Saturday 30 October 2021

चला जाणून घेऊ - भूगोल : पर्वतांचे प्रकार

💠 सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय. जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार

▪ वलित पर्वत : वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात 

▪ विभंग-गट पर्वत : विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.

▪ घुमटी पर्वत : भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.

▪ ज्वालामुखी पर्वत : पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

▪ अवशिष्ट पर्वत : कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...