Wednesday 19 February 2020

इंदूर बनणार ‘सायलेंट सिटी ऑफ इंडिया

◾️'इंदूरमधील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.

◾️शहराला 'सायलेंट सिटी ऑफ इंडिया' बनवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली असून, मुंबईच्या धर्तीवर शहरात ठिकठिकाणी 'स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल' यंत्रणा बसविण्यात येणार आहे,' अशी माहिती रविवारी जिल्हाधिकारी लोकेशकुमार जाटव यांनी दिली.

◾️'इंदूरला ध्वनी प्रदूषणमुक्त करायचे असून, मार्च २०२१ पर्यंत भारतातील सायलेंट सिटी म्हणून नावारूपाला आणायचे आहे.

◾️मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठासह परिसरातील वृद्धाश्रम, रुग्णालये, शैक्षणिक संस्था यांसह महत्त्वाच्या ३९ ठिकाणी 'शांती क्षेत्र' घोषित करण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठे हॉर्न, बँड, डिजे वाजविण्यास बंदी असेल.

◾️नागरिकांनी सरकारी वाहनांनी प्रवास करावा, यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे; तसेच जे वाहनचालक सिग्नलपाशी विनाकारण हॉर्न वाजवतील, अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर 'स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल' उभारण्यात येणार आहेत.'

◾️या यंत्रणेंतर्गत सिग्नल डेसिबल मीटरने जोडण्यात येतील. सिग्नलला सतत हॉर्न वाजवल्

No comments:

Post a Comment

Latest post

काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक

▪️ग्लोबल Gender Gap index 2024 • प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक ▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रम...