14 June 2024

इतिहास प्रश्नसंच

१. युरोपियन सत्तांनी भारतात स्थापन केलेल्या पहिल्या वाखारींसंदर्भात योग्य जोड्या जुळवा.

अ) पोर्तुगीज             १) कोची
ब) डच                      २) मछलीपट्टनम
क) ब्रिटीश                ३) सुरत
ड) डेन्स                    ४) चिंचोसा

        अ   ब   क   ड
   A.  ३   ४   २   १
   B.  ४   २   ३   १
   C.  १   २   ३   ४ ✔
   D.  २   १   ३   ४

२. १८१३ च्या सनदी कायद्यानुसार खालीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) कंपनीचा भारतातल्या व्यापाराचा एकाधिकार समाप्त केला.
ब) ख्रिश्चन मिशानरींना भारतात धर्मप्रसार करण्याची परवानगी देण्यात आली.
क) दरवर्षी १ लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली.
ड) भारतासाठी बिशप व कंपनीच्या इतर तीन प्रांतांसाठी आर्चबिशपची नेमणूक करण्यात आली.

   A. अ केवळ
   B. अ आणि ब
   C. अ ब आणि क
   D. वरील सर्व ✔

३. खालीलपैकी ब्रिटीश संसदेने केलेल्या कोणत्या कायद्यानुसार नियामक मंडळाची (Board of Control) स्थापना करण्यात आली ?

   A. नियामक कायदा १८७३
   B. पिट्स इंडिया कायदा ✔
   C. सनदी कायदा १८१३
   D. सनदी कायदा १८३३

४. वॉरेन हेस्टींग्जसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या.

अ) 'कलेक्टर' या पदाची निर्मिती केली.
ब) दुहेरी शासनव्यवस्था लागू केली.
क) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.
ड) चार्ल्स विल्किंस च्या गीतेच्या इंग्रजी अनुवादाला प्रस्तावना लिहिली.

   A. ब बरोबर
   B. ब,क आणि ड बरोबर
   C. क आणि ड बरोबर
   D. अ,क आणि ड बरोबर ✔

५. १८०२ रोजी 'वसई' येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?

   A. वॉरेन हेस्टींग्ज
   B. वेलस्ली ✔
   C. डलहौसी
   D. कॉर्नवॉलिस

६. आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत असे जाहीर करणाऱ्या कोणत्या व्यक्तीने पंजाबमध्ये 'अहमदिया' आंदोलन सुरु केले ?

   A. सर सय्यद अहमदखान
   B. लियाकत अली
   C. खाफार खान
   D. मिर्झा गुलाम अहमद ✔

७. खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे सुसंकृतपणा(ब्रिटीश) व रानटीपणा यांमधील झगडा होता ?

   A. व्ही. ए. स्मिथ
   B. सर जॉन लॉरेन्स
   C. टी. आर. होल्म्स ✔
   D. सायमन फ्रेजर

८.
अ) गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म १८५६ मध्ये टेंभू(कराड) येथे झाला.
ब) १८८८ मध्ये सुधारक हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरु केले.
क) कर्वे प्रकरणामध्ये आगरकर व टिळक यांना १०१ दिवस तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

   A. फक्त अ
   B. अ आणि ब ✔
   C. वरीलपैकी एकही नाही
   D. वरील सर्व

९. खालीलपैकी कोणी नाग महिला नेत्या 'गायदिन लियू' यांना 'राणी' हि पदवी देऊन सन्मानित केले ?

   A. सुभाषचंद्र बोस
   B. महात्मा गांधी
   C. पंडित नेहरू ✔
   D. सरदार पटेल

१०) 'इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखन कोणी केले ?

   A. स्वातंत्र्यवीर सावरकर
   B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
   C. डॉ. राजेंद्रप्रसाद ✔
   D. सर सय्यद अहमदखान

११. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या काराघृहात ठेवले होते ?

   A. ठाणे
   B. अंदमान
   C. मंडाले
   D. एडन ✔

१२. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?

अ) ज्ञान प्रसारक मंडळी
ब) बॉम्बे असोशिएशन
क) लंडन इंडियन असोशिएशन
ड) ईस्ट इंडिया असोशिएशन

   A. अ,ब आणि क फक्त
   B. ब,क आणि ड फक्त
   C. अ,ब आणि ड फक्त
   D. अ,ब,क आणि ड ✔

१३.भारतात रेल्वे चे जाळे उभारण्या करिता लोर्ड डलहौसीने नियोजन केले कारण

अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी
क) भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त ✔
   C. ब आणि क फक्त
   D. अ,ब आणि क

१४. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्या साठी प्रयत्न का केला ?

