओळखी चांगल्या झाल्या तर मंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम करता येईल. ४. तिथे राहून सुद्धा पहिली दोन वर्ष अभ्यास करता येतात (स्व अनुभव) ५. मुंबई राहायला खूप वाईट आहे असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका दोन ते तीन महिन्यानंतर मुंबईचं वातावरण आपल्याला एकदम चांगलं वाटायला लागेल.


मुलींसाठी : १. मुलींसाठी सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे कारण मी प्रत्येक विभागामध्ये जास्त काम व कमी कामाची डेक्स असतात. २. एकाच ठिकाणी ऑफिस असल्यामुळे कुटुंबाकडे सुद्धा व्यवस्थित वेळ देता येईल.  


( पण काही जणांचा असं मत असू शकेल की मला फक्त शासकीय नोकरी हवी व त्यासोबत मी पूर्णवेळ फॅमिलीच द्यायची असेल तर ASO नका घेऊ)


4. STI

अभ्यास करायला खूप वेळ मिळतो म्हणून मुलं STI पद घेतात पण इतर पदावर सुद्धा पहिली एक-दोन वर्ष अभ्यास करायला मिळतात त्यामुळे अभ्यास या एकाच गोष्टीमुळे STI पद घेऊ नका.


सकारात्मक : 

अभ्यासाला वेळ मिळतो.

काम कमी आहे.

गावाकडे  जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते.


नकारात्मक : 

प्रमोशन ला उशीर आहे.

संपूर्ण कार्यकाळ एक सारख्याच पदावरती काम करावा लागेल.


(काही जणांचे गावाकडे खूप चांगली शेती असते व त्याकडे पाहण्यासाठी घरी माणसे कमी असतात त्या मुलांनी किंवा आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी गावाकडे कोणी नाहीये अशा मुलांनी व मला शांतपणे दहा ते पाच शासकीय काम करायचा आहे व त्यानंतर माझा व इतर लोकांचा काहीही संपर्क नसावा व कामाचे जास्त तणाव येऊ नये यासाठी हे पद उत्तम आहे.)


🔻❗️वरील मते ही माझी वैयक्तिक व अधिकारी मित्रांच्या सल्ल्यानुसार एकत्र करून तुम्हाला दिलेली आहेत यापेक्षा काही मत वेगळं असू शकतं पण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक प्रांजळ मत देण्याचा प्रयत्न केला आहे.


स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.

🔰घटक  - घड्याळ :- 👇

स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.

☘सुञ :-

1) वेळ दिली असता कोन काढणे.
      11
= --------- × M    -  30 × H
       2

M  - मिनीट
H  - दिलेल्या वेळेत एकूण किती तास आहेत.


2 )  समजा 7 ते 8 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा एकमेकावर येतात.....

सुञ...
       60 
=   -----------  ×  7 × 5
        55


3)  दिवसात किती वेळा तास व मिनीट काटा 90° चा कोन करतात  ??

उत्तर  -  12 तासात  -  22 वेळा.
            24 तासात  - 44 वेळा.


4) दिवसात किती वेळा तास काटा व मिनीट काटा परस्परांशी विरूद्ध असतात /येतात  ?

उत्तर  - 
     12 तासात    -  11 वेळा
     24 तासात    -  22 वेळा.


5 ) एक मिनीट म्हणजे   6° होय.
एक तास म्हणजे  90° होय.


6 ) प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण ठोके किती पडतात ?
      12  × 13 
=  ----------------   = 78.....12 तासात.
            2  

24 तासात एकूण ठोल   - 156


7 )  4 ते 5 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा विरुद्ध दिशेला असतील ?

स्पष्टीकरण  -
या वेळी मिनीट काटा 10 ते 11 च्या दरम्यान असेल म्हणून ...
M = 10 घ्यावे .

      60
=  --------- ×  5 × M
       55

       60  
=  -----------  × 5 × 10  
       55
      600               6
= -----------   = 54 ------
       11                11

                                  6
म्हणजे च  4 वाजून 54 ----- मिनीट.
                                  11                     

8)  5 ते 6 च्या दरम्यान किती वाजता 90 ° चा कोन होईल ?
स्पष्टीकरण  -

90 ° चा कोन होण्यासाठी मिनीट काटा 8 च्या पुढे असाला पाहीजे.
म्हणून  M = 8 घ्यावे .
       60 
  =  ------- × 5 × 8
        55

        480                7
=  -------------  = 43 ------
         11                 11

म्हणून ...                         7
90° चा कोन 5 वाजून 43 ----- मिनीट.
                                     11

