Friday 13 September 2019

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत पुन्हा ‘सम-विषम

📌नवी दिल्ली प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी शुक्रवारी विविध उपाययोजनांची घोषणा केली.

📌 त्यात प्रामुख्याने खासगी वाहनांसाठी योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌 येत्या ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांवर निर्बंध आणणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

📌सम-विषम योजनेनुसार, ज्या वाहनांचा नोंदणी क्रमांक सम आहे ती वाहने केवळ सम तारखेलाच, तर ज्या वाहनांची नोंदणी क्रमांक विषम आहे ती वाहने केवळ विषम तारखेलाच रस्त्यावर चालवता येऊ शकतील.

📌 विषम क्रमांकांच्या गाड्या ५, ७, ११, १३, आणि १५ तारखेला रस्त्यांवर धावू शकतील, तर सम क्रमांकांच्या गाड्या ४, ६, ८, १२ आणि १४ तारखेला रस्त्यांवर धावू शकणार आहेत.

📌 या योजनेची विस्तृत माहिती नागरिकांना लवकरच सांगितली जाईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.

📌याआधी सन २०१६ मध्ये जानेवारी आणि एप्रिल महिन्यात केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये सम-विषम योजनेची अंमलबजावणी केली होती.

📌नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना तेव्हा प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

📌शिवाय दुचाकी आणि महिला वाहनचालकांना या नियमातून सूट देण्यात आली होती. दिल्लीमधील प्रदूषणाची पातळी ११ महिने कमी असते, मात्र नोव्हेंबरमध्ये ती कमालीची वाढते.

📌कारण या महिन्यात शेजारच्या पंजाब, हरयाणा या राज्यांमध्ये पिकांची कापणी केल्यानंतर उरलेले भुसकट मोठ्या प्रमाणात जाळले जाते.

📌त्यामुळे दिल्लीच्या आकाशात अक्षरश: धुराचे ढग दाटून येतात. या प्रदूषणामुळे दिल्ली शहर गॅस चेंबर बनते, असे केजरीवाल यांनी सांगितले.

📌केंद्र सरकार तसेच पंजाब आणि हरयाणा राज्य सरकारे भुसकट जाळण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना दिल्ली सरकार शक्य ती सर्व मदत करेल, असेही केजरीवाल म्हणाले. 

📌सात कलमी कृती कार्यक्रम प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शुक्रवारी सम-विषम योजनेसह सात कलमी कृती कार्यक्रमाची घोषणा केली. त्यामध्ये प्रदूषणरोधक मास्कचे मोठ्या प्रमाणात वाटप करणे, रस्ते झाडण्यासह रस्त्यांवर पाणी शिंपडणे, वृक्ष लागवड आणि शहरातील प्रदूषणयुक्त प्रमुख १२ ठिकाणी विशेष योजना राबवणे या उपाययोजनांचा समावेश आहे.

📌या व्यतिरिक्त दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर करू नये, असे आवाहन नागरिकांना करताना केजरीवाल म्हणाले की, दिवाळीच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे लेझर शोचे आयोजन केले जाईल.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...