Saturday 7 December 2019

मुंबई सेंट्रल: “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक

मुंबई सेंट्रल रेलवे स्थानक हे FSSAI कडून फोर स्टार रेटिंगसह “ईट राइट स्टेशन” प्रमाणपत्र मिळविणारे देशातले पहिले रेल्वे स्थानक ठरले आहे.

‘ईट राइट इंडिया’ चळवळ

भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांनी सन 2018 मध्ये ‘ईट राइट इंडिया’ चळवळ राबवविण्यास सुरुवात केली. प्रवाश्यांना निरोगी आणि स्वच्छ अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी ही मोहीम चालवली जात आहे.

या कार्यक्रमात खाद्यान्न सुरक्षा व स्वच्छतेसंबंधी नियमांची अंमलबजावणी, निरोगी आहाराची उपलब्धता, पुरवठा केंद्र, खरखट्याचे व्यवस्थापन, अन्नपदार्थांची हाताळणी, स्थानिक आणि हंगामी खाद्यपदार्थाची जाहिरात आणि जनजागृती अश्या विविध मुद्द्यांना लक्षात घेण्यात आले आहेत.

त्यासंदर्भात विभागीय रेल्वे क्षेत्र यांच्या सहयोगाने FSSAI आणि IRCTC यांच्यातर्फे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

भारतीय खाद्यान्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) 

FSSAI याची स्थापना 2011 साली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत झाली. भारतात खाद्यान्न सुरक्षा आणि त्याच्या नियमनाशी संबंधित कायदेशीर चौकट प्रदान करणार्‍या ‘खाद्यान्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006’ याच्या अन्वये FSSAIची स्थापना करण्यात आली. ही एक स्वायत्त संस्था आहे. त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

24 मे 2024 चालू घडामोडी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर - 22 मे प्रश्न – उत्तर भारतातील वायू प्रदूषण आणि आरोग्यावर होण...