Wednesday 19 February 2020

विदेश सेवा संस्थेला ‘स्वराज’ यांचे नाव

🔰 माजी विदेशमंत्री आणि भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील अनिवासी भारतीय केंद्राला सुषमा स्वराज भवन हे नाव देण्यात येणार आहे. याचबरोबर राजधानीतील विदेश सेवा संस्थेचे सुषमा स्वराज इन्स्टीटय़ूट ऑफ फॉरेन सर्व्हिस असे नामकरण करण्यात येणार आहे. विदेशमंत्री म्हणून स्वराज यांनी दिलेले योगदान पाहता केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

🔰 माजी विदेशमंत्री स्वराज यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाने गुरुवारी दिली आहे. माजी विदेश मंत्र्यांच्या दशकांची सार्वजनिक सेवा आणि त्यांच्या वारशाला सन्मान देत 14 फेब्रुवारी रोजी त्यांच्या पहिल्या जयंतीपूर्वी ही घोषणा केली जात असल्याचेही विदेश मंत्रालयाने सांगितले आहे.

🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांना विदेशमंत्रिपद देण्यात आले होते. विदेशात राहत असलेल्या भारतीयांच्या मदतीकरता त्यांनी उचललेल्या पावलांचे प्रचंड कौतुक झाले होते. स्वराज लोकांशी ट्विटच्या माध्यमातून संपर्कात असायच्या आणि त्यांनी याच माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी सोडविल्या होत्या. 6 ऑगस्ट 2019 रोजी स्वराज यांचे निधन झाले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...