=========================

काही धातू आणि त्यांची धातूके

1) मॅग्नेशिअम  ::
- मॅग्नेसाइट (MgCO3)
- डोलोमाइट (MgCo3. CaCo3)
- कार्नेलाईट

2) अल्युमिनिअम  ::
  - बॉकसाइट ( Al2O3. H2O + SiO2   
                      + Fe2O3 )
  - क्रायोलाइट  ( AIF3.3NaF )
  - फेल्डस्पार   ( KAISi3O8 )
  - कॅलोनाइट   ( AI2 (OH4) SiO5 )

3) सोडिअम  ::
- रॉकसॉल्ट ( Nacl )
- क्रायोलाइट ( Na3. AIF6)

4) पोटॅशिअम  ::
- सॉल्टपिटर ( KNO3)

5) लोह  ::
- हेमेटाईट ( Fe2O3 )
- मॅग्नेटाइट ( Fe3O4 )
- लिमोनाइट ( FeO( OH )
- सिडेराइट  ( FeCO3 )
- पायराइट  ( FeS2 )
- क्रोमाइट  ( FeO. CrO3 )

6) तांबे  ::
- मॅलाकाइट ( CuCO3. Cu(OH)2)
- कॉपर पायराइट ( CuFeS2 )
- कॉपर ग्लॉन्स ( Cu2S )
- क्युप्राइट ( Cu2O )

7) शिसे :: (Lead)
- गॅलीना
- लिथार्ज
- सेरूसाइट

8) जस्त  ::
-  झिंकाइट  ( ZnO )
-  स्फलेराइट ( ZnS )
-  कालामाइन ( ZnCO3 )

9) पारा  ::
  -  सिन्नाबार ( Hgs )

10) चांदी  ::
  -  अर्गेन्टाइट

######🌿🌿🌿🌿🌿###

चालू घडामोडी :- 21 एप्रिल 2024

◆ मृतदेहाच्या अवस्थेवरुन मृत्यूची अचूक वेळ सांगणाऱ्या किड्याचा शोध पुण्याच्या झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञ डॉ. अपर्णा कलावटे यांनी लावला असून त्याला 'मोरेश्वर किडा' असे नाव दिले आहे.

◆ साक्षरतेत प्रथमस्थानी असणाऱ्या केरळमधील महिलांचे लोकसभा उमेदवारीमध्ये अव्वल स्थान आहे.

◆ इस्रायलच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या पाच वर्षीय भाची सॅलीच्या मृतदेहाला मिठी मारताना पॅलेस्टिनी महिला इनास अबू मामार यांचे रॉयटर्स वृत्तसंस्थेचे मोहम्मद सालेम यांनी काढलेल्या छायाचित्राला 'वर्ल्ड प्रेस फोटो ॲवॉर्ड ऑफ द इयर' मिळाला आहे.

◆ 2006 पासून दरवर्षी 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिन साजरा केला जातो.

◆ चार्ल्स कॉर्नवॉलिस यांना 'भारतातील नागरी सेवेचे जनक' म्हणून ओळखले जाते.

◆ सत्येंद्रनाथ टागोर हे 1863 मध्ये भारतीय नागरी सेवेसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय ठरले.

◆ एस सोमनाथ यांनी इस्रो अंतराळ सुरक्षेसाठी बेंगळुरू येथील "दिगंतरा मुख्यालयाचे" उद्घाटन केले.

◆ चार दिवसांचा "वर्क वीक" असणारा सिंगापूर हा आशियातील पहिला देश ठरणार आहे.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे “भगवान महावीर” यांच्या 2550 व्या निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन केले.

◆ बेंगळुरूचे 'केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ' देशातील सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.

◆ पुढील वर्षी 16 फेब्रुवारीला ‘बाफ्टा 2025 अवॉर्ड्स’ सोहळा होणार आहे.

◆ भारतीय नौदलाने पूर्व समुद्र किनारी ‘पूर्वी लहर’ हा सराव केला आहे.

◆ जपानचा बॅडमिंटनपटू केंटो मोमोटा याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ Rupay ने ‘Link it, Forget it’ ही मोहीम सुरू केली आहे.

◆ जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाला मोठा धक्का! नागालँडच्या 6 जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

20 April 2024

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?

 उत्तर – आलिया भट्ट 


🔖 प्रश्न.2) टाइम मासिकाने एप्रिल 2024 मध्ये जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या माजी भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश केला ?

उत्तर – साक्षी मलिक 


🔖 प्रश्न.3) आयपीएल मध्ये २५० सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला ?

उत्तर – दुसरा


🔖 प्रश्न.4) आयपीएल मध्ये सर्वाधिक किती सामने खेळण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनी च्या नावावर आहे ?

उत्तर – २५६


🔖 प्रश्न.5) भारताने कोणत्या राज्यातील चांडीपुर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रुझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

उत्तर – ओडिशा


🔖 प्रश्न.6) भारत स्वदेशी बुलेट ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर विकसित करेल ?

