Saturday 21 September 2019

मिराबाईचा राष्ट्रीय विक्रम; ब्राँझपदक मात्र हुकले

◾️माजी जगज्जेती मिराबाई चानू हिने गुरुवारी जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या ४९ किलो वजनी गटात आपला राष्ट्रीय विक्रम मोडून काढला खरा

◾️ पण ही कामगिरी तिला पदक मिळवून देण्यासाठी पुरेशी पडली नाही.

◾️२५ वर्षांच्या मिराबाईला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीनपैकी दोन प्रयत्नांत मिराबाईने आपल्या कामगिरीतील सर्वोत्तम वजन उचलले.

◾️स्नॅचमध्ये मिराबाईने ८७ किलो तसेच क्लीन अँड जर्कमध्ये ११४ किलो वजन उचलले.

◾️असे एकूण २०१ किलो वजन मिराबाईने उचलले. मिराबाईचा याआधीचा राष्ट्रीय विक्रम आहे तो १९९ (८८ किलो+१११ किलो) किलोचा आहे.

◾️ ही कामगिरी तिने यंदा एप्रिलमध्ये पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत केली होती.

◾️चीनच्या जियांग हुइहुआने नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तिने २१२ किलो वजन (९४+११८) उचलले.

◾️याआधीचा विश्वविक्रम चीनच्या होऊ झिहुईचा (२१०) आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...