Monday 25 November 2019

लेफ्टनंट शिवांगी: भारतीय नौदलातली पहिली महिला वैमानिक


- 4 डिसेंबर या नौदल दिनाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक 2 डिसेंबर 2019 रोजी लेफ्टनंट शिवांगी भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार आहेत. त्यासोबतच, त्या भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू होणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ठरणार.

- शिवांगी या मुळच्या बिहारमधील मुझफ्फरपूरच्या आहेत. भारतीय नौदलाकडून घेण्यात आलेल्या 27 NOC अभ्यासक्रमामध्ये त्यांनी एझिमाला इथल्या नौदल अकादमीत प्रशिक्षण घेतले. ज्यानंतर 2018 साली जून महिन्यात वाईस अॅडमिरल ए. के. चावला यांच्याकडून त्यांना नौदलात सामावून घेण्यात आले.

- सध्या भारतीय नौदलाच्या साऊथर्न नेव्हल कमांड येथे प्रशिक्षणार्थी म्हणून शिवांगी कार्यरत आहेत. त्यांना 2 डिसेंबर 2019 रोजी सागरीक्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘डॉर्नियर’ विमानाच्या उड्डाणाची अधिकृत परवानगी मिळणार.

- भारतीय नौदलातल्या एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) विभागात अधिकाऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश असतो. 'ऑब्जर्व्हर' म्हणून रुजू असणाऱ्या या महिला अधिकारी या काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी जबाबदार असतात.

▪️भारतीय नौदलाविषयी

- भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलाची सागरी शाखा आहे आणि भारताचे राष्ट्रपती हे या दलाचे कमांडर-इन-चीफ (प्रमुख) आहेत. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

- छत्रपती राजा शिवाजी भोसले यांना भारतीय नौदलाचे संस्थापक मानले जाते. ‘शं नो वरुण’ (संस्कृत) हे या दलाचे घोषवाक्य आहे. 1612 साली ईस्ट इंडिया कंपनीने जहाजांच्या रक्षणासाठी ‘मरीन’ शाखा उघडली. त्यानंतर, 1934 साली ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या दलाची स्थापना केली. 1950 साली दलाला वर्तमान नाव प्राप्त झाले.

- 1971 साली भारत-पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
--------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी सराव प्रश्न    24 मे 2024

प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धाव...