Friday 13 September 2019

अरुणाचल प्रदेश : चीन सीमेवर प्रथमच भारतीय लष्कर करणार मोठा युद्धाअभ्यास



🔺 पाच हजार जवानांसह वायुसेनेचाही असणार सहभाग

◾️भारतीय लष्कराकडून वायुसेनेबरोबर चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यात मोठा युद्धाअभ्यास केला जाणार आहे. भारतीय सेनेच्या एकमेव ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’चे पाच हजार जवान अरूणाचल प्रदेशात होणाऱ्या या मोठ्याप्रमाणावरील युद्धाअभ्यासात सहभागी होणार आहेत. चीनच्या सीमेवर भारतीय सेनेचा हा पहिलाच युद्धाअभ्यास असणार आहे. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जवानांना तैनात केले जाणार आहे.

यासाठी नवनिर्मित ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ कडून पाच ते सहा महिन्यांपासून ईस्टर्न कमांड अंतर्गत तयारी केली जात आहे. सेनेच्या सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार युद्धाअभ्यासात तेजपूरमधील 4 कोर तुकड्यांना सेनेच्या रक्षणासाठी एका अतिउच्च ठिकाणी तैनात केले जाणार आहे. यामध्ये ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या अडीच हजारपेक्षा जास्त जवानांना वायुसेना युद्धाअभ्यासासाठी एअरलिफ्ट करणार आहे. या युद्धाअभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान, 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ला करणार आहेत.

ANI Digital


Indian Army troops along with Air Force will carry out a massive war game in Arunachal Pradesh in October where Forces will be deployed to practice real war-like situation on Eastern Front

१०:४२ म.पू. - ११ सप्टें, २०१९

या युद्धाअभ्यासासाठी वायुसेना पश्चिम बंगालमधील बगदोगरा येथून सैनिकांना एअरलिफ्ट करणार आहे. यासाठी वायुसेना सी-17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हरक्युलिस आणि एएन-32 या विमानांचा वापर करणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी सैन्य तैनात करता येणार आहे.

याशिवाय या युद्धाअभ्यासात ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या हॉवित्झर तोफांबरोबर रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ तुकड्यांचा शस्त्रसज्जतेसह समावेश असणार आहे. या युद्धाअभ्यासाचे आयोजन चीन बरोबर पर्वतीय क्षेत्रात युद्धासाठी ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ ला अधिक सक्षम बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...