उत्तर – वंदे भारत व्यासपीठ


🔖 प्रश्न.7) भारताची स्वदेशी बुलेट ट्रेन कोण विकसित करणार ?

उत्तर – नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL)


🔖 प्रश्न.8) भारत सध्या कोणत्या देशाच्या मदतीने बुलेट ट्रेन विकसित करत आहे ?

उत्तर – जपान


🔖 प्रश्न.9)  अलीकडेच कोणत्या राज्यातील प्रसिद्ध तिरंगा बर्फीला GI टॅग देण्यात आला ?

उत्तर – वाराणसी, उत्तर प्रदेश


🔖 प्रश्न.10) फायर डीटेक्सन सिस्टिम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार ?

उत्तर – पेंच


🔖 प्रश्न.11) भारतीय नौदलासाठी DRDO व्दारे स्थापन केलेले space या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली ?

उत्तर – L अँड T शिपबिल्डींग चेन्नई


🔖 प्रश्न.12) इस्राईल ने इराण विरूद्ध सूरू असेलल्या युद्धाला (ऑपरेशन) ला कोणते नाव दिले आहे ?

उत्तर – iron shield


🔖 प्रश्न.13) जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

उत्तर – १९ एप्रिल

G-20 बातम्यांमध्ये


📌स्थापना - 1999


📌वार्षिक सम्मेलन - 


🌱2022 - इंडोनेशिया 🇮🇩

🌱2023 - भारत 🇮🇳

🌱2024 - ब्राझिल 🇧🇷


🌼 G20 शेर्पा: अमिताभ कांत


🌺 2023 साठी G20 त्रॉइका - इंडोनेशिया, भारत आणि ब्राझिल


🌼 भारतातील G-20 देशांमध्ये प्रति व्यक्तींची न्यूनतम जीडीपी आहे.


🌺 G-20.   2023चा थीम - "वसुधैव कुटुंबकम" (महा उपनिषद) ज्याचा अर्थ "जग एका कुटुंबाचा आहे"


🌼 3 वा कामगार कामगार कामगार कामगार कामगार कामगार कामगार - जिनेवा


🌺 2 जी-20 विरोधी करप्शन कामगार कामगार कामगार कामगार - ऋषिकेश


🌼 2 जी-20 आपत्तीची जोखीम कामगार कामगार कामगार कामगार कामगार - मुंबई


🌺 2 जी-20 व्यापार आणि निवेश कामगार कामगार कामगार कामगार - बेंगळूरू


🌼 2 जी-20 आपत्तीची जोखीम कामगार कामगार कामगार कामगार कामगार - मुंबई


🌺 3 जी20 पर्यटन कामगार कामगार कामगार कामगार कामगार - श्रीनगर


🌼 1 जी-20 पर्यावरण आणि जलवायू सततता कामगार बैठक - बेंगळूरू


🌺 G-20 सांस्कृतिक कामगार कामगार बैठक - खजुराहो


🌼 G-20 परिषदेच्या विदेश मंत्र्यांची बैठक - नवी दिल्ली


🌺 G-20 अंतरिक्ष अर्थव्यवस्था नेतेंची मुलाखत - मेघालय

२०२३ साली नोबेल प्राइझचे विजेते:

🌱 भौतिकशास्त्र:

1. पियर अगोस्टिनी (ट्यूनिशिया🇹🇳)

2. फेरेंस क्रौस (हंगरी🇭🇺)

3. एन लुईयर (फ्रांस🇫🇷)

▪️ पद्धतीचा अनुभवासाठी ज्यांनी अणू वर्तमानाच्या अध्ययनासाठी अटोसेकंड पल्स उत्पन्न करण्याच्या प्रयोगांना पुरस्कार.


🌴 रसायनशास्त्र:

1. मोंगी जी. बवेंदी (फ्रांस🇫🇷)

2. लुईस ई. ब्रस (यूएसए🇺🇸)

3. अलेक्सी आय. एकीमोव (रूस🇷🇺)

▪️ क्वांटम डॉट्सचे शोध आणि संशोधन करण्याचे पुरस्कार.


🌱 शारीरिक वा औषधशास्त्र:

1. काटालिन कारिको (हंगरी🇭🇺)

2. ड्रू वाइसमन (यूएसए🇺🇸)

▪️ कोविड-१९ विरुद्धी अधिक प्रभावी एमआरएनए टीकांच्या विकासासाठी त्यांच्या अभ्यासांचे आविष्कार अंदाजे करण्याचे पुरस्कार.


🌴 साहित्य:

जॉन फोस्से (नॉर्वे🇳🇴)

▪️ त्यांच्या नवीन नाटकांच्या आणि प्रोसच्या माध्यमातून अभिव्यक्त केलेल्या असाध्यार्थांना आवाज देणार्या कामाबद्दल पुरस्कार.


