Saturday 11 January 2020

जागतिक बँकेचा “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स” अहवाल

जागतिक बँकेचा ताजा ‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये वर्तवविलेल्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा (GDP) वृद्धिदर हा 5 टक्क्यांवर सीमित राहणार.

अहवालातल्या ठळक बाबी

भारताविषयी

🔸जागतिक बँकेचा अंदाज खरा ठरल्यास भारतीय विकासदराचा तो 11 वर्षांतला नीचांक ठरणार.

🔸GDP दरातल्या घसरणीस कारणीभूत असणारे घटकही जागतिक बँकेने नमूद केले आहेत. भारतात खासगी क्षेत्रातून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रयशक्तीही घटल्याचे दिसत असून त्याचाही विकासदरास फटका बसणार.

🔸पुढील आर्थिक वर्षात वृद्धिदर वेग धरणार व आर्थिक वर्ष 2020-21 अखेर हा दर 5.8 टक्क्यांवर पोहोचणार.

जागतिक

🔸वर्ष 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेची अंदाजित वाढ 2.5 टक्के राहणार असा अंदाज आहे.

🔸दक्षिण आशियाचा GDP वृद्धीदर 2019-20 या वर्षी 5.5 टक्क्यांपर्यंत राहण्याचे अपेक्षित आहे.

🔸2020 या वर्षी प्रगत अर्थव्यवस्थांचा एकत्रित वृद्धीदर 1.4 टक्क्यांपर्यंत खालावणार असा अंदाज आहे.

🔸उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा वृद्धीदर यंदा 4.1 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...