Monday 1 January 2024

राज्यसेवा पुर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?

 ✳️ राज्यसेवा Prelims मध्ये अर्थव्यवस्था या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Syllabus मध्ये Mention केलेल्या घटकावरतीच ते प्रश्न विचारले जातात.


 थोडक्यात Economy मध्ये Predictability आहे. MPSC ने अर्थव्यवस्थेच्या Syllabus मध्ये 5 मुख्य घटक दिलेले आहेत.


1. लोकसंख्या

2.दारिद्र व बेरोजगारी

3. शाश्वत विकास

4. समावेशन

5. सामाजिक क्षेत्र सुधारणा

6.नियोजन व जमीनसुधारणा ( Syllbus मध्ये Mention नाही पण प्रश्न येतो.


यातील पहिल्या 3 घटकांची आपण आज सविस्तर चर्चा करू.


♦️1. Demography म्हणजेच लोकसंख्या -


या घटकवरती 1-2 प्रश्न हमखास विचारले जातात.


यामध्ये आपल्याला लोकसंख्येचा

 संख्यात्मक( लिंग गुणोत्तर, साक्षरता दर, घनता इ) आणि गुनात्मक( माता मृत्युंदर, बालक, शिशु मृत्यूदर इ). अनुषंगाने अभ्यास करावा लागतो.                 

  लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्था चांगल्या करून ठेवा.

भारतातील लोकसंख्या धोरणे उदा. 1976 आणि 2000 याचा उपघटकनुसार Detailed मध्ये Study करून घ्या.      

लोकसंख्या हा घटक तुम्हाला भूगोलामध्ये पण कमी येऊ शकतो so चांगला करून घ्या.


Source - देसले सर भाग 2 हा यासाठी सर्वोत्तम source राहील.

अगदी रट्टा मारून टाका😊. 

   

♦️2. दारिद्र्य व बेरोजगारी -

 किमान 2 प्रश्न या घटकावरती विचारले जातात. यामध्ये दारिद्र्य व बेरोजगारीचा अर्थ, प्रकार,महत्वाच्या व्याख्या, दारिद्र्य निर्मूलणासाठी नेमलेल्या समित्या आणि त्यानी केलेल्या शिफारशी चांगल्या करून ठेवा.

रंगराजन, तेंडुलकर, लकडवाला या तीन समित्या आयोगाच्या लाडक्या आहेत. त्या आपल्या पण लाडक्या व्हायला पाहिजेत मथीतार्थ त्या चांगल्या करा 😊.

त्यांनी सांगितलेली आकडेवारी त्यानुसार सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्राचे किती? या बाबी पण clear करून ठेवा.

दारिद्र्य व बेरोजगारी निर्मूलणासाठी सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यावरती आयोग हमखास प्रश्न विचारतो.

देसले सर भाग 2 मधून चांगल्या करून ठेवा.                      

 Multidimetional Poverty Index ( MPI) - MPI चे 3 आयाम, त्याचे 10 निर्देशक वव्यवस्थित करून घ्या. त्याच्या Vulnerable, Multidimetionally Poor, Severly Multidimetionally Poor याच्या Categorization वरती आयोग प्रश्न विचारत आहे. लक्षात ठेवा.

देसले सरांच्या पुस्तकात व्यवस्थित दिल आहे.


संदर्भग्रंथ - देसले सर भाग 1 आणि कोळंबे सर.    


♦️3. शाश्वत विकास -


1972 च्या Stockholm परिषदेपासून सुरु झालेला Sustainable Developement चा प्रवास अगदी पॅरिस करारापर्यंत येऊन थांबतो. 1987 चा Montreal प्रोटोकॉल  त्याच्या Provisions,1992 ची वसुंधरा परिषद त्यामधून बाहेर आलेले वेगवेगळे करार, त्यामधील बंधनकारक असलेले, नसलेले, त्यातील तरतुदी अभ्यासाव्यात, Kyoto Protocol चा सविस्तर अभ्यास करावा.

त्यानंतर येतो यामधील सर्वात IMP घटक MDG & SDG - 2000-2015 या कालावधीसाठी आपण MDG लागू केले होते. त्याची उत्पत्ती, त्याचे उद्दिष्टे, टार्गेट्स, Indicators इ. क्रमाने लक्षात ठेवावी लागतील. हेच SDG च्या बाबतीत देखील लागू होते. इथून मागे आयोगाने MDG आणि SDG वरती जास्त Deep मध्ये प्रश्न विचारले नाहीत इथून त्यातील प्रत्येक Target वरती Detailed मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. So 1-17 या क्रमाने SDG आणि प्रत्येक SDG मध्ये सांगितलेल्या Provisions पाठ करून टाका.


