Saturday, 22 February 2020

पीकविमा योजना आता ऐच्छिक ; मंत्रिमंडळ निर्णय

◾️केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना पीकविमा योजना ऐच्छिक केली आहे.

◾️कृषी कर्जावरील व्याजदरात केंद्राकडून दिली जाणारी सूट २ टक्‍क्‍यांवरून २.५ टक्के करण्यात आली आहे.

◾️ याचा फायदा ९५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. दरम्यान, ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजनेचा ९० टक्के प्रीमियम केंद्र सरकार देईल.  

 ◾️वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पीकविमा योजनेतील बदलाला मंजुरी दिली.

◾️आता ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असेल.

◾️ पिकांचा विमा काढायचा की नाही, याचा निर्णय शेतकरी स्वतः करू शकेल.

◾️ सरकारने दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ४,५८८ कोटी रुपयांच्या डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधी योजनेला मंजुरी दिली.

◾️ ही योजना धवलक्रांतीला नवा आयाम जोडणारी असेल. यामध्ये ९५ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2025

◆ भारतीय सेना दिवस 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो.[2025 :- 77वा] ◆ PM मोदींनी "युवा शक्तीचे व्हिजन फॉर विकसित भारत @2047" या पुस...