अ) ते विचाराने उदारमतवादी होते
ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती
क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवे, असे वाटत होते
ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते

   A. अ आणि ब फक्त
   B. अ आणि क फक्त
   C. अ,ब आणि क
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत ✔

१५. भारतातला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रीतीशांच्या धोरणात बदल झाला कराण -

अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर
ब) भारतात राष्ट्रावादास आलेले उधाण
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम

   A. अ आणि ब फक्त
   B. बआणि क फक्त
   C. अ आणि क फक्त
   D. अ,ब, आणि क ✔

१६. खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात ई.स. १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परम हंस’ मंडळीचा भर होता ?

अ) जातीबंधाने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्त्री शिक्षण
ड) मूर्तीपूजा बंदी

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त
   C. अ,ब आणि क फक्त
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य ✔

१७. हिंदुस्तान सरकारच्या १९३५ कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?

अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रीपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे १४ मुद्दे

   A. अ,ब आणि क
   B. ब,क आणि ड
   C. अ,ब आणि ड
   D. अ,ब,क आणि ड ✔

१८. १९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि ह्या अधिवेशनात

अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वंदेमातरम्’ पहिल्यांदाच गायले गेले
ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला
क) मवाळ मार्ग चा स्वीकार करण्यात आला
ड) बॅरीस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले

   A. अ आणि ब
   B. क आणि ड
   C. ब आणि क ✔
   D. अ आणि ड

१९. अयोग्य जोडी निवडा

   A. श्रीधरलू नायडू - वेद समाज
   B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
   C. रवींद्रनाथ टागोर – तत्वबोधिनी सभा ✔
   D. शिवनारायण अग्निहोत्री – देव समाज

२०. अस्पृश्यांना ‘लष्करात व पोलिसात’ नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवड च्या सभेत कोणी मागणी केली ?

अ) शिवराम जानबा कांबळे
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) अॅड. बि.सी. कांबळे
ड) गोपाळबुवा वलंगकर

   A. अ फक्त ✔
   B. ब फक्त
   C. क आणि ड
   D. ड फक्त

२१. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
   A. नीळ
   B. भात फक्त
   C. गहू फक्त
   D. भात व गहू ✔

२२. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?

अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे.
क) लॉंर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

   A. अ आणि ब ✔
   B. ब आणि क
   C. अ आणि क
   D. अ,ब आणि क

२३. पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?

   A. परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्दासान सभा
   B. प्रार्थना समाज व आर्य समाज
   C. इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्विस लीग
   D. वरील तीन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही ✔

२४. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

   A. जगन्नाथ शंकर शेठ
   B. बाळशास्त्री जांभेकर ✔
   C. भाऊ दाजी लाड
   D. छत्रपती शाहूमहाराज

अलिगड मुस्लीम आंदोलन


🔹अलीगढ़ आन्दोलनाची सुरुवात अलीगढ़ (उत्तर प्रदेश)येथे झाली.

🔸आन्दोलन चे संस्थापक सर सैय्यद अहमद ख़ाँ होते

🔹तयांनी 'पीरी-मुरीदी प्रथा' एवं 'दास प्रथा' समाप्त करण्याचे प्रयत्न केले

🔸सर सैय्यद अहमद ख़ाँ नी 1875 ई. मध्ये अलीगढ़ मध्ये एक ‘ऐंग्लो मुस्लिम स्कूल’ ज्याला 'ऐंग्लों ओरियन्टल स्कूल' म्हणत

🔹यथे मुस्लिम धर्म, पाश्चात्य विषय तथा विद्वान् जैसी सभी विषयांची शिक्षा दीली जात !



📚 आन्दोलनाचेे इतर नेते 📚

🔸दिल्लीत जन्मलेले सैय्यद अहमद ने 1839 ई. मध्ये  ईस्ट इंडिया कम्पनीत नौकरी केली। 

🔹कम्पनीच्या न्यायिक सेवेत कार्य करताना  1857 च्या उठावात कम्पनीची साथ दिली

🔸 1870 नंतर प्रकाशित 'डब्ल्यू. हण्टर' चे पुस्तक 'इण्डियन मुसलमान' मध्ये सरकार ला सल्ला दिला कि मुसलमानांबरोबर समझौता करावा

🔹सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित 'अलीगढ़ आन्दोलन' चे त्यांच्या व्यतिरिक्त आन्दोलन के अन्य प्रमुख नेता👇

🔺नजीर अहमद चिराग 

🔺अली अल्ताफ 

🔺हसैन मौलाना 

🔺शिबली नोमानी


अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते ?

उत्तर👇


1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता. 

2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे. 

3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. 

4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले. 

5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला. 

6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला. 

7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले.

 8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला. 

9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली.


पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला. 


10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती


**बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती

सर्वपक्षीय सभेत नेहरू रिपोर्टवर एकमत झाले तरी ते दिखाऊ होते. कारण मूस्लीम लीगचा विरोध मूलभूत स्वरूपाचा व जातीय होता. लीगमधील मुस्लिमांना हा रिपोर्ट मान्य नव्हताच; म्हणून त्याचा फेरविचार करण्यासाठी आगाखानांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये मुस्लीम लीगचे दिली येथे खास अधिवेशन भरविण्यात आले.

बॅ. जीना या परिषदेला हजर राहिले. त्यांना सर्वपक्षीय सभेत मोठा विरोध झाला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते.
लीगच्या अधिवेशनात त्यांनी आपले राजकीय तत्वज्ञान त्यांच्या प्रसिद्ध ‘चौदा मुद्यात’ सांगितले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे:
भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.
सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.
पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.
मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.
राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत..

मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मूलभूत अधिकाराचा विकास

जगामध्ये सर्वप्रथम इसवी सन 1215 मध्य ब्रिटेन इथे चर्च चे अधिकार सामान्य लोकांनी मागितले ज्याला मॅग्ना कार्टा असे म्हणतात. इथूनच मूलभूत अधिकारांचे विकास मानले जाते. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये


समता (Equality)

स्वातंत्र्य (Freedom)

बंधुत्व

यांचा विकास झाला.


1931 मध्ये कराचीमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभ भाई पटेल अध्यक्ष होते. यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या अधिवेशनात मूलभूत अधिकारांची मागणी केली. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक नेता एम एन रॉय यांनी मूलभूत अधिकारांची मागणी केली होती.


M. N. Roy हे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आले व मुलभूत अधिकारांसाठी संविधान परिषदेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यात आली.


व या समितीच्या शिफारशींच्या अनुसार भारतीय संविधानाच्या भाग-3 मध्ये कलम 12 ते 35 च्या दरम्यान 7 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला.


1) समतेचा अधिकार ( कलम 14 ते 18)


2) स्वातंत्र्याचा अधिकार ( कलम 19 ते 22)


3) शोषणाविरुद्धचा अधिकार ( कलम 23 ते 24)


4) धार्मिक स्वातंत्र्य ( कलम 25 ते 28)


5) शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार ( कलम 29 ते 30)


6) संपत्तीचा अधिकार


7) संविधानिक उपचाराचा अधिकार (कलम 32 ते 35)


असे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले परंतु 44 वी घटना दुरुस्ती 1978 अनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला 1978 मध्ये मोरारजी देसाईंची सरकार आली होती त्यांनी निवडून येताच  संपत्तीचा अधिकार डिलीट केला.


संपत्तीच्या अधिकाराला कलम  300A अनुसार कायदेविषयक अधिकार बनवण्यात आले.


कलम 12:- यानुसार राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे कारण मूलभूत अधिकार राज्यच त्या राज्याच्या नागरिकांना देते व या अधिकारांवर नियंत्रणही राज्यच ठेवते.  इथे राज्य म्हणजे भारत.


कलम 13:-  न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे.


आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये

🔻- लक्षणे 


१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.


२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.

उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.


३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे  आदिवासी समुह आहेत.


४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.


५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.


६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.


७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.


८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.


९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.

=========

आदिवासी समुह वैशिष्ट्य


१) विशिष्ट भूप्रदेश

   एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते. 

उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि. 

कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात. 


२) समूहाचा आकार

   आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.


३) रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह

   आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात. 


४)  विवाहपद्धती 

   विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.


५)  कुटुंबपद्धती 

   या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.


६)  आर्थिक स्थिती 

   आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात. 

उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.


७)   धर्म व जादूचा प्रभाव 

   आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.


८)  शिक्षण व मनोरंजनाची साधने 

   दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नकला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.


९)  स्त्रियांचा दर्जा

   आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.


१०)  जीवनपद्धती

   आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.

============================================



सहकाराची तत्वे.


🅾️इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance - ICA) स्थापना झाली.

 ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.

 सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजे सहकारी तत्व होय.

 मात्र, या समितीने ठरविलेल्या तत्वांवर एकमत न झाल्याने ICA ने 1963 मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक किर्तीचे सहकार तत्वज्ञ प्रा.डि.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली.


🅾️ तसेच या समितीच्या 1966 च्या अहवालात पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली आहेत.


1. मूलभूत तत्वे -

🅾️ऐच्छिक सभासदत्वलोकशाही संघटनगुंतविलेल्या पुंजीवर व्याजधारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटपसभासद शिक्षणसहकारी संस्थातील सहकार्य


2. सामान्य तत्वे -

🅾️रोखीने व्यवहारराजकीय व धार्मिक अलिप्तता - हे तत्व मात्र अव्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले.काटकसरस्वावलंबन व परस्पर मदबसेवा भाव


🧩सहकारी संस्थांचे प्रकार -

🅾️सहकारी संस्थांचे प्रमुख चार वर्ग पडतात.


1. कृषी पतसंस्था (Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️भारतात राज्यांमधील कृषी पतसंस्था रचना त्रिस्तरीय आहे.

🅾️गरामीण स्तरावरील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था.जिल्हा स्तरावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.राज्य स्तरावरील राज्य सहकारी बँक (शिखर बँक).तसेच दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यार्‍या भू-विकास बँका राज्य व जिल्हा स्तरावर कार्य करतात.


2. बिगर कृषी पतसंस्था (Non-Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️नागरी सहकारी बँकापगारदार नोकरांच्या पतसंस्थाप्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था इ.


3. कृषी बिगर पतसंस्था (Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी साखर कारखाने, खांडसरी उद्योगसहकारी सूत गिरण्यासहकारी दूध उत्पादक संस्थासहकारी तेलप्रक्रिया संस्थाकृषी खरेदी-विक्री संघकृषी सहकारी पणन संस्थाप्राथमिक मच्छिमारी सह.संस्था. इ.


4. बिगर-कृषी-बिगर-पतसंस्था (Non-Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी ग्राहक भांडारे.सहकारी गृहनिर्माण संस्था.पावरलुम विणकर सह. संस्था.चर्मकार सह. संस्था.कुंभार सह. संस्था इ.


13 June 2024

काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक


▪️ग्लोबल Gender Gap index 2024
• प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक

▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया

▪️"वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये
• प्रथम - नॉर्वे,
• भारताचा क्रमांक - 159

▪️जागतीक FIFA क्रमवारी -
• प्रथम देश अर्जेटिना 
• भारत 99 वा.

▪️जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड
• भारत 126

▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक
• प्रथम - डेन्मार्क
• भारत 40 वा

▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक
• प्रथम देश- स्वीडन
• भारत 67 सावा

▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-
• प्रथम - नॉर्वे
• भारत 161 वा

▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक -
• प्रथम देश- आइसलँड
• भारत 127 वा

▪️जागतिक दहशदवाद निर्देशांक
• प्रथम देश - अफगाणिस्थान
• भारत 13 वा

▪️शाश्वत विकास अहवाल 2023
• प्रथम देश - फिनलॅंड
• भारत 112 वा

▪️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023
• प्रथम देश- बेलारूस,
• भारत 111 वा

▪️निवडणूक लोकशाही निर्देशांक
• प्रथम देश -डेन्मार्क
• भारत 108 वा

▪️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023
• प्रथम देश जपान
• भारत 85 वा.

महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न – आज भारत सरकारने नवीन लष्करप्रमुख पदी कोणाची निवड केली ?

उत्तर– उपेंद्र द्विवेदी - ३० वे लष्करप्रमुख

🔖 प्रश्न – नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली ?

उत्तर– अनामिका राजीव

🔖 प्रश्न – अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली ?

उत्तर– ३ कोटी

🔖 प्रश्न – इस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असुन यामध्ये १५ पैकी किती देशांनी पाठिंबा दिला ?

उत्तर– १४

🔖 प्रश्न – हेल्ब्रॉन नेकारकप 2024 एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?

उत्तर– भारतीय टेनिसपटू समिट नागपाल

🔖 प्रश्न – जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली ?

उत्तर– अमेरिका

🔖 प्रश्न – १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात NOTA ला मतदान झाले ?

उत्तर– रायगड

🔖 प्रश्न – भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोळा ने सज्ज LSAM-१३ हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रॉजेक्ट pvt LTD ने तयार केले ?

उत्तर– विशाखापट्टणम

🔖 प्रश्न – FIH हॉकी मेन्स ज्युनिअर वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार ?

उत्तर– भारत

🔖 प्रश्न – नुकतीच जपान-भारत सागरी सराव (JIMEX)-24 ची 8 वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ?

उत्तर– योकोसुका, जपान

🔖 प्रश्न – लेफ्टनंट जनरल वाकर-उझ-जमान यांची कोणत्या देशाच्या लष्करप्रमुख पदी निवड करण्यात आली ?

उत्तर– बांगलादेश

🔖 प्रश्न – महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार ?

उत्तर– राजस्थान

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ सिक्कीम चे नवे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाग

◾️पक्ष : सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा
◾️शपथ : 10 जून 2024 ला
◾️सलग 2 वेळा ते सिक्कीम चे मुख्यमंत्री बनले
◾️सिक्कीम चे गव्हर्नर : लक्ष्मण प्रसाद आचार्य ◾️यांनी त्यांना शपथ दिली
सिक्कीम विधानसभा जागा : 32
◾️त्यापैकी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 31 जिंकल्या

❇️ RBI ने पेमेंट फसवणुकीचे धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी विविध पैलू तपासण्यासाठी समिती स्थापन केली
◾️नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी MD आणि CEO श्री. AP होटा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
❇️ SEBI ला द एशियन बँकर तर्फे 'बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर' पुरस्काराने सन्मानित
◾️हाँगकाँग येथे आयोजित समारंभात सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला

❇️ संयुक्त राष्ट्र ने इजराईल देशाला काळ्या यादीत ( back list ) केलं आहे
◾️इजराईल आणि गाझा युद्धामुळे खूप लहान मुलांचा मृत्यु झाला आणि मानवाधिकारांचे उल्लंघन झाले
◾️त्यामुळं Black List केलं आहे
◾️Black list असलेले काही देश
⭐️हमास ,ISIS, अल कायदा या संघटना
⭐️इराक , म्यानमार , येमन, सोमालिया ,रशिया हे देश

❇️ पूजा तोमर UFC (Ultimate Fighting Championship) मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय ठरली
◾️तिने महिलांच्या स्ट्रॉवेट विभागात ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला.
◾️ त्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या बुढाना गावातील आहेत
◾️त्यांचं टोपण नाव The Cyclone

◾️NITI - National Institution for Transforming India
⭐️1 जानेवारी 2025 ला स्थापना
⭐️नीती आयोग अध्यक्ष : पंतप्रधान
⭐️नीती आयोग उपाध्यक्ष : श्री सुमन बेरी
⭐️नीती आयोग CEO : श्री BVR सुब्रह्मण्यम

❇️ नुकतेच झालेले काही मुख्यमंत्री लक्षात ठेवा
◾️मोहन चरण माझी : ओडीसा मुख्यमंत्री
◾️लालदुहोमा : मिझोराम मुख्यमंत्री
◾️भजनलाल शर्मा : राजयस्थान मुख्यमंत्री
◾️मध्यप्रदेश मुख्यमंत्री : मोहन यादव
◾️तेलंगणा मुख्यमंत्री : रेवंत रेड्डी

❇️ 2025 चा पुरुष ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे
◾️ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने तशी घोषणा केली आहे
◾️अध्यक्ष : तैयब इकराम
◾️डिसेंबर 2025 ला स्पर्धा होतील
◾️2013 , 2016 ,2021 ला याचे आयोजन भारतात झाले होते

❇️ संत कवी थिरुमंगाई अलवार यांची  मूर्ती ब्रिटन मधून परत आणली जाणार आहे
◾️प्राचीन धातूची मूर्ती ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अश्मोलियन म्युझियममध्ये आहे
◾️ही 500 वर्षे जुनी मूर्ती आहे
◾️ह्याची उंची 60 cm आहे
◾️1967 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ मध्ये ही ठेवण्यात आली

❇️ ग्लोबल Gender Gap index 2024 मध्ये भारताचा 129 वा क्रमांक आहे
◾️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ( WEF) ने प्रकाशित केला
◾️146 देशांचा अहवाल प्रसिद्ध
◾️पहिल्या 3 क्रमांकावर
1)आइसलँड
2) फिनलँड
3)नॉर्वे
◾️शेवटचा देश सुदान आहे ( 146 क्रमांक)

❇️ भारताचे नवीन आर्मी प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे बनले आहे
◾️30 व्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख असतील
◾️हे सध्या लष्कर उपप्रमुख आहेत
◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून ला पदभार स्वीकारतील
◾️15 डिसेंबर 1984 ला भारतीय सेनेमध्ये सामील झाले होते

❇️ भारतीय आर्मी
◾️स्थापना : 26 जानेवारी 1950
◾️मुख्यालय : दिल्ली
◾️सेना दिवस : 15 जानेवारी ला

🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु
◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान
◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत)
◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी
◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन 
◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी
◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग
◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल
◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव
◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद
◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया
◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका
◾️RAW प्रमुख : रवी सिंह
◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते
◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन

-------------------------------------------

महत्त्वाच्या आयोगांची माहिती :-

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.

⚖️ Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल

👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.

👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.

🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

11 June 2024

चालू घडामोडी :- 10 JUNE 2024

1) आंतरराष्ट्रिय दृष्टीदान दिवस 10 जून रोजी साजरा करण्यात येतो.

2) भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

3) अनुभवी स्पॅनिश खेळाडू 'कोर्लोस अल्काराझ' याने फ्रेंच ओपन 2024 (पुरुष एकेरी) विजेतेपद पटकावले आहे.

4) ICC T-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे.

5) भारताचा युवा टेनिसपटू 'सुमित नागल' याने 'हेलब्रोनर नेकरकप स्पर्धा' जिंकली आहे.

6) भारतीय तिरंदाज कुमुद सैनीने तिरंदाजी आशिया कप 2024 स्टेज 3 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

7) 09 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन' साजरा करण्यात आला.

8) 'समीर बन्सल' हे PNB MetLife India Insurance चे MD आणि CEO बनले आहेत.

9) ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक 'नरसिंग' यांची 'दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार'साठी नामांकन करण्यात आले आहे.

10) नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा शपथ घेतली.

11) राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मु यांनी 72 मंत्र्यांना शपथ दिली आहे.

12) नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे दुसरे नेते ठरले आहे.

13) सोफिया फिरडौस या ओडिशा राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरल्या आहेत.

14) युनिसेफ च्या अहवालानुसार जगात अफगाणिस्तान या देशात कुपोषित मुलाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

15) भारत देशात 40 टक्के कुपोषण आढळून आले आहे.

16) UNICEF संस्थेने चाईल्ड न्यूट्रिशन रिपोर्ट 2024 जारी केला आहे.

17) नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथ विधीला सात देशांचे नेते उपस्थित होते.

18) फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024 च्या महिला एकेरीचे विजेतेपद इगा स्वीयातेक हिने पटकावले आहे.

19) पोलंड देशाची टेनिस पटू इगा स्वीयातेक हीने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

20) भारताच्या अंशू मलिक आणि अंतिम पंघाल यांनी बुडापेस्ट आंतरराष्ट्रिय मानांकन कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.

21) केंद्रीय निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18 व्या लोकसभेत आसाम राज्यात सर्वाधिक मतदान झाले आहे.

22) भारत सरकारच्या नवीन मंत्री मंडळामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना स्थान मिळाले आहे.

23) पाकिस्तान या देशाची संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

24) ESIC कर्मचारी राज्य विमा मंडळ च्या Additional D irector genral पदी कमल किशोर सोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

10 June 2024

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी घेतली पंतप्रधान पदाची शपथ

▪️ शपथ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिली.
▪️ स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत.