✳️ 1.समावेशन (Inclusion )-


यावरती किमान 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात.


समावेशन म्हणजे समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. ते वित्तीय, सामाजिक व प्रादेशिक या माध्यमातून करता येऊ शकते. Mpsc यावरती योजनाच्या Angle ने प्रश्न विचारते.

उदा. वित्तीय समावेशनाच्या योजना - प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी/ कर्मयोगी मानधन योजना Universal Basic Income इ. यामध्ये आयोग सामाजिक व प्रादेशिक समावेशनाच्या Angle ने जास्त प्रश्न विचारत नाही तरीही त्यासाठी कोणत्या समित्या नेमण्यात आल्या होत्या त्यांच्या शिफरसी, काही विशेष तरतूद उदा. Special Catrgory Status आपण बघून घ्यायला पाहिजेत.

 या सर्व योजना आणि इतर बाबी देसले सर भाग 2 मध्ये व्यवस्थित दिल्या आहेत.                           


✳️ 2. सामाजिक क्षेत्र सुधारणा ( Social Sector Initiative )-  

        

अर्थव्यवस्थेमधील जी सामाजिक क्षेत्रे आहेत. त्यावरती किमान 2 प्रश्न हमखास विचारले जातात.

यामध्ये शिक्षण, आरोग्य, बालक, महिला, वृद्ध, अपंग, backward classess इ. घटकांवरती प्रश्न विचारले जातात.

वरील घटकंसाठी सुरु करण्यात आलेल्या योजना, राबवण्यात येणारे उपक्रम, विविध घोरणे, वरील घटकंसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदी इ वरती आयोग प्रश्न विचारते. यावर्षी National Child Labour Project, राष्ट्रीय युवा धोरण यावरती प्रश्न विचारण्यात आला होता.

या Topic साठी तुम्ही आयोगाने MPSC mains पेपर 3 मधील HR-HRD  या घटकावरती आयोगाने योजनावरती जे प्रश्न विचारले आहेत ते 21000 book मधून एकदा बघून घ्या. त्यातील बरेच प्रश्न repeat होत आहेत. 


या Topic साठी देसले सर भाग 2 हेच पुस्तक read करायला हवं.


✳️ 3.नियोजन व जमीनसुधारणा -


थेट Syllabus मध्ये उल्लेख नाही पण आयोग हमखास प्रश्न विचारताना दिसत आहे. म्हणून आपल्याला पण याचा Compulsory अभ्यास करावा लागेल.यावरती  1-2 प्रश्न विचारले जातात.


पंचवार्षिक योजना कालावधी, वृद्धी दराची उद्दिष्टे, अपेक्षित व साध्य दर , प्रतिमान, विशेष भर कशावर होता, त्या योजनेमध्ये कोणते प्रकल्प, कोणत्या योजना सुरु झाल्या इ. चा बारकाईने अभ्यास करून ठेवा.देसले /कोळंबे सरांच्या पुस्तकात याचा Chart दिला आहे तो चांगला करा.               

नियोजनासाठी भारतात अस्तित्वात असलेल्या Institutions उदा. नियोजन आयोग, NITI आयोग याचा Chart स्वरूपात Study करून ठेवा.    


 जमीनसुधारणा या घटकवरती सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो त्यासाठी कोळंबे सरांच्या HR- HRD पुस्तकातील ग्रामीण विकास घटकातील जमीन सुधारणा हा Topic करा. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. इथून पाठीमागील सर्व प्रश्न cover होतात. यावरती आलेले Pyq पण बघून घ्या. फायदा होईल.


2020 च्या Prelims मध्ये राष्ट्रीय उत्पन्न या घटकावर Gdp/Gnp च्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न घटक पण read करावा लागेल. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये तो चांगला दिला आहे.

       

♦️नोट -


 Economy मध्ये 2-3 प्रश्न हे Out of box असतात.(उदा. Missing Women,Usa - India डॉलर मॅचिंग अनुदान प्रकल्प इ.)त्यामध्ये जास्त काही करता येत नाही आपले Logic आणि Out of box Study यावरतीच आपल्याला ते Tackle करावे लागतात. जेवढं आपल्या हातात आहे. त्यावरती 100% Command मिळवण्याचा प्रयत्न करा. मग Marks नक्कीच भेटतील.             


समाप्त..

No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...