Sunday 9 February 2020

काँग्रेसचे माजी खासदार राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले विश्वस्त


•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
√सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारनं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे.

√ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची घोषणा केली. ट्रस्टच्या विश्वस्तांची निवडही सरकारकडून करण्यात आली असून, काँग्रेसकडून दोन वेळा खासदार राहिलेले के. परासरन हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर ट्रस्टचे पहिले विश्वस्त आहेत.
- परासरन यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळात केंद्रात महाधिवक्ता म्हणूनही काम केलं आहे.

√ राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली.
- ट्रस्टवर १५ विश्वस्त नेमले जाणार आहेत. त्यातील दहा जणांची निवड केंद्र सरकारनं केली आहे.
-  त्यात पहिलं नाव काँग्रेसचे माजी खासदार के. परासरन याचं आहे..

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...