🌱 शांती:

नर्गेस मोहम्मदी (ईराण🇮🇷)

▪️ त्यांच्या ईराणमध्ये स्त्रियांच्या दमनाविरोधातील मुकाबल्यासाठी आणि सर्वांसाठी मानवाधिकार आणि स्वतंत्रतेसाठी मांडण्यासाठी पुरस्कार.


🌴 अल्फ्रेड नोबेलांच्या स्मृतीस्तरीत स्वैदेशी रिक्सबॅंक पार्श्वभूमी पुरस्कार:

क्लॉडिया गोल्डिन (यूएसए🇺🇸)

▪️ स्त्रियांच्या कामाच्या बाजाराच्या परिणामांच्या आमच्या समजाचे आग्रहण करण्याचे पुरस्कार.

WORLD AIR QUALITY REPORT 2023


🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३

• अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963)
• एकूण देश : 134

☑️या अहवालानुसार 👇👇
• भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.
• नवी दिल्लीला 2018 पासून सलग 4 वेळा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून स्थान देण्यात आले आहे.
• बिहारमधील बेगुसराय हे प्रथमच जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.

◆ जगातील सर्वाधिक प्रदूषित " देश "

(1) बांगलादेश
(2) पाकिस्तान
(3) भारत
(4) ताजिकिस्तान
(5) बर्किना फासो

◆ जगातील सर्वाधिक प्रदूषित " शहरे "

(1) बेगुसराय (भारत)
(2) गुवाहाटी (भारत)
(3) दिल्ली (भारत)
(4) मुल्लनपूर (भारत)
(5) लाहोर (पाकिस्तान)

◆ सर्वाधिक स्वच्छ हवा कुठे?

(1) फ्रेंच पॉलेनेशिया
(2) मॉरिशिस
(3) आइसलँड
(4) ग्रेनेडा
(5) बर्म्युडा

◆ महाराष्ट्राचे सर्वाधिक प्रदूषित ''शहरे''

(1) कल्याण
(2) मुंबई
(3) नवी मुंबई
(4) पुणे
(5) नागपूर

19 April 2024

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर -ए आर रहेमान


🔖 प्रश्न.2) अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे

उत्तर - पद्मिनी कोल्हापुरे


🔖 प्रश्न.3) नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे?*

उत्तर - अशोक सराफ


🔖 प्रश्न.4) जगातील सर्वाधिक बिझी airport मध्ये कोणते विमानतळ पहिल्या स्थानावर आहे ?


उत्तर – अटलांटा एअरपोर्ट


🔖 प्रश्न.5) क्रिकेटपटू जोस बटलर हा आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत कितव्या क्रमांकावर पोहचला ?

उत्तर – दुसऱ्या


🔖 प्रश्न.6) जस्ट अ मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBI च्या कोणत्या माजी गव्हर्नर ने लिहिले ?

उत्तर – डी सुब्बाराव


🔖 प्रश्न.7) भारतीय रुपयाने अमेरिकेनं डॉलर च्या तुलनेत किती रुपये ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली ?

उत्तर – ८३.५७


🔖 प्रश्न.8) उत्तर प्रदेशातील पहिला स्कायवॉक कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आला ?

उत्तर– तुळशी (शबरी) धबधबा


🔖 प्रश्न.9) नुकतेच प्रसिद्ध क्रिकेट मासिक विस्डेनने कोणत्या महिला क्रिकेटरला आघाडीची क्रिकेटपटू म्हणून नाव दिले ?

उत्तर– Nate Sciver-Brunt


🔖 प्रश्न.10) केंद्राच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्राम (GCP) मध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे ?

उत्तर – मध्य प्रदेश


🔖 प्रश्न.11) world haemophilia day कधी साजरा केला जातो ?

उत्तर – १७ एप्रिल


🔖 प्रश्न.12) भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावली जाणाऱ्या शाईचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

उत्तर – कर्नाटक


🔖 प्रश्न.1) नुकतेच लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर - अभिनेते अमिताभ बच्चन 


🔖 प्रश्न.2) अलीकडेच भारतीय नौदलातील जवानांसाठी शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कार समारंभात किती जवानांना पुरस्कार प्रदान करण्यात आले ?

उत्तर – 35 जवानांना 


🔖 प्रश्न.3) अलीकडेच लिथुआनियाच्या मायकोलास एकेलाना याने किती मिटर लांब थाळीफेक करीत विश्वविक्रम नोंदविला ?

उत्तर – ७४.३५ मिटर


🔖 प्रश्न.4) यंदा देशात सरासरीपेक्षा किती टक्के अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला ?

उत्तर – १०६ टक्के


🔖 प्रश्न.5) मायक्रोप्लास्टिक्सचा सामना करण्यासाठी अलीकडे कोणत्या संस्थेने हायड्रोजेल विकसित केले ?

उत्तर – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स 


🔖 प्रश्न.6) 2024 बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?

