Saturday 21 September 2019

निवडणुकांच बिगुल वाजलं, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार

महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासून महाराष्च्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती.

▪️कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम ?

1)  निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर

2)  उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर

3)  अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर

4)  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर

5)  मतदान – २१ ऑक्टोबर

6)  मतमोजणी – २४ ऑक्टोबर

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...