Saturday 30 October 2021

भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी.

🎇 भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी. 🎇

🌸 भारतात पहिल्यांदा 1951मध्ये निवडणूक घेतली गेली. यामध्ये 45.7 टक्के मतदान झालं होतं.

🌸1966मध्ये रेटीया फरिया पॉवेलने ही मिस वर्ल्ड किताब मिळवणारी पहिली आशियाई महिला ठरली.

🌸1974मध्ये भारताने पोखरण चाचणी करुन आण्विक शस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या यादीत जागा मिळवली.

🌸आर्यभट्ट हा पहिला सॅटेलाइट भारताने १९७५ मध्ये अवकाशात सोडला.

🌸1983 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.

🌸राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. त्यांनी हे 1984 मध्ये केले होते.

🌸1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारत टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतले.

🌸 2005 भारताने माहिती अधिकार अमलात आणला. हा अधिकार जगातील मोजक्याच देशांमध्ये आहे.

🌸 पहिल्यांदाच प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या होत्या.

🌸 टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरत, क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला.

🌸 अभिनव बिंद्रा याने 2008 बिजिंग ऑलंम्पिकमध्ये १०एम एअर रायफल स्पर्धेत वैयक्तीत सुवर्ण पदक जिंकले. हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे.

🌸 संगीतकार ए.आर.रहमान याला 2009 मध्ये 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

🌸2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले.

🌸अग्नि-5 क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता 2012 मध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.

🌸मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून 2013 रोजी प्रक्षेपित केले गेले.

🌸कैलाश सत्यार्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.

🌸देशातील व्यवस्थेला हादरा देण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तरूणाई अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ 2011 ला उपोषणात सहभागी झाली.

🌸2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता. यानंतर 2019मध्ये इस्रोचे चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं...

🌸 तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे...

🌸 जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविण्यात आलं. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख यांची केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...