चालु घडामोडी वन लाईनर्स , ‌१० मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
‌१० मे २०१९ .
● भारताने इराणकडून तेलाची आयात पूर्णपणे थांबवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
● मुंबईच्या वरिष्ठ आणि २३-वर्षांखालील निवड समितीचे अध्यक्षपद मिलिंद रेगे यांच्याकडे सोपवण्यात आले
● स्पेनचा प्रमुख टेनिसपटू डेव्हिड फेररने
निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली
● भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षक म्हणून शबनम शेख हिची नियुक्ती करण्यात आली
● अमेरिका-चीनमधील द्विपक्षी व्यापार २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे
● अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार बरखास्त करण्यात आले
● चेतन पाठारे यांची जागतिक शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टस् महासंघाच्या (डब्ल्यूबीपीएफ) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली
● क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक होणार भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक
● महाराष्ट्राचे मुख्य सचिव यूपीएस मदन यांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली
● महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून अजय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली
● विक्रम राठौर यांची इंडिया 'ए' टीमचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली
● डेल टेक्नोलॉजीज मध्ये आलोक ओहरी यांना भारताचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले
● उडीसा कृषी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उपकुलगुरु पदी पवन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली
● गेट्स फाउंडेशनने भारतातील निदेशक म्हणून हरि मेनन यांची नियुक्ती केली
● रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ने ब्रिटिश टॉय मेकर कंपनी " हॅमलेज " ६२० कोटी रुपयांना विकत घेतली
● रबींद्र भारती विद्यापीठ कोलकाता ने लेखक संजय चट्टोपाध्याय यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले
● रबींद्र भारती विद्यापीठ कोलकाता ने शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंह यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले
● रबींद्र भारती विद्यापीठ कोलकाता ने तबला वादक स्पप्न चौधरी यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले
● फुटवेअर ब्रँड वॉकरू ने आमिर खान यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली
● फ्रेंच अॅक्सेसरी ब्रँड " सेरिझ " ने सारा अली खान ला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले
● डॅनियल वेलिंग्टन कंपनीने आयुषमान खुराना यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली
● प्रख्यात चित्रपट टीव्ही अभिनेते मृणाल मुखर्जी यांचे निधन झाले
● भारत - चीन ने भारतीय मिरचीच्या निर्यातीसाठी करार केला
● ऑस्ट्रेलियन फ्लाईट कॅरियर " क्वांटास " ने जगातील पहिल्या झीरो-वेस्ट फ्लाइटचे संचालन केले
● २००८ पासुन ५ ते २९ वयोगटातील दरवर्षी १.३५ दशलक्ष लोक रस्ते अपघातांमुळे मृत्युमुखी पडले : जागतिक आरोग्य संघटना
● २००८ पासून रस्ते अपघातांमुळे सुमारे ५० दशलक्ष लोक जखमी झाले आहेत : जागतिक आरोग्य संघटना
● मायक्रोसॉफ्ट कंपनीने सुरक्षित मतदानासाठी " इलेक्शनगॉर्ड " सॉफ्टवेअरची निर्मिती केली
● छत्तीसगड प्रथम अँटी-नक्षल महिला कमांडो युनिट तैनात करण्यात आले
● रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाने छापलेल्या ५० डॉलर्सच्या ४.६ कोटी नोटांवर Responsibility शब्‍दाच्या स्पेलिंगमध्ये चुक झाली आहे
● प्रिन्स मन्सूर बिन नासर बिन अब्दुल अझीझ यांची स्वित्झर्लंडमध्ये सौदी अरेबिया चे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली .

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...