Thursday 26 September 2019

आशियाई वयोगट जलतरण स्पर्धा : भारताच्या संघाला रीलेमध्ये सुवर्ण

👉आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी ४ बाय १०० मीटर पुरुषांच्या फ्रीस्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले.भारतीय संघाने ३:२३.७२ सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणाऱ्या इराणच्या संघाने ३:२८.४६ सेकंद अशी वेळ नोंदवली, तर तिसऱ्या स्थानावरील उझबेकिस्तानच्या संघाने ३:३०.५९ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली.

👉महिलांच्या ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रुजूता खाडे (५९.८३ सेकंद), दिव्या सतिजा (१:०१.६१ सेकंद), शिवानी कटारिया (५९.५७ सेकंद) आणि माना पटेल (५९.७५ सेकंद) यांचा भारतीय संघात समावेश होता.

👉गट-दोन मुलांच्यांमध्येसुद्धा भारतीय संघाला ४ बाय १०० मीटर रीले प्रकारात रौप्यपदक मिळले. वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लष्कर आणि शोआन गांगुली यांचा समावेश असलेल्या संघाने ३:४१.४९ सेकंद अशी वेळ नोंदवली.

🌹🌳🌴कुशाग्रला दुहेरी सुवर्ण🌴🌳🌹

👉भारताच्या कुशाग्र रावतने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

👉पुरुषांच्या २०० मीटर प्रकारात रावतने १:५२.३० सेकंदांनिशी सुवर्णपदक जिंकले, तर आनंद अनिलकुमारने १:५२.१९ सेकंदांसह कांस्यपदक पटकावले. सिरियाच्या अब्बास ओमरला कांस्यपदक मिळाले.

👉आणि नंतर  ८०० मीटर स्पर्धेत कुशाग्रने ८:१०.०५ सेकंदांसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...