उत्तर – जोनाटन क्रिस्टीने 


🔖 प्रश्न.7) ACI ने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत कोणत्या भारतीय विमानतळाला पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले ?

उत्तर – दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ


🔖 प्रश्न.8) अलीकडेच कुवेतचे नवे पंतप्रधान कोण झाले ?

उत्तर – अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह


🔖 प्रश्न.9) गुन्हेगारी खटल्याचा सामना करणारे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष कोण ठरले ?

उत्तर – डोनाल्ड ट्रम्प


🔖 प्रश्न.10) युरोप आणि जपान देशाच्या bepicolombo या मिशन व्दारे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यात येणार ?

उत्तर – बुध


🔖 प्रश्न.11) knife: mediations after an attempted murder या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

उत्तर – सलमान रश्दी


🔖 प्रश्न.12) जागतिक आवाज दीन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर – १६ एप्रिल

वनस्पतींचे वर्गीकरण


##  मुख्य प्रकार दोन  :
अ) अबीजपत्री (Cryptogamae)
ब)  बीजपत्री  ( Phanerogame)
--------------=========---------------
अ) अबीजपत्री (Cryptogamae)::
- हे अपुष्प वनस्पती असून यांना बिया येत नाहीत.
-  यांचे तीन विभागात विभाजन करण्यात येते..
1) थॅलोफायटा  ( Thalophyta ) ::
- 'शैवाळाचा विभाग'
- मूळ, खोड, पाने नसतात.
- पाण्यात वाढतात.
* उदाहरण :=
- शैवाळ :: स्पायरोगायरा, कारा, युलोथ्रीक्स,जेलेडीयम, क्लोरेल्ला, कोंड्रस, बट्राकोस्पर्मम.
---------------------------------------------------
2) ब्रायोफायटा ( Bryophyta ) ::
- मुळांऐवजी मुलाभ (Rhuzoid ) असतात. जे वनस्पतींना आधार देतात व अवशोषण करतात.
- उभयचर वनस्पती म्हणून ओळख.
* वर्गीकरण 2 गट ::
i) लिव्हरवार्टस ( हिपॅटेसी ):: 
- साधे ब्रायोफायटा
* उदाहरण ::
रिक्सीया, मर्केन्शीया, पेलीया, लेज्यूनिआ.

ii)माँसेस (मुस्सी ) ::
- प्रगत ब्रायोफायटा
* उदाहरण ::
फ्युनारिया, पॉलीट्रायकम
--------------------------------------------------
3) टेरिडोफायटा ( Pteridophyta) ::
- अबीजपत्री वर्गातील सर्वात प्रगत व पहिली संवहनी संस्था.
- खरी मुळे, पाने व खोड असलेल्या वनस्पती.
- विकसित वनस्पती
* उदाहरण ::
सिलोटम, इकवीसॅटम, मारसेलिया, नेरीस, ऑडिएन्टम, नेचे, लायकोपोडीअम,
सिलॅजिनेला.
----------------==--------==-----------------
ब) बीजपत्री ( Phanerogamae ) ::
- या बिया येणाऱ्या वनस्पती.
* 2 गटात वर्गीकरण ::

i) अनावृत्तबीजी (Gymnosperms) ::
   - बीयांची निर्मिती होते पण त्या फळामध्ये बंदिस्त नसतात.
- म्हणजे यांना फळे येत नाहीत.
* उदाहरणे ::
पायनस (देवदर), सायकस,पिसिया (ख्रिसमस ट्री ), गिन्कगो बायलोबा.

ii)आवृत्तबीजी वनस्पती ( Angiosperms) ::
- बिया फळामंध्ये बंदिस्त असतात यांना फळे येतात.
** 2 प्रकार ::
a) एकबीजपत्री ( monocotyledonous ) ::
- एकाच दलाचे बीज.
* उदाहरणे ::
कांदा, केळी, बांबू, लसूण, तांदूळ, मका, ज्वारी, गहू.

b) द्विबीजपत्री (Dicotyledonous ) ::
- दोन दलाचे बीज.
*  उदाहरणे ::
आंबा, पिंपळ, मोहरी,सूर्यफूल, शेंगदाणा.

------<<<<<<<<>>>>>>>>>>>>>----

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा
━━━━━━━━━━━━━━━━━━━

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..


