Saturday 16 November 2019

बाळाची गर्भावस्था व पोषण


◾मानव 'मॅमल' या गटात मोडतात. म्हणजेच सस्तन प्राणिमात्र असल्याने एकपेशीय.सुरुवातीपासून जन्म होईपर्यंत आईच्या पोटात त्यांची पूर्ण वाढ होते जाते.

◾माणसाची गर्भावस्था ही अडतीस आठवड्यांची असते. हाच काळ छत्तीस ते चाळीस आठवडे येथपर्यंत मागे पुढे होऊ शकतो. या काळातील अवस्थेलाच 'गर्भावस्था' म्हणतात व आईच्या गर्भाशयात ही सर्व वाढ होते.

◾गर्भाशयाला आतील बाजूने तळहाताएवढय़ा पसरट भागात जोडलेल्या अस्तराला 'प्लासेंटा' असे म्हणतात.

◾याचे दुसरे टोक गर्भाच्या नाभीतून गर्भाला पोषणद्रव्ये रक्ताद्वारे पूरवत असते. पुरवठा करणाऱ्या रक्तनलिकांच्या या समुच्चयास 'नाळ' असे म्हणतात. बाळाची नाळ आईच्या गर्भाशयाशी आतील बाजूस जोडलेली असल्याने आईच्या रक्तातील पोषणद्रव्ये जशीच्या तशी बाळाला मिळत राहतात.

◾दहाव्या आठवडय़ाच्या सुमारास बाळाचे अवयव स्पष्ट होऊ लागतात,

t.me/nirmitiacademypune

◾बाविसाव्या आठवड्यात त्याच्या हृदयाच्या स्पंदनांचे ठोकेही ऐकू येऊ शकतात, तर बत्तीसाव्या आठवड्यात बाळ गर्भाशयात पूर्णपणे स्थिर स्थिती घेऊ शकते .

◾या सर्व गोष्टी हल्ली अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे नीट दिसूही शकतात.

◾ गर्भावस्थेतील काही दोष असल्यास वरील तपासण्यांचा हल्ली उपयोग केला जातो.

◾त्यावरून बाळाची वाढ, आकारमान यांचा नक्की पत्ता लागू शकतो.

◾पूर्ण वाढ झाल्यावर अडतिसाव्या आठवड्यात एके दिवशी गर्भाशयाचे आकुंचन सुरू होते व गर्भावस्थेतील बाळ योनीमार्गे आईच्या पोटातून जगात जन्म घेते.

◾बाळाचा जन्म झाल्यावर लगेच त्याची नाळ बांधून कापून टाकतात. याच जागी बाळाची बेंबी व नाभी काही दिवसांनी तयार होते.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...