Thursday 26 September 2019

मतदानाबाबत जनजागृतीसाठी माधुरी दीक्षित सदिच्छादूत

👉विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी ‘चला मतदान करू या’ असे आवाहन करीत अभिनेत्री माधुरी दीक्षित, महाराष्ट्र भूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवत जनजागृतीच्या प्रचारात उतरले आहेत.

👉लोकसभा निवडणुकीत अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील मतदानाची टक्केवारी कमी होती. त्याचप्रमाणे सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही राज्यात ६०.३२ टक्के मतदान झाले होते, तर लोकसभा निवडणुकीत ६०.७९ मतदान झाले होते.

👉या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने राज्यभर मतदारजागृती उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

👉राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड,  उषा जाधव, क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कारविजेती धावपटू ललिता बाबर, जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्यां गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा यामध्ये समावेश आहे. चित्रफितीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात जागरूक मतदारांच्या भूमिकेचे महत्त्व हे सदिच्छादूत समजावून सांगणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...