-----------------======----------------------
शिखर               उंची(मी)             स्थान
---------------------------------------------------
1)एव्हरेस्ट/      8848.86 मी     नेपाळ/
सागमाथा                                चीन
(जगातील सर्वात उंच शिखर )
-------------------------------------------------
2) के 2              8611 मी           भारत
(भारतातील सर्वात उंच शिखर )
---------------------------------------------------
3)कांचनगंगा      8586 मी      नेपाळ /
                                           भारत   
---------------------------------------------------
4) ल्होत्से           8516 मी      नेपाळ/
                                           चीन
--------------------------------------------------
5) मकालू           8485 मी      नेपाळ/
                                           चीन
---------------------------------------------------
6) चो ओयू         8188 मी     नेपाळ/
                                           चीन
---------------------------------------------------
7) धवलगिरी      8167 मी     नेपाळ
---------------------------------------------------
8) मनसलू         8163 मी      नेपाळ
---------------------------------------------------
9) नंगा पर्वत      8126 मी    पाकिस्तान
---------------------------------------------------      
10)अन्नपूर्णा -1   8091 मी    नेपाळ
---------------------------------------------------
11)गाशरब्रुम-1/ 8068मी  पाकिस्तान /
     हिडन पीक                     चीन
--------------------------------------------------
12) ब्रॉड पिक    8047 मी  पाकिस्तान/
                                          चीन
--------------------------------------------------
13)गाशरब्रुम-2   8035मी   पाकिस्तान/
                                             चीन
---------------------------------------------------
14)शीशपंगमा   8027 मी      चीन

जनसांख्यिकीय संक्रमण सिद्धांत

👉प्रतिपादन-- डब्ल्यू एम थामसन
👉मांडला-- फ्रेक नाॅटेस्टीन 1945

👉नुसार, आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या स्तरात जन्म-मृत्यूच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात, त्यामुळे लोकसंख्या वृद्धि दरही वेगवेगळा असतो.

👉मते,
सामान्यतः प्रत्येक अर्थव्यवस्थांची लोकसंख्या वृद्धि 5 अवस्थांमधून जाते.

👉प्रथम-- जन्म किंवा मृत्युदर दोन्ही उच्च असतात. उदाहरणार्थ 1921 पूर्वीचा भारत

👉द्वितीय-- लोकसंख्या विस्फोट
ही अवस्था आर्थिक विकास बाधक असते. 1921 ते 1991 भारतातील अवस्था.

👉तृतीय--आर्थिक विकासाचा वेग तीव्र होतो; तसेच कुटुंब नियोजन मुळे जन्मदर व मृत्युदर दोन्ही घटतात.
या अवस्थेत देश विकसित अवस्थेत पोहोचतो

👉चतुर्थ-- सुख सुविधांच्या वाढीने प्रजोत्पादनाची इच्छा कमी होते, त्यामुळे जन्मदर व मृत्युदर दोन्ही उतरून एका निश्चित पातळीवर स्थिर होतात. यात लोकसंख्येत निव्वळ वृद्धि नगण्य ठरते. उदाहरणार्थ- युरोपातील विकसित देश

👉पंचम-- जन्मदर मृत्युदरापेक्षा कमी होतो, याने लोकसंख्येचा आकार घटतो व वृद्धांची संख्या वाढते. या अवस्थेत स्त्रिया घराच्या बाहेर पडून उत्पादक कार्य करतात त्यांचा दृष्टिकोन बदलतो उदाहरणार्थ- फ्रान्स

🇮🇳भारत हा सध्या तृतीय अवस्थेतून जात आहे.

18 April 2024

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळांचा दिवस (International Day For Mounments And Sites) म्हणून साजरा केला जातो. याला ''जागतिक वारसा दिवस'' म्हणूनही ओळखले जाते.

◆ 2024 ची थीम :-'विविधता शोधा आणि अनुभवा.' (''Discover and Experience Diversity.'')

◆ 2023 ची थीम :- 'वारसा बदल' ("Heritage Changes")

➢ उद्देश :- मानवी वारसा जतन करणे आणि संबंधित संस्थांच्या सर्व प्रयत्नांना मान्यता देणे.

➢ या दिनाचा इतिहास :-

युनेस्कोने 1982 मध्ये झालेल्या सभेत 18 एप्रिल हा जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव आयसीओएसओएसने (ICOMOS) दिला होता. त्यामुळे युनेस्कोने 18 एप्रिल हा दिन जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्यास 1983 मध्ये सहमती दर्शवली होती. त्यामुळे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा केल्या जातो.

➢ युनेस्को जागतिक वारसा स्थळे 2024 :-

सध्या जगभरात एकूण 1199 जागतिक वारसा स्थळे असून, त्यापैकी 933 सांस्कृतिक स्थळे, 227 नैसर्गिक स्थळे आणि 39 मिश्र स्थळे आहेत. आणि 56 वारसा स्थळांचा धोक्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

➢ युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त सर्वाधिक स्थळे 2024 :-

• इटली - 59
• चीन - 57
• जर्मनी व फ्रान्स - प्रत्येकी - 52
• स्पेन - 50
• भारत - 42

➢ भारतातील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

जागतिक वारसा स्थळांच्या संख्येमध्ये भारत जगात सहाव्या स्थानी असून, भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक स्थळे, तर 1 संमिश्र स्थळ आहे.

