Saturday 11 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स ,११ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
११ मे २०१९ .
● ११ मे : जागतिक प्रवासी पक्षी दिवस
● जागतिक प्रवासी पक्षी दिवस २०१९ संकल्पना : " Protect Birds : Be The Solution To Plastic Pollution "
● ११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
● के एस राधाकृष्णन यांना कॉमनवेल्थ सचिवालयचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले
● भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ' अपाची ' हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले
● चेन्नईने दिल्लीच्या संघावर ६ गडी राखून मात केली आणि आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली
● मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स ह्या दोन संघा दरम्यान १२ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल
● तब्बल ८ वेळा आयपीएल ची अंतिम फेरीत गाठण्याचा पराक्रम चेन्नई सुपर किंग्स ने केला आहे
● आयपीएलमध्ये १५० बळी घेणारा हरभजन सिंह तिसरा भारतीय गोलंदाज बनला
● अरुणाचल प्रदेशमध्ये सर्पाची एक नवीन प्रजाती " पिट वाइपर " आढळली
● उद्या (१२ मे रोजी) सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे
● भारत , अमेरिका , जपान व फिलीपाईन्स ने संयुक्त युध्द सराव " Group SAIL " दक्षिण चीन समुद्रात केला
● सिंगापूर सरकारनं ' फेक न्यूज विरोधी कायदा ' मंजूर केला आहे
● मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली
● ज्येष्ठ अभिनेते अरुण बक्षी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
● दिग्गज कलावंत घडविणारे अभिनयाचे गुरु रोशन तनेजा यांचे निधन
● संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष म्हणून तिजानी मोहम्मद बांडे यांची नियुक्ती करण्यात आली
● संयुक्त राष्ट्र महासभेने लिस्बनमध्ये महासागर परिषद आयोजित करण्याचा निर्णय घेतला
● कर्नाटक बँकेने चिफ ऑपरेशन ऑफिसर (सीओओ) म्हणून बालचंद्र वाई व्ही यांची नियुक्ती केली
● कर्नाटक बँकेने चिफ बिजनेस ऑफिसर (सीबीओ) म्हणून गोकुलदास पाई यांची नियुक्ती केली
● कतार एअरवेजला जगातील सर्वोत्तम विमान कंपनी घोषित करण्यात आले आहे : एअर हेल्प सर्वेक्षण
● हमद आंतरराष्ट्रीय विमानतळ , कतार ला जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले : एअर हेल्प सर्वेक्षण
● राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ , हैदराबाद ला जगातील सर्वोत्तम आठव्या क्रमांकाचे विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले : एअर हेल्प सर्वेक्षण
● बलविंदर सिंह यांची भारतीय शेतकरी उर्वरक सहकारी लिमिटेड ( इफ्को ) च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली
● दिलीप संघानी यांची भारतीय शेतकरी उर्वरक सहकारी लिमिटेड ( इफ्को ) च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
● तमिळ उपन्यासकार थोपिल मोहम्मद मीरन यांचे निधन
● अभिनेता पंकज कपूर लवकरच आपला पहिला उपन्यास ' दोपहरी ' प्रकाशित करणार आहेत
● लोकप्रिय क्रीडा प्रशासक नीलकंटा राव जगदाळे यांचे निधन
● 400 कि.मी. वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या बुलेट ट्रेनची जपान ने चाचणी केली
● हवामान आणीबाणी घोषित करणारा आयर्लंड जगात दुसरा देश बनला ( पहिला : ब्रिटन )
● आयपीएलमध्ये १०० विजयांची नोंद करणारा " चेन्नई सुपर किंग्स " हा दुसरा संघ ठरला ( पहिला संघ : मुंबई इंडियन्स )
● विकसनशील देशांची डब्ल्यूटीओ मंत्रिस्तरीय बैठक नवी दिल्लीत होणार
● वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्ससाठी ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून दलेर मेहंदी यांना नामांकन मिळाले
● अभिनेत्री शिल्पा शेट्टीने फिटनेस अॅप " द शिल्पा शेट्टी " लाॅच केले
● कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड ने प्रवाशांच्या सोयीसाठी " Cochin Airport " अॅप लाॅच केले
● २०१९ वर्षाच्या अखेरपर्यंत महाराष्ट्र ७७ लाख एलईडी दिवे वितरीत करणार आहे
● संयुक्त राष्ट्रसंघाने अभिनेत्री दीया मिर्झा ची निरंतर विकास लक्ष्य (एसडीजी) साठी नवीन अधिवक्ता म्हणून नियुक्ती केली

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...