Thursday 19 September 2019

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : जागतिक स्पर्धेतून हिमा दासची माघार

▪️जागतिक कनिष्ठ विजेत्या हिमा दासने पाठीच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.‘‘दोहा येथे होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतून हिमाला पाठीच्या दुखापतीमुळे दुर्दैवी माघार घ्यावी लागत आहे,’’ अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी दिली. २७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत हिमाचा ४ बाय ४०० मीटर महिला आणि ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघात समावेश करण्यात आला होता.
▪️जिस्ना मॅथ्यू, एमआर पूवम्मा, रेवती वीरमणी, शुभा व्यंकटेशन, व्ही. के. विस्मया आणि राजराज विथया यांचा महिलांच्या रिले संघात समावेश आहे. याचप्रमाणे मिश्र संघात जिस्ना, पूवम्मा, विस्मया, जेकॉब अमोज, मोहम्मद अनास आणि नोआह तोम निर्मल यांचा समावेश आहे. धावपटू द्युती चंदला १०० मीटर शर्यतीसाठी नंतर भारतीय संघात स्थान देण्यात आले.
दोहा येथे एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील ४०० मीटर शर्यतीतून हिमाला अर्धवट माघार घ्यावी लागली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...