➢ महाराष्ट्रतील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

➢ भारतातील सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रमध्ये असून यात,

(1) अजिंठा लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(2) वेरूळ लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(3) घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी - (मुंबई)
(4) छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) - (मुंबई)
(5) पश्चिम घाट (कासचे पठार) - (सातारा)
(6) व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स - (मुंबई)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

18 एप्रिल 2024 चालू घडामोडी


प्रश्न – WEF च्या 2024 च्या वर्गात अलीकडेच कोणाला यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव देण्यात आले?
उत्तर - अद्वैत नायर

प्रश्न – जागतिक आवाज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १६ एप्रिल

प्रश्न – अलीकडेच कोणत्या देशाच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - नेपाळ

प्रश्न – अलीकडे कोणत्या संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - सनरायझर्स हैदराबाद

प्रश्न – स्पेस इंडियाने अलीकडेच ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - संजना संघी

प्रश्न – चेन्नई व्हेल विद्यापीठात नुकतीच मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान करण्यात आली?
उत्तर - रामचरण

प्रश्न – केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीत अलीकडे कोण आघाडीवर आहे?
उत्तर - मध्य प्रदेश

प्रश्न – नुकतीच IMD चे MD म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - क्रिस्टालिना जॉर्जिएवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित

◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू
⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia)
⭐️महिला  : नॅट सायव्हर-ब्रंट  ( England)
⭐️ T20 Cricketer of the year 2024:- हैली मैथयुस (WI)
⭐️ Test cricketer of the year 22024: टैविस हेड (Australia)

◾️विस्डेन हे एक वर्षाला प्रकाशित होणारे मॅगझीन आहे
याला "क्रिकेट चे बायबल" असे पण म्हणले जाते

◾️जागतिक हिमोफिलिया दिवस 2024
⭐️हिमोफिलिया हा एक अनुवांशिक रक्तस्त्राव विकार आहे ज्यामध्ये रक्त योग्यरित्या गुठळ्या होत नाही, ज्यामुळे रक्तस्त्राव लवकर थांबत नाही
⭐️2024 थीम : Equitable access for all: recognizing all bleeding disorders"

◾️प्रसिद्ध कर्नाटक संगीतकार केजी जयन (89) यांचे त्रिपुनिथुरा येथे निधन झाले.
⭐️2019 मध्ये, पद्मश्री, देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

◾️इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या वर्षाच्या अखेरीस सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोबा-3 लाँच करणार
⭐️प्रक्षेपण सप्टेंबरसाठी लक्ष्य केले गेले आहे
⭐️ इस्रोच्या PSLV-XL रॉकेटचा वापर करून श्रीहरिकोटा येथून नेले जाईल

◾️शेख अहमद अब्दुल्ला यांची कुवेतचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती
⭐️यापूर्वी त्यांनी अर्थ, आरोग्य, तेल आणि माहिती यासारख्या महत्त्वाच्या मंत्रिपदांवर काम केले आहे.
⭐️माजी पंतप्रधान शेख मोहम्मद यांच्या राजीनाम्यानंतर यांची नियुक्ती

◾️भारताने एक स्वदेशी बुलेट ट्रेन विकसित करण्यास सुरुवात केली आहे जी 250 किलोमीटर प्रति तास (किमी) वेग ओलांडेल,
⭐️भारताने मुंबई-अहमदाबाद मार्गावर तैनात करण्याची योजना आखली आहे, ती 320 किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकते.

◾️Operation True Promise
⭐️ऑपरेशन चे नाव
⭐️इराणने ऑपरेशन अंतर्गत इस्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडली

चालू घडामोडी :- 17 एप्रिल 2024

◆ सर्वात बिझी टॉप-10 विमानतळामध्ये पहिल्या स्थानी ॲटलांटा हर्ट्सफिल्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ(अमेरिका) आहे.

◆ दरवर्षी 17 एप्रिल रोजी जगभरात जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो.

◆ एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) वर्ल्ड, 'इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) एअरपोर्ट' ने जारी केलेल्या यादीनुसार, दिल्ली हे जगातील दहावे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.

◆ 'संजना संघी' ची स्पेस इंडियाने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ इस्रायली गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ अवि विग्डरसन यांना 2023 च्या असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी (ACM) एएम ट्युरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ पलक गुलियाने ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

◆ इंग्लंडचा महान फिरकी गोलंदाज आणि ICC हॉल ऑफ फेम इंडस्ट्री डेरेक अंडरवुड यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

◆ केंद्र सरकारच्या ‘ग्रीन क्रेडिट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेश राज्य अव्वल स्थानावर आहे.

◆ BharatPe ने 'नलिन नेगी' यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ जागतिक केळी दिवस[17 एप्रिल 2024] दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी साजरा करण्यात येतो.

