Monday 30 December 2019

देशातील सव्वालाख गावांत मार्चपर्यंत मोफत वाय-फाय..

भारत नेटशी जोडलेल्या देशभरातील सव्वा लाख गावांत मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हरियाणातील रेवाडी येथे केली.

तर येत्या चार वर्षांत देशभरातील 6 लाख गावांपैकी 15 टक्के गावांचे रुपांतर डिजिटल गावांत केले जाईल, असे सांगत त्यांनी बुधवारी रेवाडीस्थित गुरुवारा गाव डिजिटल गाव म्हणून घोषित केले.

देशभरातील 1.3 लाख ग्राम पंचायती भारत नेट प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. अडीच लाख ग्रामपंचायती भारत नेट आॅप्टिकल फायबरशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

इंटरनेट सेवा लोकप्रिय करण्यासाठी भारतनेटशी जोडल्या गेलेल्या सर्व गावांना मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल. सध्या 48 हजार गांवात वाय-फाय सुविधा आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी रेवाडी गावाचे रुपांतर डिजिटल गावांत झाल्याने आनंद होत आहे. यामुळे गावकऱ्यांना शहर, तालुक्याला न जात गावातच एक क्लिकवर सरकारी योजना व सेवा उपलब्ध होईल.

या गावांतील प्रत्येक घर वाय-फाय सुविधा उपलब्ध असेल. एक लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांत करण्याच्या  घोषणेनंतर भिवाडी नजीक अल्वरस्थित करींदा गावात व्हीएनएल कंपनीने डिजिटल गावांचे प्रारुप तयार केले होते. तत्कालीन दूरसंचार सचिवांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...