Saturday 2 November 2019

आता आलं १२५ रूपयांचं नाणं,अर्थमंत्र्यांनी केलं लोकार्पण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजधानी दिल्लीमध्ये १२५ रूपयांचे नाण्याचे लोकार्पण केलं.

प्रसिद्ध योगी आणि सेल्फ-रियलायजेशन फॅलोशिपचे संस्थापक परमहंस योगानंद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून १२५ रूपये मुल्याचे विशेष नाणे जारी करण्यात आले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीमध्ये १२५ रूपयांचे नाण्याचे लोकार्पण केलं. यावेळी अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.

१२५ रूपयाच्या विशेष नाण्याच्या समोरील बाजूला अशोकचक्र हे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे. हिंदीमध्ये भारत तर इंग्रजीमध्ये इंडिया सह १२५ रूपये छापलं आहे.

या नाण्याचं वजन ३५ ग्रॅम आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला परमहंस योगानंद यांचे छायाचित्र छापले आहे. त्यासोबतच हिंदी आणि इंग्रजीमध्ये ‘परमहंस योगानंद यांची १२५ वी जयंती’ आणि त्यांच्या जन्म-मृत्यूचं वर्ष नमूद करण्यात आलं आहे.

३५ ग्रॅमचं हे विशेष नाणं तयार करण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, पाच टक्के निकेल आणि पाच टक्के जस्तचा वापर केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन नाण्याचं लोकार्पण करताना म्हणाल्या की, ‘परमहंस योगानंद यांनी जगभरात भारताची मान उंचावली. त्यांनी जगभरातील लोकांना मानवतेविषयी जागृत करण्याचं काम केलं. जगभरातील लोकांना एकतेविषयी संदेश दिला.

No comments:

Post a Comment

Latest post

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त

➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना 🔖छेत्रीचा जलवा  :- 💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय स...