Monday 30 December 2019

हेमंत सोरेन बनले  झारखंडचे ११वे मुख्यमंत्री

🍀 झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली.

🍀 राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला.

🍀 राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

🍀 हेमंत सोरेन (वय ४४) हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत.

🍀 हेमंत सोरेन यांचा पहिला कार्यकाळ हा १३ जुलै २०१३ – २३ डिसेंबर २०१४ इतका होता ह्या पदावर असणारा हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

🎇 झारखंड राज्य माहिती 🎇

🍀 झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे.

🍀 बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला.

🍀 भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...