Thursday 26 December 2019

कर्नाटक, गोव्यापेक्षाही महाराष्ट्रातील बंदरे प्लास्टिकग्रस्त...

👉कर्नाटक व गोव्याच्या सागरी बंदरांपेक्षा महाराष्ट्रातील बंदरांवर प्लास्टिक प्रदूषण अधिक आहे असे एका अभ्यासात दिसून आले आहे. या प्लास्टिकचे स्वरूप ‘सूक्ष्म’ व ‘स्थूल’ प्लास्टिक असे आहे. सागर किनारी असलेल्या प्लास्टिक उद्योगांमुळे हे प्रदूषण होत असून त्यात पर्यटनामुळे भर पडत आहे.

👉गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील बंदरांवर भरतीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक घटक दिसून आले आहेत त्या तुलनेत कर्नाटक व गोव्यातील बंदरांवर हे प्रमाण कमी होते.

👉महाराष्ट्रातील बंदरानजीक पेट्रोलियम उद्योग, प्लास्टिक उद्योग आहेत शिवाय पर्यटकही मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकत असतात. त्यामुळे हे प्रदूषण जास्तच आहे.

👉‘अ‍ॅसेसमेंट ऑफ मॅक्रो अँड मायक्रो प्लास्टिक अँलाँघ दी वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया- अ‍ॅबंडन्स, डिस्ट्रीब्यूशन, पॉलिमर टाइप अँड टॉक्सिसिटी,’ हा संशोधन अहवाल नेदरलँडस येथील ‘केमोस्फिअर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

👉सूक्ष्म व स्थूल प्लास्टिक घटकांचे निरीक्षण गेली दोन वर्षे पश्चिम भारतातील दहा किनाऱ्यांवर करण्यात आले व त्याचे सागरी जीवांवर होणारे विषारी परिणामही तपासण्यात आले. प्लास्टिक प्रदूषक घटकात रंगीबेरंगी प्लास्टिक घटक सापडले असल्याचे एनआयओच्या वैज्ञानिक महुआ साहा व दुष्यमंत महाराणा यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...