03 October 2019

इम्फाळ येथील राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या संदर्भात क्रिडा मंत्रालयाचा NBCC सोबत सल्लागार करार

✍NBCC (इंडिया) लिमिटेड या संस्थेनी केंद्रीय युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाच्या क्रिडा विभागासोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्याच्या अंतर्गत मणीपूर राज्याच्या इम्फाळ या शहरात ‘राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठ’ याच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापनाच्या बाबतीत सल्लागार सेवा प्रदान केली जाणार आहे.

✍या विद्यापीठामुळे क्रिडा क्षेत्रातले शास्त्र, चिकित्सा, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण अश्या विविध विषयांच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळणार. हे एक राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणून देखील काम करेल. प्रकल्पाची अंदाजे किंमत 400 कोटी रुपये असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   🌸NBCC (इंडिया) बाबत🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍NBCC (इंडिया) लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीचा सार्वजनिक क्षेत्रातला नवरत्न उपक्रम आहे. त्याचे कार्य संपूर्ण भारतात आणि परदेशात देखील पसरलेले आहे. त्याची स्थापना 1960 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था अभियांत्रिकी खरेदी व बांधकाम क्षेत्रात आपली सल्लागार सेवा प्रदान करते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

महत्त्वाचे ऑपरेशन 2025

1. 'ऑपरेशन नादेर' :- भारतीय लष्कर जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी - 2. ऑपरेशन टू प्रॉमिस ३:- इराण इस्राईल देश...