◆ क्रिकेटपटू जोस बटलर हा आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या तर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

◆ IPL मध्ये एका सामन्यात शतक, विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेट पटू सुनिल नरेन ठरला आहे.

◆ जस्ट अ मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBI च्या डी. सुब्बाराव या माजी गव्हर्नर ने लिहिले आहे.

◆ Wisden क्रिकेटर ऑफ दी इयर 2024 साठी leading क्रिकेटर ऑफ दी इयर मेन "पॅट कमिन्स" ठरला आहे.

◆ Wisden क्रिकेटर ऑफ दी इयर 2024 मध्ये ॲशली गार्डनर या महिला क्रिकेट पटुचा समावेश झाला आहे.

◆ टी 20 क्रिकेट मध्ये 6 चेंडूवर 6 सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह ऐरी हा जगतील तिसरा फलंदाज ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

17 April 2024

हिमालया मधील महत्त्वाच्या खिंडी..


# अ) जम्मू आणि काश्मीर  ::

       1) बारा लाचा 

       2) बनिहल खिंड

       3) झोजी - ला 

       4) पीर पंजाल खिंड 

------------------------------------------------

# ब) अरुणाचल प्रदेश ::

        1) बोमदी - ला 

        2) दिहांग खिंड 

        3) दिफू खिंड 

        4) लिखापानी खिंड 

---------------------------------------------------

# क) उत्तराखंड :: 

       1) लिपु लेख खिंड 

       2) मना खिंड 

       3) मंगशा धारा खिंड 

       4) मुलिंग ला 

       5) निती खिंड 

       6) तराईल खिंड 

       7) माऱ्हि ला 

       8) तिम - जून - ला 

       9) शलसल खिंड 

     10) बालचा धुरा खिंड 

     11) कुंग्रीन बिंगरी 

     12) लांपिया खिंड 

---------------------------------------------------

# ड) हिमाचल प्रदेश :: 

        1)बुरझिल खिंड 

        2)देबसा खिंड

        3)रोहतांग खिंड 

        4)शिप्की - ला 

---------------------------------------------------

# इ) सिक्कीम :: 

        1)जेलप - ला 

        2) नथु - ला 


सघराज्याची वैशिष्ट्ये



🔹* भारतीय संघराज्याची ही अमेरिकन संघराज्याप्रमाणे केंद्राकर्षी नव्हे तर त्यामुळे यास युनियन शब्द वापरला आहे.


* प्रबळ केंद्रशासन - अधीकार विभागामध्ये केंद्र शासनाला पूर्णतः माप देण्यात आले, केंद्र सूचीतील अधिकार ९९ विषय शिवाय उर्वरित अधिकार केंद्राला बहाल करण्यात आले आहे. तसेच समवर्ती सूचीतील ५२ विषय यावर केंद्र कायदे करू शकते.


* केंद्र आणि राज्य यासाठी एकच संविधान अमेरिकेप्रमाणे प्रत्येक राज्याला स्वतंत्र संविधान नाही.


* भारतीय घटनेनुसार एकेरी नागरिकत्व.


* घटक राज्याच्या अस्तित्वाच्या हमीचा अभाव. कारण संसद साध्या बहुमताद्वारे एखाद्या घटक राज्याची सीमा बदलू शकते.


* आणीबाणीविषयक तरतुदी [ कलम ३५२, कलम ३५६, कलम ३६० ]


* राज्यपाल हे पद घटक राज्यांना घटनात्मक प्रमुख असलेला राज्यपाल केंद्रामार्फत नियुक्त केला जातो. आणि त्याची राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. म्हणजे त्याची नियुक्ती बडतर्फी संदर्भात केंद्रालाच सर्वाधिकार देण्यात आले.


* एकात्म न्याय व्यवस्था


* राज्यसभा म्हणजे घटक राज्याचे प्रतिनिधित्व होय या सभागृहात घटकराज्यांचा समान प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे.


* एकात्म स्वरूपाची लेखापरीक्षण व्यवस्था.


* एकात्म स्वरूपाचा लेखापरीक्षण व्यवस्था.


* एकात्म स्वरूपाचा निर्वाचन निवडणूक आयोग.


* राज्य विधेयकावर राष्ट्रपतींना असणारा अधिकार


* डॉ आंबेडकरांनी घटना परिषदेत चर्चा करताना ' भारतीय संविधान द्विदल शासन निर्माण करते ' त्यामुळे ते संघराज्यात्मक स्वरूपाचे आहे असे मत मांडले.


महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय



क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय


1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.


2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.


3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.


4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.


5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.


6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला


7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.


8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.


9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती


10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.


11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.


12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.


13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची


14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची


15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत


16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण


17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण


18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना


19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.


20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास


21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण


22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.


23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण


24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल


25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात