Thursday 1 October 2020

सहकाराची तत्वे.


🅾️इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance - ICA) स्थापना झाली.

 ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.

 सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजे सहकारी तत्व होय.

 मात्र, या समितीने ठरविलेल्या तत्वांवर एकमत न झाल्याने ICA ने 1963 मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक किर्तीचे सहकार तत्वज्ञ प्रा.डि.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली.


🅾️ तसेच या समितीच्या 1966 च्या अहवालात पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली आहेत.


1. मूलभूत तत्वे -


🅾️ऐच्छिक सभासदत्वलोकशाही संघटनगुंतविलेल्या पुंजीवर व्याजधारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटपसभासद शिक्षणसहकारी संस्थातील सहकार्य


2. सामान्य तत्वे -


🅾️रोखीने व्यवहारराजकीय व धार्मिक अलिप्तता - हे तत्व मात्र अव्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले.काटकसरस्वावलंबन व परस्पर मदबसेवा भाव


🧩सहकारी संस्थांचे प्रकार -


🅾️सहकारी संस्थांचे प्रमुख चार वर्ग पडतात.


1. कृषी पतसंस्था (Agricultural Credit Co-Operatives) -


🅾️भारतात राज्यांमधील कृषी पतसंस्था रचना त्रिस्तरीय आहे.


🅾️गरामीण स्तरावरील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था.जिल्हा स्तरावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.राज्य स्तरावरील राज्य सहकारी बँक (शिखर बँक).तसेच दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यार्‍या भू-विकास बँका राज्य व जिल्हा स्तरावर कार्य करतात.


2. बिगर कृषी पतसंस्था (Non-Agricultural Credit Co-Operatives) -


🅾️नागरी सहकारी बँकापगारदार नोकरांच्या पतसंस्थाप्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था इ.


3. कृषी बिगर पतसंस्था (Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -


🅾️सहकारी साखर कारखाने, खांडसरी उद्योगसहकारी सूत गिरण्यासहकारी दूध उत्पादक संस्थासहकारी तेलप्रक्रिया संस्थाकृषी खरेदी-विक्री संघकृषी सहकारी पणन संस्थाप्राथमिक मच्छिमारी सह.संस्था. इ.


4. बिगर-कृषी-बिगर-पतसंस्था (Non-Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -


🅾️सहकारी ग्राहक भांडारे.सहकारी गृहनिर्माण संस्था.पावरलुम विणकर सह. संस्था.चर्मकार सह. संस्था.कुंभार सह. संस्था इ.


No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची

🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर     कळसुबाई        1646 नाशिक            स...