Monday 30 December 2019

आयआयटी टेकफेस्टमध्ये ‘आईन्स्टाईन’ रोबो

📌 मुंबई आयआयटीच्या 3 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टेकफेस्टमध्ये यावेळी हाँगकाँगमधून येणाऱ्या आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

📌 हॅन्सन रोबोटिक्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या रोबोची निर्मिती केली आहे.

📌 तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर उभ्या असणाया व्यक्तीच्या चेहयावरील भावनांना ओळखून समोरील व्यक्तीची भावना तो ओळखू शकतो. व्यक्ती आनंदी, दु:खी, संतप्त, घाबरलेली, गोंधळलेली आहे हे रोबो सांगेल. एवढेच नव्हे तर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याचे वय किती याची माहितीही तो देईल.

📌 तसेच या रोबोला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

📌 मुंबई आयआयटीचे टेकफेस्ट यंदा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या टेकफेस्टमध्ये 5 जानेवारी रोजी टेकवेडे आईनस्टाईनला भेटू शकतील.

📌 टेकफेस्टमध्ये येणायांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आईन्स्टाईनप्रमाणे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा रोबो देईल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

📌 याआधी ह्युमनॉइड सोफिया नावाचा रोबो टेकफेस्टमध्ये सहभागी झाला होता.

📌 तेव्हा सोफियाने ‘नमस्ते इंडिया’ म्हणून मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. सोफियापेक्षा हा रोबो अधिक विकसित आहे. कारण तो केवळ बोलणारच नाही तर भावभावना ओळखून त्याबाबत उपस्थितांशी संवाद साधेल, त्यांना यासंदर्भातील अधिक माहिती देईल, असे आयोजकांनी सांगितले.

📌आईन्स्टाईन व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, त्याच्या भावना ओळखू शकतो. जसे की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती आनंदात आहे की दु:खात हे रोबो ओळखू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती असेल तर तीदेखील तो अचूक ओळखेल, असे आयोजकांनी सांगितले. सोबतच त्या व्यक्तीचे लिंग, वय अशा बयाच गोष्टी हा रोबो सांगणार आहे. तसे प्रशिक्षणच आईन्स्टाईनला देण्यात आले आहे.

📌 विशेष म्हणजे आईन्स्टाईन हा हाँगकाँगचा रोबो असून तो भारतात पहिल्यांदाच येणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...