Monday 22 November 2021

मराठी व्याकरण : अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

1. विधानार्थी वाक्य : ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

2. प्रश्नार्थी वाक्य : ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

3. उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

4. होकारार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

5. नकारार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

6. स्वार्थी वाक्य : जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

7. आज्ञार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

8. विध्यर्थी वाक्य : जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.

9. संकेतार्थी वाक्य : जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...