Wednesday 25 September 2019

बंगाल संघटनेच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली निश्चित

👉सर्वोच्च पदासाठी एकही प्रतिस्पर्धी नाही, अध्यक्षपदाचा कालावधी मात्र फक्त जुलै 2020 पर्यंतच माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा बिनविरोध निवडला जाईल, हे शनिवारी निश्चित झाले. संघटनेच्या निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी गांगुलीच्या पाच सदस्यीय पॅनेलविरुद्ध एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे, त्याची फेरनिवड निश्चित मानली जाते.

👉बंगाल क्रिकेट संघटनेची 85 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 28 सप्टेंबर रोजी होत आहे. त्यावेळी या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. अर्थात, गांगुलीची नव्या अध्यक्षपदाची मुदत मात्र जुलै 2020 पर्यंतच असणार आहे.

👉जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर 2015 मध्ये गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला. त्यापूर्वी 2014 मध्ये तो संयुक्त सचिवपदी कार्यरत होता. यामुळे जुलै 2020 मध्ये कोणत्याही पदावर कार्यरत राहण्याची त्याची 6 वर्षांची कारकीर्द पूर्ण होईल आणि याचमुळे जुलैपर्यंतच त्याला अध्यक्षपदी कार्यरत राहता येणार आहे.

👉एप्रिलनंतर पुन्हा संभ्रम

👉सध्याच्या घडीला अधिकृत नेंदीनुसार, गांगुली अन्य कोणत्याही पदावर कार्यरत नाही. दिल्ली कॅपिटल्सचा तो प्रवर्तक म्हणून कार्यरत होता. पण, यंदाच्या आयपीएलनंतर त्याने या पदाचा राजीनामा दिला. अर्थात, पुढील आवृत्तीत त्याला दिल्ली कॅपिटल्समधील कार्यभार नव्याने स्वीकारता येऊ शकेल. असे केल्यास तो एप्रिलपासून बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी कायम राहू शकेल का, हे मात्र पहावे लागेल.

👉दालमियांचे चिरंजीव अभिषेक नव्या निवडीनुसार संयुक्त सचिवऐवजी सचिव असतील तर टाऊन क्लबचे देब्राता दास संयुक्त सचिव असणार आहेत. बंगाल क्रिकेट संघटनेसाठी यापूर्वी पाच उपाध्यक्ष असायचे. पण, आता केवळ एकच उपाध्यक्ष असणार आहे. अनुभवी प्रशासक नरेश ओझा हे आता उपाध्यक्षपदी विराजमान होतील. देबाशिष गांगुली खजिनदारपदी रुजू होतील.

👉तर अध्यक्षपदी अभिषेक दालमिया

👉जुलै पेक्षा पूर्वी गांगुलीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर अभिषेक दालमिया अध्यक्षपदाची सूत्रे घेतील, असे संकेत आहेत. अभिषेक दालमियांनी युवा प्रशासक या नात्याने आपल्या कामगिरीची मोहोर यापूर्वीच उमटवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य संघटनांच्या निवडणुकीवरील बंधने शुक्रवारी शिथिल केली. त्यानंतर विविध संघटनांच्या कार्यकारिणी निवडीला वेग येणे अपेक्षित आहे.

👉काही दिवसांपूर्वी प्रशासक समितीने कूलिंग ऑफ पिरेड कसे मोजले जाईल, याचा तपशील जाहीर केला होता. त्यानंतर गांगुलीच्या पात्रतेविषयी संभ्रम निर्माण झाला होता. कारण, अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी 2014 मध्ये त्याने तीन वर्षांसाठी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम पाहिले होते. बंगाल क्रिकेट संघटनेची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा जगमोहन दालमिया यांच्या पर्वात 2015 मध्ये झाली आणि दालमिया त्यावेळी सलग आठव्यांदा बिनविरोध निवडले गेले होते. 2016 मध्ये लोढा समितीच्या अहवालानुसार बंगाल क्रिकेट संघटनेने वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द केली होती.

👉बंगाल क्रिकेट संघटना पॅनेल

👉अध्यक्ष : सौरभ गांगुली, उपाध्यक्ष : नरेश ओझा, सचिव : अभिषेक दालमिया, संयुक्त सचिव : देब्राब्रता दास, खजिनदार : देबाशिष गांगुली.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...