Sunday 24 November 2019

अश्वारोहणमध्ये फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र

🔰आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र  होण्याचा मान मिळवला आहे.

🔰27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे.
आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी, 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल.

🔰याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. जे. लांबा (1996, अटलांटा) यांनी ऑलिम्पिक अश्वारोहमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
ऑगस्ट महिन्यात अर्जुन पुरस्कार पटकावणाऱ्या फवादने सहा पात्रता प्रकारांमध्ये एकूण 64 गुण कमावले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी सराव प्रश्न    24 मे 2024

प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धाव...