Wednesday 25 September 2019

डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू


◾️ अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी महाभियोग सुरू करण्याची घोषणा केली.

◾️डेमोक्रॅट्स म्हणजेच ट्रंप यांच्या प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार जो बिडेन आणि त्यांचा मुलगा हंटर यांच्याविरुद्धच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू करावी यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यावर आहे.

◾️ट्रंप यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. मात्र या प्रतिस्पर्ध्यांसंदर्भात युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केल्याचं ट्रंप यांनी मान्य केलं आहे

◾️ट्रंप यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी किमान 20 रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

◾️ दुसऱ्या शब्दांत ट्रंप यांच्याच पक्षाच्या 20 खासदारांना पक्षाविरोधात तसंच राष्ट्राध्यक्षांविरोधात बंडखोरी करावी लागेल.

◾️आतापर्यंत अमेरिकेच्या कोणत्याही राष्ट्राध्यक्षांना महाभियोग चालवून पदावरून हटवण्यात आलेलं नाही.

◾️अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, डेमोक्रॅट्स पक्षाच्या 235 खासदारांपैकी 145 महाभियोगाच्या बाजूने आहेत.

◾️महाभियोग प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात कनिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली तरी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असलेल्या सभागृहात पारित होणं अवघड आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

वनस्पतींचे वर्गीकरण

##  मुख्य प्रकार दोन  : अ) अबीजपत्री (Cryptogamae) ब)  बीजपत्री  ( Phanerogame) --------------=========--------------- अ) अबीजपत्री (Cr...