Saturday 16 November 2019

दाल तलाव ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ घोषित केला जाणार

जम्मू व काश्मीर सरकारने श्रीनगरचे प्रसिद्ध दाल तलाव आणि त्याच्याजवळच्या आसपासच्या भागांना इको सेन्सिटिव्ह झोन (ESZ) म्हणून घोषित करण्यासाठी दहा सदस्यांची समिती गठीत केली आहे.

🅱दाल तलाव "लेक ऑफ फ्लॉवर्स", "ज्वेल इन द क्राऊन ऑफ कश्मीर" किंवा "श्रीनगर्स ज्वेल" या नावानेही ओळखले जाते. यात झेलम नदीचे पाणी साठते.

🅱2017 साली केलेल्या अभ्यासानुसार, प्रदूषण आणि अतिक्रमणांमुळे दाल तलाव त्याच्या मूळ क्षेत्रफळापासून म्हणजेच 22 चौरस किलोमीटर क्षेत्रापासून सुमारे 10 चौरस किलोमीटरपर्यंत कमी झाले आहे.

🅱तलावाची क्षमता सुमारे 40 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. तलावाच्या आरोग्यास धोका तयार झाल्याने तिथले पर्यावरण दूषित झाले आहे. हे स्थळ पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. तिथे 800 ते 900 हाऊसबोटी देखील आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...