Thursday 28 November 2019

कार्टोसॅट-3 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

पीएसएलव्ही सी 47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने 'कार्टोसॅट-3' या 1625 किलो वजनाच्या उपग्रहाचे इस्त्रोने यशस्वी प्रक्षेपण केले.
- आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं
- 'कार्टोसॅट-3' उपग्रहासह अमेरिकेतील 13 व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. 13 लघु उपग्रहांमध्ये 'फ्लोक-4 पी' हे 12 लघु उपग्रह असून, एक 'एमईएसएचबीईडी' हा लघु उपग्रह आहे.
-  'कार्टोसॅट-3' उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे.
----------------------------------------
● उपयोग

- कार्टोसॅट-3 भारताचा डोळा असल्याचं सांगितलं जात आहे.
- पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी 'कार्टोसॅट-3' उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
- या उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे.
- या उपग्रहाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.
------------------------------------------
● Polar Satellite Lunch Vehicle C47 [PSLV C47]

- या प्रक्षेपकाचे हे 21 वे उड्डाण आहे.
- पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात इंधनाचे सहा टप्पे.
- श्रीहरिकोटा येथून होणारे हे 74 वे उड्डाण आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...