🫂 शपथविधी ला उपस्थित असलेले विदेशी लोक

🇧🇩 बांग्लादेश च्या प्रधानमंत्री - शेख हसीना
🇱🇰 श्रीलंका चे राष्ट्रपति - रानिल विक्रमसिंघे
🇧🇹 भूटान चे प्रधानमंत्री - शेरिंग तोबगे
🇳🇵 नेपाल चे प्रधानमंत्री - पुष्प कमल दहल
🇲🇺 मॉरीशस चे प्रधानमंत्री - प्रविंद जगन्नाथ
🇲🇻 मालदीव चे - राष्ट्रपति मुइज्जू

✒️ पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी

▪️ कलम 75 - पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या द्वारे केली जाते.
▪️ कलम 74(1) - राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असते.
▪️ शपथ कशी असवी हे अनुसूचित 3 मध्ये सांगितले आहे.
▪️ मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही - म्हणजे 543 चे 15% = 81 पर्यंत मंत्र्यांची संख्या असते

⏰ पंतप्रधान आणि त्यांची वर्षे

▪️ सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान - जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस )
▪️ पहिले काळजीवाहू पंतप्रधान - गुलझारीलाल नंदा
▪️ पहिल्या महिला पंतप्रधान - इंधिरा गांधी
▪️ सर्वात जास्त वय असलेले पंतप्रधान - मोरारजी देसाई
▪️ राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान - मोरारजी देसाई
▪️ सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान - राजीव गांधी
▪️ कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान - चौधरी चरणसिंग ( पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी )
▪️ सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान - अटलबिहारी वाजपेयी
▪️ तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते - नरेंद्र मोदी

चालू घडामोडी :- 09 JUNE 2024

1) दरवर्षी 09 जून रोजी जगभरात 'जागतिक मान्यता दिन' (हिंदीमध्ये जागतिक मान्यता दिन) साजरा केला जातो.

2) दरवर्षी 09 जून रोजी प्रवाळाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी 'कोरल ट्रॅगल डे' साजरा केला जातो.

3) प्रवाळ त्रिकोण दिन सर्वप्रथम 09 जून 2012 रोजी साजरा करण्यात आला.

4) ईनाडू ग्रुपचे संस्थापक आणि ज्येष्ठ मीडिया व्यक्तिमत्व रामोजी राव यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

5) पेंटब्रश आर्ट कम्युनिटी, भारतीय प्रवासी कलाकारांच्या गटाने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 'रेट्रो रिव्हायव्हल' नावाचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

6) नवीनतम QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2025 नुसार, IIT खरगपूर ही देशातील चौथी सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था बनली आहे.

7) गॅम्बियन सिव्हिल सर्व्हट्ससाठी चौथा मिड-करिअर प्रशिक्षण कार्यक्रम 'नवी दिल्ली' येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

8) युनायटेड नेशन्स (UN) ने सशस्त्र संघर्षांदरम्यान मुलांवर गुन्हे करणाऱ्या देशांच्या 'लाजरी यादी'मध्ये इस्रायल आणि हमासचा समावेश केला आहे.

9) बिस्लेरी लिमोनाटाने बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर यांची पहिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

10) कॅनडाचे माजी पंतप्रधान विल्यम लिऑन मेकेन्झी किंग हे सर्वाधिक काळ (21 वर्षे, 154 दिवस) सत्तेवर राहणारे जागतिक नेते आहेत.

11) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार बर्ड फ्लूमुळे जगातील पहिला मानवी बळी (मृत्यू) मेक्सिकोमध्ये झाला आहे.

12) रामोजी राव यांनी 1984 मध्ये चित्रपटांची निर्मिती सुरू केली.

13) रामोजी राव यांना 2000 मध्ये 'नुवी कवळी' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

14) जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ संकुल म्हणून 'रामोजी फिल्म सिटी'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.

15) उत्तर प्रदेशा ची पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

16) पूजाने तोमरने 2012 पासून MMA फायटिंगला सुरुवात केली होती.

17) भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या पहिल्या क्रू मिशनमध्ये बोईंग स्टारलाइनरमधून अंतराळात उड्डाण करणारी पहिली महिला ठरली आहे.

18) भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमे अंतर्गत तिसऱ्यांदा अंतराळात पोहचल्या आहेत.

19) सुनीता विल्यम्स यांनी सर्वप्रथम श्री गणेशाची मूर्ती आणि भगवद्गीता अंतराळात नेली आहे.