Saturday 29 January 2022

वनस्पती व प्राण्यांमधील ऊती

वनस्पती ऊती :

शरीरांच्या भागांना अवयव म्हणतात. अवयव हे ऊती पासून बनलेले असतात. ऊती या पेशिसमुहापासून बनलील्या असतात. सजीवांच्या विविध अवयवांची कार्य भिन्न असल्यामुळे यांच्या  रचनेतही फरक दिसून येतो.

वनस्पतींची वाढ हि त्यांच्या मुळ व खोडांच्या अग्रभागी दिसून येते. याचे  कारण म्हणजे अग्रभागासी वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या ऊती असतात. पेशींच्या विभाजन क्षमतेनुसार वनस्पती उतीचे विभाजी ऊती व स्थायी ऊती असे वर्गीकरण केले जाते.

हि एकाच वनस्पती ऊती अशाप्रकारची ऊती आहे, ज्यात पेशिविभाजानाद्वारे नवीन पेशींची निर्मिती होते.

या विभाजी ऊती कोणत्या विभागामध्ये आढळतात यावरून त्यांचे प्ररोह विभाजी(Apical meristem)आणि पार्श्व विभाजी ऊती (lateal meristem)असे प्रकार आहेत.

अंतरीय विभाजी ऊती हा सुद्धा एक प्रकार आहे.(Entercalary Meristem).

प्ररोह विभाजी ऊती हि खोडाच्या व मुलाचा अग्रक़्भगि असते.

खोड किंवा मुळचा घेर व्रुंडी पार्श्व विभाजी उतीमुळे होते.

अंतर विभाजी ऊती हि पानांच्या तळासी व  फांदीच्या तळासी असते. त्या अतिक्रियाशील असतात.

विशिष्ट भूमिका बजावल्यानंतर विभाजी उतीच्या पेशी विबाह्जानामुळे तयार झालेल्या पेशींची विभाजनाची

स्थायी ऊती

यामुळे स्थायी ऊती तयार होतात . स्थायी आकार , आकृती व कार्य घडवण्याच्या या प्रक्रियेस 'विभेदन' (differentiation) असे म्हणतात.

स्थायी ऊती या सरळ स्थायु किंवा जातील स्थायू ऊती असतात.

सरल स्थायी ऊती :

या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असून या उतींचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते.

मूलऊती:

यातील पेशी जिवंत असतात. यात केंद्रक असून याची भित्तिका पातळ असते.

या पेशींमध्ये मोकळी जागा असते. या पेशी बटाटा व बिट यासारख्या वनस्पतीत अन्न साठवण्याचे कार्य करतात .

हरीत ऊती:

वनस्पतींच्या पानामधील ऊतींना हरित ऊती म्हणतात.

वायू ऊती:

जलीय वनस्पतीमध्ये अंतरपेशिय पोकळ्यामुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. पाण्यावर तरंगण्याची क्षमता देतात . त्यांना वायू ऊती असे म्हणतात.

स्थूलकोन ऊती :

या ऊती प्रामुख्याने पानाच्या डेठात आढळतात . त्या पाने,खोड व फांद्या यांना लवचिकता देतात .

दृढ ऊती :

दृढ ऊती मधील पेशी मृत असतात . त्यांच्या भिंती जाड असतात . या ऊती खोड संवाहणी पूल . शिरा व बियांच्या कठीण कवचामध्ये आढळतात .

विशिष्ट रचणे मुळे वनस्पती टणक व ताठ बनतात.

मलमलचे कापड अंबाडीच्या दृढ ऊतीपासून  बनवले जाते .

पृष्ठभागीय ऊती :

वनस्पतींचा संपुर्ण पृष्ठभाग हा पृष्ठभागीय  उतींच्या थराने बनतो .

या आपित्वाचीय पेशी सपाट असतात.

हि ऊती वनस्पतीच्या सर्व भागांचे संरक्षण करते.

निवडूंगासारख्या वनस्पतींचे बाह्य आवरण हे जाडसर असते.

बाह्य आवरणातील पेशी नेहमी मेणासारखा पदार्थ स्त्रवत असतात. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.

वातावरणा बरोबर वायूंचे देवाणघेवाण करण्यासाठी पानांच्या बाह्य आवरणाला सूक्ष्मछिद्रे असतात . त्यांना पर्णरंध्रे  असे म्हणतात.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here