Sunday 9 February 2020

‘या’ मुस्लीमबहुल देशात सुरू झाले पहिले हिंदू विश्वविद्यापीठ.

🏵इंडोनेशिया या मुस्लीमबहुल देशामध्ये पहिले हिंदू विश्वविद्यापीठ सुरु झाले आहे.
इंडोनेशियाची राजधानी बालीमधील डेनपसार येथे हे विश्वविद्यापीठ सुरू झाले असून सुग्रीव असे नाव या विद्यापीठाचे ठेवण्यात आले आहे.

🏵तर देशातील प्रसिद्ध धार्मिक नेते ‘आयगुस्ती बागस सुग्रीव'(I Gusti Bagus Sugriwa)यांच्या नावावरुन ‘आयगुस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोओ विदोडो यांनी या विश्वविद्यापीठाचे उद्घाटन केले.

🏵तसेच पहिले या विश्वविद्यापीठाचे नाव हिंदू धर्म स्टेट इंस्टीट्यूट होते. पण, ‘मुस्लीमबहुल देशात ‘आय गुस्ती बागस सुग्रीव’ यांनी हिंदू धर्मासाठी केलेले काम, त्यांना हिंदू धर्माच्या संस्कृतीबाबत असलेली जाणीव आणि त्यांची हिंदू धर्माची नीतिमत्ता याबाबत अधिकांश जणांना माहिती मिळावी’ यासाठी विडोडो प्रशासनाने विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे.

🏵1993 मध्ये हिंदू धर्म अध्यापन करण्यासाठी स्टेट अकादमीच्या धर्तीवर ही संस्था सुरु झाली होती. 1999 मध्ये त्याचे हिंदू रिलीजन स्टेट कॉलेजमध्ये परिवर्तन झाले आणि 2004 मध्ये ते आयएचडीएनमध्ये बदलले गेले होते. गेल्या शुक्रवारी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर संस्थेचे नवे स्टेट्स जाहीर केले गेले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

यकृत शरीर रचना

👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे. 👉शकूच्या आकाराचे, ...