Thursday 6 January 2022

गणित :- संख्या व त्यांचे प्रकार

▪ समसंख्या : ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. समसंख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात.

▪ विषमसंख्या : ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. विषमसंख्येच्या एककस्थायी 1,3,5,7,9 हे अंक येतात.

▪ मूळसंख्या : ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा 1 नेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळसंख्या म्हणतात.

▪ जोडमूळ संख्या : ज्या दोन मूळसंख्यात केवळ 2 चा फरक असतो अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमूळ संख्याच्या जोड्या आहेत.
उदा.: 3-5 , 5-7 , 11-13 , 17-19 , 29-31 , 41-43 , 59-61, 71-73

▪ नैसर्गिक संख्या : 1, 2, 3, 4 ...............1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असून नैसर्गिक संख्या अनंत आहेत.

▪ संयुक्त संख्या : मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.
उदा.- 4, 6, 8, 9, 12 इ.

▪ पूर्ण संख्या : 0, 1, 2, 3, 4 ............ नैसर्गिक संख्यामध्ये 0 मिळविल्यास पूर्ण संख्या मिळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...