Tuesday 25 February 2020

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवड निश्चित

​​

◾️ राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर
📌 भाजप आपले ३ तर
📌 महाविकास आघाडी आपले ४ उमेदवार उमेदवार निवडून आणू शकते. त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी महाविकास आघाडी प्रत्येक पक्षाचा एक आणि तिघांचा मिळून एक असे उमेदवार देणार असल्याचे निश्चित झाले आहे.

◾️यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपला १-१ उमेदवार देणार आहेत तर उरलेल्या १ जागेवर तिन्ही पक्षांमीळून एक उमेदवार देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

◾️तत्पूर्वी, राज्यसभेच्या एका नियुक्तीसाठी ३७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते

◾️ महाराष्ट्रात सध्या भाजपचे १०५ आमदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते.

◾️ तर
📌 शिवसेनेचे ५६,
📌राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि
📌 काँग्रेसचे ४४ आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते.

◾️ त्यामुळे महाविकासआघाडीकडून ०४ तर भारतीय जनता पक्षाकडून एकूण ०३ उमेदवार देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

◾️ म्हणजेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकूण ०७ खासदार नियुक्त होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...